साधासाच किस्सा. पण तुमच्या आमच्या रोजच्या कॉर्पोरेट जीवनातही घडत असेल. तुमच्याशी बोलून मोकळे व्हावे आणि यासंदर्भात तुमचेही विचार आणि अनुभव समोर यावेत या हेतूने शेअर करतोय.
__________________________________________________
मी आणि माझा ऑफिस मधील मित्र रौनक (अर्थातच नाव बदलून). आम्हा दोघांचाही कामाचा अनुभव, शारीरीक वय, कंपनीतील पोस्ट वगैरे साधारणपणे एकाच लेव्हलचे. फरक इतकाच त्याचे आणि माझे डिपार्टमेंट वेगळे. आम्हा समवयीन आणि समविचारी मुलांचा कट्टा कॅंटीनमध्ये एकाच ठिकाणी भरत असल्याने आमचा ऑफिसमध्ये बरेपैकी मोठा ग्रूप आहे. ग्रूपमधील इतर मुलांशी जसे चांगले मैत्रीचे संबंध तितकेच रौनकशी देखील आहेत. जेवणाचा डब्बा शेअर करायचा असो वा कोणाच्या वाढदिवसाची पार्टी असो, आम्ही सारे एकत्रच साजरे करणार. कधी एकमेकांना मस्करीत चिडवणार, तर कधी एकत्र येत तिसर्या कोणाला गिर्हाईक बनवून त्याची खेचणार. ऑफिसमधील कोणती मुलगी आवडते हे बिनधास्तपणे एकमेकांना सांगणार. कॉलेजसारखाच एक कट्टा आमच्या ऑफिसातही भरतो असा एक विश्वास ....... जो या छोट्याश्या प्रसंगाने डळमळीत झाला.
आम्हा दोघांचे, म्हणजे माझे आणि रौनकचे डिपार्टेमेंट वेगळे असले तरी कनेक्टेड आहेत. कामानिमित्त संबंध येतोच. ढोबळमानाने सांगायचे तर त्यांच्या डिपार्टमेंटकडून निघणारे आऊटपुट हे आमच्यासाठी ईनपुट असल्याने आम्हाला आमच्या डेडलाईन फॉलो करण्यासाठी त्यांच्याकडूनही वेळीच इनपुट येणे गरजेचे असते. ते तसे ठरल्या वेळी नाही आले आणि आमच्याकडेही एक्स्ट्रा रिसोर्स प्लान नसतील वा फारशी मार्जिन नसेल तर आमच्याही डेटस चुकण्याची शक्यता असते. अश्यावेळी मग आम्हाला या उशीराचे कारण म्हणून रौनकच्या डिपार्टमेंटकडून इनपुट उशीरा आले हे नमूद करावेच लागते. अर्थात, त्यांच्याकडेही जर या उशीराचे कारण वा स्पष्टीकरण असेल तर ते देखील या प्रकारात लटकत नाहीत. पण जर उशीराचे कारण त्यांचाच हलगर्जीपणा असेल तर त्यांच्या चुकीची शिक्षा त्यांनीच भोगणे क्रमप्राप्त आहेच.
नुकतेच माझ्या जॉब प्रोफाईलचे स्वरूप बदलल्याने हल्ली मला त्यांच्या डिपार्टमेंटशी को-ऑर्डिनेट करत, माझे रिसोर्स प्लान करावे लागतात. सध्या मी ज्या प्रोजेक्टवर काम करतोय त्याच प्रोजेक्टवर रौनकही काम करत असल्याने मला त्याच्याशीच को-ऑर्डिनेट करावे लागते. तर हि साधारण महिन्याभरापुर्वीची गोष्ट. त्याच्याकडून जे इनपुट ठरलेल्या तारखेला किंवा त्याच्या आधी अपेक्षित होते ते ऐनवेळी चार दिवस पुढे ढकलायची मागणी तो करत होता आणि या उशीराला तोच जबाबदार असल्याने आम्ही आमचे काम वेळेतच पुर्ण करावे हि अपेक्षाही सोबत होती. मी माझ्या बॉसची चर्चा करून स्वतातर्फेही सारे पर्याय चाचपून पाहिले. फार फार तर दोन दिवस आम्ही मॅनेज करू शकत होतो. त्याला तसे प्रामाणिकपणे सांगितले. त्यावर तो, "हम्म बघतो" एवढेच म्हणाला.
