माझ्या आजोळी पूर्वापार बेकरीचा व्यवसाय करतात. हे मी नेहमी अभिमानाने सांगत असतोच. पण मला स्वतःला
बेकिंगचा तेवढा उत्साह नाही. घरातले अवन तर कित्येक दिवस वापरलेच जात नाहीत.
इथल्या सुपरमार्केट मधे ब्रेड मेकिंग मशीन बघितले आणि माझ्यात संचार झाला. हे मशीन मी आधी, तेही बर्याच
वर्षांपूर्वी दुबईत बघितले होते. पण दुबई मस्कत मधे अप्रतिम पाव शिवाय खबूस मिळत असल्याने मला त्यात
रस वाटला नव्हता.
केनयामधेही आपल्या चवीचेच पाव मिळतात. नायजेरियात बहुतेक पाव गोड असतात व ते मला आवडत नसत.
इथे अंगोलात स्थानिक पातळीवर पाव बेक केले जातात. अनेक दुकानांची स्वतःची बेकरी असते.
पण ते बर्याचदा मला अळणी वाटतात. कधी कधी कच्चट वाटतात.
त्यामूळे हे मशीन मी घेऊन आलो. किमतीला साधारण भारतीय ५,५०० रुपये एवढे आहे.
हि ओरीमा कंपनी आहे पोर्तुगालची. कार्टनवर इंग्लीशमधे मजकूर होता. पण आतमधली सगळीच माहितीपत्रके
पोर्तुगीज मधे होती. त्यांच्या सर्वीस सेंटरला विचारून बघितले तर त्यांच्याकडेही ती इंग्रजीत उपलब्ध नव्हती.
मग माझे मीच भाषांतर केले.
या मशीनसाठी ताजी यीस्ट चालत नाही. आपल्याकडे मिळते ती ( पांढर्या मोहरीसारखी दिसणारी ) ड्राय यीस्टही
चालत नाही. तर खास ड्राय इन्स्टंट यीस्ट ( खसखशीसारखी दिसते.) लागते.
पोर्तुगीज भाषेचे दोन प्रकार आहेत. एक ब्राझिलची आणि दुसरी पोर्तुगालची. दोन्हीत थोडा फरक आहे.
या मशीनसोबतच्या पुस्तकात फर्मेंटो असा शब्द आहे, खरे तर यीस्टसाठी लेवादुरा असा शब्द हवा.
आमच्या नेहमीच्या सुपरमार्केट्मधे मला ताजीच यीस्ट मिळू शकली असती म्हणून या खास यीस्टसाठी जरा
फिरावे लागले.
तर हे मशीन असे दिसते
या मशीनमधे साधा ब्रेड, फ्रेंच ब्रेड, गोड पाव, होल व्हीट ब्रेड, केक करण्यासाठी पर्याय आहेत. यात नुसते पिठ ( साधे व पावासाठी ) मळून घेता येते. जॅम व पास्ताही करता येतो.
वरचे झाकण बाजूला केल्यावर आत असे ब्रेड पॅन असते
प्रत्येक प्रकारच्या पावासाठी काय घटक लागतात आणि ते काय क्रमाने घ्यायचे याचा तक्ता असतो.
आधी पाणी, त्यातच मीठ, साखर, तेल, मिल्क पावडर असे टाकून वर वजन करून घेतलेला मैदा आणि
वर यीस्ट टाकायची असते.
नंतर मेनू निवडायचा. यात वजनाचे ३ पर्याय आहेत. तसेच पाव कमी, मध्यम वा कडक भाजायचा ते पण ठरवता येते. पाव भाजून झाल्यावर तो काही तास गरम ठेवण्याचीही सोय असते.
आपण मेनू सिलेक्ट केल्यावर झाकण बंद करायचे आणि दिलेल्या वेळानंतर ( साधारण ३ ते ४ तास ) पाव तयार असत.
याच्याकडे लक्ष द्यायची गरज नसते, पण मला ही सगळी प्रोसेस बघायची होती म्हणून,,,
तर थोड्या वेळाने हे मशीन पावाचे पिठ असे चांगले तिंबून घेते.
मग अर्थातच यीस्ट काम करून मिश्रण फुगू लागते. ते चांगले फुगले कि परत मिश्रण तिंबले जाते.
दोन वेळा असे तिंबून झाल्यावर मग ती कॉईल तापते व पाव आपल्या सेटींगप्रमाणे भाजला जातो.
भाजल्यावर थोडा थंड झाला कि पॅन बाहेर काढून ते टॅप केले कि असा पाव बाहेर पडतो.
ती मिश्रण करणारी ब्लेड्स पावाच्या आत जातात. पण ती धारदार नसल्याने पावातून सहज ओढून काढता येतात.
पुस्तिकेत बेसिक कृतीच दिल्या आहेत पण यू ट्यूबवर काही प्रयोग आहेत. मी पहिल्याच प्रयोगात लसूण आणि
काळे ऑलिव्हस कापून वापरले. यात घटक कापूनच वापरावे लागतात कारण तो मिक्सर नाही. तसेच ड्रायफ्रुटस
टाकायची तर कधी टाकायची हे पण त्या पुस्तिकेत दिलेले आहे.
बरं इतके करून तयार होणारा पाव कसा असतो ? वरच्या फोटोत दिसतो आहे तसा होतो. याला वरून रंग
येत नाही पण कच्चाही रहात नाही. पोताला आपल्याकडच्या पावाप्रमाणे मऊसर नसतो तर युरोपियन पावाप्रमाणे
जरा कडकच असतो.
टोस्ट करायला चांगला. अगदी पातळ कापही बरीच फर्म राहते. कोलमडत नाही.
भारतात दिसला नाही.. मला एक नवीन खेळणे मिळाले एवढे नक्की
वॉव, मस्त पाव दिनेश
वॉव, मस्त पाव दिनेश
मस्तच.
मस्तच.
मस्तच.
मस्तच.
हा होलव्हीट हनी ब्रेड मी
हा होलव्हीट हनी ब्रेड मी आंतरजालावरचा व्हिडिओ बघून केला होता.
मानुषी, मस्त गुबगुबीत दिसतेय
मानुषी, मस्त गुबगुबीत दिसतेय तुझी होल व्हीट.. टेंप्टिंग
दिनेश, थांकु.. सांगीन मैत्रीणी ला..
दिनेश जर्मन ब्रेड्स चं टेक्शच्र्र मला तरी फार्र आवडतं.. इकडल्या ब्रेड्स ची चव नाहीच् आवडत.. पाव मस्त असतात पण!!
दिनेशदा, कित्ती हा खटाटोप..
दिनेशदा, कित्ती हा खटाटोप.. एक नंबरचा आहे.
खास च आहे मशिन. पीठ मळले
खास च आहे मशिन. पीठ मळले जावुन थेट पाव तयार म्हणजे भारीच आहे.
हो टोचा.. आणि काहिही लक्ष
हो टोचा.. आणि काहिही लक्ष द्यावे लागत नाही.
ब्रेड मस्त दिसतो आहे..
ब्रेड मस्त दिसतो आहे..
ये पाव जमीन पे मत रखिये
ये पाव जमीन पे मत रखिये
मी वर लेखात, वरून क्रस्ट येत
मी वर लेखात, वरून क्रस्ट येत नाही असे लिहिलेय. पण ते आणायची सोपी युक्ती काल सापडली...
ती म्हणजे, या सर्व काळात मशीनचे झाकण अजिबात उघडायचे नाही
छान
छान
Pages