खरे तर त्याची अपेक्षा अशी होती की मी माझ्या काही रिसोर्सना संध्याकाळी थोडेफार अतिरीक्त थांबवून किंवा शनिवारी बोलवून काम वेळेत करून घ्यावे. अर्थात हि ऑथोरटी खरे तर माझी नसून माझ्या बॉसची आहे याची कल्पना त्याला असल्याने स्पष्ट बोलत नव्हता इतकेच. जरी दोन दिवसांची मुदत त्याला दिली तरी त्यानंतरही आमची घाईघाईच होणार होती. गणपतीचे दिवस चालू असल्याने काही जण सुट्ट्यांवर होते, तर जे थोडेथोडके हजर होते त्यांना रोजचे वेळेवरच घरी निघायचे असायचे. त्यामुळे ऐनवेळी काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून साहजिकच माझ्या बॉसने मला या दोन दिवसांच्या उशीराचाही मेल टाकायला सांगितले. मेलचा आशय आणि हेतू साधारण असा होता की आधीच दोन दिवस उशीर झाला आहे आणि आता दोन दिवसांने तरी संध्याकाळीच दे रे बाबा. नाहीतर आणखी तिसर्या दिवशी सकाळी तासाभरात देतो म्हणत त्या दिवसाचाही फर्स्ट हाल्फ खाल्ला असता. मेल मधील शब्द न शब्द हा माझ्या बॉसने सांगितल्याप्रमाणेच होता कारण माझ्यासाठी हा रोल नवीन आणि त्यानुसार हा माझा पहिलाच प्रोजेक्ट होता म्हणून हे मार्गदर्शन वेळोवेळी असतेच.
आता यात प्रॉब्लेम झाला तो असा की मेल टाकल्याने त्याची कॉपी मला त्याच्या बॉसलाही मार्क करावी लागली. पण सध्या प्रकरण दोन डिपार्टमेंटमध्येच राहावे म्हणून आणखी इतर कोणाला कॉपी मार्क केली नव्हती. इथपर्यंत यात काही वेगळे विशेष असे नव्हते, निदान मला तरी वाटले नाही. रेग्युलर प्रॅक्टीस म्हणू शकतो. पण त्याच्या बॉसला या मॅटरची एकंदरीत किती कल्पना होती की काहीच नव्हती हे मात्र मला माहीत नव्हते. मी मेल टाकला आणि थोड्याच वेळात जेवायला उठलो. रौनक मात्र पाच-दहा मिनिटे उशीराने आला. कारण विचारले असता माझ्याकडे निर्देश करत, पटकन म्हणाला, "अरे याने मेल टाकला ना, आत जावे लागले." .. आत म्हणजे त्याच्या बॉसच्या केबिनमध्ये. तिथे काय झाले त्यांचे त्यालाच ठाऊक. ईतरांनी एखाददुसरी कॉमेंट करत विषय सोडला, पण मला मात्र त्याचा चेहरा त्रासलेला आणि आवाजाचा टोन देखील वेगळाच भासला. जणू काही मीच त्याला लटकवले, मला मैत्री निभवता आली नाही, तू आपला माणूस असून मला विश्वासात न घेता मेल टाकलास, पाठीत खंजीर खुपसलास वगैरे वगैरे.. टाईपचे भासले.
पुढे बरोबर दोन दिवसांनी त्याच्याकडून इनपुट आले. थोडीशी मारामार झाली आमची, पण ‘ईटस पार्ट ऑफ वर्क’ म्हणत ना माझ्या बॉसने चीडचीड केली ना कोणत्या रिसोर्सने कूरबूर केली. दिलेल्या डेडलाईनला आमचेही डिलीवरेबल तयार होते. ऑफिसच्या कामासंदर्भात विचार करता हा किस्सा इथेच संपला.
पण त्या दिवसानंतर आमच्या मैत्रीच्या नात्यात दुरावा आला. प्रामुख्याने त्याच्याकडून बोलणे खुंटले वा त्यात केवळ औपचारीकताच शिल्लक राहिली. दोघांमधील एक मित्र जर मोकळेपणाने वागत नसेल तर दुसराही मग आपसूकच तेच तेवढेच अंतर ठेवत वावरू लागतो. माझेही तेच झाले. कॉलेजच्या मैत्रीत एकमेकांना चार शिव्या घालून प्रकरण मिटवले जायचे पण अश्या ऑफिशिअल मॅटरमध्ये कितीही जीवाभावाचे सहकर्मचारी असले तरी त्यात तसे करता येत नाही याचा अनुभव घेतला.
ऑफिसमध्ये कामाच्या स्वरुपानुसार आपल्याला एखाद्याच्या जवळ बसवले जाते आणि आपण त्यालाच आपला मित्र समजतो वा बनवतो. याउलट कॉलेजमध्ये आपल्या बेंचवर कोण बसणार हे आपण आपल्या मित्रांमधून निवडतो, याचा साक्षात्कार झाला आणि कॅंटीनमधील ज्या टेबलला आम्ही आमचा कट्टा म्हणतो त्यातील फोलपणा समजला.
असो, अजूनही ऑफिसमध्ये माझे कित्येक खास मित्र आहेत. चिक्कार आहेत. हक्क गाजवता यावा अशीही दोनचार टाळकी आहेत. काही नाजूक गोष्टीही बिनधास्त शेअर करू शकेन अश्या मैत्रीणीही आहेत. पण देवाकडे एकच प्रार्थना, उगीचच आमच्या मैत्रीची परीक्षा घ्यायच्या नादात कामानिमित्त आम्हाला एकमेकांच्या संपर्कात आणू नकोस. __/\__
खरेच आभारी राहील,
ऋन्मेऽऽष
अरे नाही स्ट्रेट मुली
अरे नाही


स्ट्रेट मुली मुलींची मैत्री
ही अंगावर आलेली मैत्री आहे.
ते मला मैत्रिण मानते जे मला नकोय टाईप्स
थांब जरा लिहिते जरा वेळाने.
मूड लागायला हवा ना
टोच्या आपण म्हणतात तसे
टोच्या आपण म्हणतात तसे "मित्र" हा शब्द आपण सारेच ढिलेपणाने वापरतो. तेच सोयीचे असते आणि तेच सुखकर असते.>>>>>>>
असे काही नाही. मी नाही वापरत गेले काही वर्ष तरी "मित्र" हा शब्द ढिले पणानी. रादर एका वयानंतर आपल्या आयुष्यात मित्र येणे हे जवळजवळ कठीणच होउन बसते.
तुम्ही जर मित्र आणि मैत्री ह्या संज्ञा ढिलेपणानी वापरत असलात तर मग सोप्पे आहे. डोक्याला काही शॉट च नाही.
टोचा, ओके. जी गोष्ट सापेक्ष
टोचा, ओके.
जी गोष्ट सापेक्ष आहे त्यावर चर्चा थांबवूया.
पण डोक्याला शॉट च नाही असे म्हणू नका, हा धागाही अश्याच एका छोट्याश्या शॉटमधून आलाय.
अवांतर - आपला आयडी टोचा असा आहे, माझ्या आधीच्या पोस्टमध्ये टोच्या असे टाईपले त्याबद्दल क्षमस्व
जर खरोखरीच मैत्री असेल तर हेच
जर खरोखरीच मैत्री असेल तर हेच सर्व त्याला मोकळेपणी सांगता आले असते. मैत्रीत असे गैरसमज होतच असतात. वेळच्यावेळी ते दूर करणे आवश्यक असते.. आणि जर मैत्री नसेल तर यावर फार विचार करण्याची गरज नाही.
Maybe Raunak also would have
Maybe Raunak also would have got dokyala shot and would have some things to say.
(No subject)
अमा, बेफी आणि टोचा यांच्या
अमा, बेफी आणि टोचा यांच्या प्रतिसादाशी सहमत!! मैत्री ही खूप व्यापक व्याख्या आहे. मैत्री किती गहन ह्याला फार महत्वं आहे. मैत्रीचे वेगवेगळे परीघ असतात. सगळ्याच मित्रांना एकाच वर्तुळात ठेवत नाहीत. हे दादचं वाक्य खूप पटलं!!
आपला अॅप्रोच मुळी ऑफीसबाहेर फ्रेंड्स पण कामाच्या वेळी काम आणि कंपनी रूल्स स्ट्रिक्ट्ली फॉलो करणारा आहे असं आधीपासूनच ठेवावा. कलिग्जना, ग्रूप लिडर / मॅनेजर असू तर माणसांना हँडल करण्याचं स्कील असलंच पाहीजे किंवा प्रयत्नपूर्वक अंगी बाणवावं लागतं...
नात्यातल्या एकाचा कलिग म्हणून अश्या प्रकारच्या मनस्तापांचा दांडगा अनुभव गाठीशी आहे. असो हळूहळू शिकत जातो आपण.
एका जुन्या नोकरीत एच.आर.
एका जुन्या नोकरीत एच.आर. मॅनेजरने induction च्या वेळी सांगितलेलं एका ओळीचं कॉरपोरेट जगताचं तत्वज्ञान आजही लक्षात आहे आणि पदोपदी त्याचा अनुभव येतो (काही सन्माननिय अपवाद वगळून),
"Be friendly with everyone, but don't be friends with anyone"
मला पण येतात असे अनुभव पण
मला पण येतात असे अनुभव पण ऋन्मेऽऽष , "Be a good person but don't waste your to prove it " अस मला तरी वाटत आपण स्वतःशी प्रामाणिक रहाव.
ऋन्मेऽऽष.. मित्रा, होतं असं.
ऋन्मेऽऽष.. मित्रा, होतं असं. आणि अनुभवातुनच हे प्रसंग कसे हाताळायचे ते कळतं / जमतं. ऑफिसमधे मैत्री आणि काम ह्यांचे रस्ते वेगवेगळेच बरे असतात.
माझ्या अनुभवात एक बघायला मिळाले ते सांगतो.. तु म्हणालास तसाच काहीसा सेटअप. पण दोन डिपार्ट्मेंट - पर्चेस आणि प्रॉडक्शन. प्रॉडक्शन वाल्यानी वेळेत रिक्वायरमेंट सांगितल्या नाहीत म्हणून पर्चेस बोंब मारायचे आणि त्यांनी वेळेत मटेरिअल आणले नाही म्हणून प्रॉडक्शन बोंब मारायचे (नेहमीचीच भांडण).. पण कंपनीत एकमेकांशी तावातावाने भांडणारे हे लोक, कामाबाहेर घट्ट मित्र. घरी जाताना बसमधे एकमेकांशेजारी बसायचे, जेवायला एकत्र बसायचे, अगदी दुपारच्या चहालापण एकत्र असायचे. त्यांची भांडणं कॉन्फरन्स रूम मधे.. पण बाहेर आल्यावर ते तिथलं तिथे ठेवून आल्यासारखे वागायचे. त्यांचं बघुन आम्ही नवीन मुलं पण आपोआप तसं करायला शिकलो आणि बर्याच प्रमाणात ते जमलंसुद्धा.
कंपनीत प्रत्येकाला स्वतःचं काम करावच लागतं आणि बरेचदा साहेब म्हणेल तसं / तेव्हा करावं लागतं. ते करताना स्वतःची वाट लागणार नाही ह्याची काळजी स्वतःच घ्यायची असते. कितीही प्रयत्न केला तरी शेवटी सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत. तेव्हा त्याबद्दल मनात राग ठेवायचा नाही आणि वैयक्तिक आयुष्यात त्यामुळे चांगले मित्र गमवायचे नाहीत हे जमणं महत्वाचं.
तू म्हणालास तसं, आपण दिवसाचे ८-१० तास जिथे घालवतो तिथे मित्र नसले तर किती नीरस होईल काम करणं.
चौकट राजा, धन्यवाद, चांगले
चौकट राजा,
धन्यवाद, चांगले शेअर केलेत. अन्यथा या ईटुकल्या कारकिर्दीत याच्या उलट जोड्यांचे अनुभव जास्त घेतलेत. कामाच्या वेळी गोड बोलून काम काढून घेणे आणि पाठीहून वो पक्का हरामी है .. गंमत म्हणजे दोघांनाही आपण एकमेकांच्या पाठी असे बोलतो हे माहीत असूनही एकमेकांशी कामासंदर्भात बोलताना चेहर्यावर हास्य आणि वाणीमध्ये मिठास कशी आणता येते याचे मला कौतुकच वाटते .. आणि येस्स कौतुकास्पदच समजला जातो हा गुण!
हे तर मला नाही जमणार, जमवायचेही नाही, पण आपण म्हणता ते नक्कीच शिकण्यासारखे आहे.
वरचे माझे अनुभव खास करून भारतातल्या एका मोठ्या कंपनीतले आहेत. नाव नाही घेत. पण कमालीचे सडके राजकारण. माझ्याबरोबरच जॉईन झालेल्या एका खास मित्राचा अपवाद वगळता तिथे मी वर्षभराच्या काळात कोणालाही माझा मित्र समजले नाही. अगदी मैत्रीची ढिली व्याख्या करूनही त्यात बसवले नाही. थँक्स टू माय गर्लफ्रेंड आणि तिच्याशी बोलायला कंपनीनेच पुरवलेला फोन, ज्यामुळे माझे तेथील आयुष्य नीरस नाही झाले.
आमचा ऑफिसमध्ये बरेपैकी मोठा
आमचा ऑफिसमध्ये बरेपैकी मोठा ग्रूप आहे. ग्रूपमधील इतर मुलांशी जसे चांगले मैत्रीचे संबंध तितकेच रौनकशी देखील आहेत.>>>> आणि
तिथे मी वर्षभराच्या काळात कोणालाही माझा मित्र समजले नाही. अगदी मैत्रीची ढिली व्याख्या करूनही त्यात बसवले नाही>>> ??? विरोधाभास??
थँक्स टू माय गर्लफ्रेंड आणि तिच्याशी बोलायला कंपनीनेच पुरवलेला फोन, ज्यामुळे माझे तेथील आयुष्य नीरस नाही झाले. >>>
बरं.
आशू २९, आपली गल्लत
आशू २९,
आपली गल्लत होतेय.
माझा लेखातील अनुभव सध्याच्या कंपनीतील आहे आणि वरच्या पोस्टमधील जुन्या कंपनीतील.
म्हणून हा विरोधाभास
अच्छा
अच्छा
" यह भि बदल जायेगा"
" यह भि बदल जायेगा"
मैत्री आणी प्रोफेशनल लाईफ
मैत्री आणी प्रोफेशनल लाईफ नेहमी वेगळे ठेवावे.
मी आणी माझ्या शत्रुविभागातील रुपेश मीटींग मधे हमखास भांडण ठरलेल. पण ते त्या मीटींग रुम पुरतेच. बाहेर दोघेही कँटीन, पार्टी वगैरे इव्हन आपापल्या लग्नानंतर आम्ही एकत्रच हनीमुनला(तो त्याच्या मी माझ्या) गेलो होतो.आता आम्ही दोघेही वेगवेगळ्या कंपन्यांमधे आहोत अजुनही आमची मैत्री टिकुन आहे.
चौकट राजा प्रतिसाद आवडला.
चौकट राजा प्रतिसाद आवडला.
हे मिसले होते..
हे मिसले होते..
डॉ. कुमार च्या धाग्यावर लिंक
डॉ. कुमार च्या धाग्यावर लिंक द्य्य जरा कुणीतरी ह्याची.
किती न काय काय आणि कुठकुठल्या विषयांवर लिहुन ठेवलंय नै ऋन्मेषने.
Pages