ब्रेक अप % के बाद !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 September, 2014 - 13:07

किस्सा ताजा आहे, छोटासाच आहे आणि आजच्या पिढीला बोधकारक आहे, म्हणून संबंधितांची परवानगी घेऊन आणि नावं बदलून इथे मांडतोय.

...

किस्सा आहे सलीमचा, आणि त्याच्या अनारकलीचा.

सलीम, माझ्या ऑफिसमधील माझा एक घनिष्ठ सहकर्मचारी मित्र. ज्याच्या अनारकलीचे नाव होते जान्हवी. त्यांचे प्रेम म्हणाल तर "एक उदाहरण" होते, जे मला कित्येकदा माझ्या गर्लफ्रेंडने सुनावले होते. उदाहरणार्थ - अरे त्या सलीमकडून काहीतरी शिक, तो बघ कसा त्या जान्हवीसाठी दर सोमवारी न चुकता गुलाबाचे फूल घेऊन येतो. भले तिचे केस बॉयकट का असेनात. आणि माझे केस काळेभोर लांबसडक असताना तुला कधी स्वताहून एक साधासा चमेलीचा गजरा आणायला सुचू नये. वगिअरे!

पण अश्या या आदर्श प्रेमी युगुल सलीम-जान्हवीचे नुकतेच ब्रेक अप झाले !
कारण ...... दोघांत तिसरा! पहिल्याला विसरा!

पण इथे त्या पहिल्याचे बुरे हाल होतात हा आजवरचा अनुभव ! आणि इथे तो पहिला, माझा मित्र सलीम होता. जान्हवीच्या आयुष्यात आता पीटर आला होता. तो देखील आमच्याच ऑफिसमधील बंदा, पण डिपार्टमेंट तेवढे वेगळे. बसायची जागा शेजारच्या बिल्डींगमध्ये. त्या पीटर ईंग्लंडमध्ये जान्हवीने काय एवढे पाहिले जे आमच्या सलीम हिंदुस्तानीमध्ये नव्हते, ज्यासाठी तिने कालपरवापर्यंत सलीमशी सुखासुखी सुरू असलेल्या प्रेमप्रकरणाला तिलांजली दिली या चर्चेला आता काही अर्थ नव्हता. आपली पुरुषप्रधान संस्कृती पाहता अश्या केसेस मध्ये मुलगा एकटा पडला तर त्याचा पुरुषी अहंकार सहजगत्या दुखावतो. त्यामुळे स्वताच्या जीवाचे बरेवाईट करण्याबरोबरच आपली माजी प्रेमिका आणि तिचा आजी प्रियकर या दोघांचाही काटा काढण्याचा विचार त्याच्या डोक्यात येण्याची शक्यता असते. आणि सलीमची दणकट शरीरयष्टी पाहता या शक्यतेचीही शक्यता जास्तच होतीच.

बस्स याच पार्श्वभूमीवर आम्ही परवाच्या दिवशी जेवण उरकून ऑफिसच्या आवारात राऊंड घेत असताना आमच्या समोरून पीटर येताना दिसला.... एकटाच!

पीटरला पाहताच सलीम पुढे सरसावला आणि थेट त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. जणू गेले चार-पाच दिवस सलीम जिथेतिथे पीटरचाच शोध घेत होता आणि आज पीटर नेमका त्याच्या तावडीत सापडला. आता दोघांमध्ये काहीतरी बाचाबाची होणार आणि प्रकरण हाणामारी पर्यंत गेले तर...... हा कॉलेजचा कट्टा नव्हता, तर ऑफिसचे आवार होते. इथे एक चूक आणि तुमची कारकीर्द उध्वस्त! सलीम पाठोपाठ मी सुद्धा पुढे सरसावलो. तशीच वेळ आली तर पटकन मांडवली बादशाह बनत मध्यस्थी करता येईल. पण घडले ते विपरीतच!

सलीम पीटरकडे बघत दिलखुलासपणे हसला. त्याचा हात हातात घेत बळजबरीचे हस्तालोंदन केले आणि त्याच्या डाव्या खांद्यावर थोपटत म्हणाला, थॅंक्स डूड .. थॅण्क्स !!

माझ्या सोबतीने पीटर देखील थोडासा गोंधळून गेला. तसे सलीम छद्मीपणे हसत म्हणाला, "माझ्या मनात तुझ्याबद्दल जराही राग नाही. खरे तर मी तुझे आभारच मानायला हवे. तुझ्यामुळेच माझी वेळीच जान्हवीपासून सुटका झाली. ती कशी मुलगी आहे हे मला वेळीच समजले. हेच जर लग्नानंतर घडले असते तर ... पण आता मला दुसरी एखादी चांगली मुलगी शोधता येईल जी फक्त माझ्यावरच प्रेम करणारी असेल. चूक सुधारायचा मला एक मौका तुझ्यामुळेच मिळाला .."

पण इथेच थांबतो तो माझा मित्र कसला. त्यानंतर त्याने खरा हुकमाचा पत्ता फेकला. नजरेत सांत्वनाचे (ढोंगी?) भाव आणत पीटरला म्हणाला, "तुझ्याबद्दल मात्र जरासे वाईट वाटते रे. तुझ्या डोक्यावर आता आयुष्यभरासाठी एक टांगती तलवार राहणार. जी मुलगी मला सोडून तुझ्याबरोबर येऊ शकते ती भविष्यात तुला सोडून इतर कोणाबरोबरही जाऊ शकते .... आणि हो, तुला जर असे वाटत असेल की तू तिच्यावर भरमसाठ प्रेम करून तिला कायमचे बांधून ठेवशील तर ते प्रेम कालच्या तारखेपर्यंत मी सुद्धा तिला भरभरून दिले होतेच. पण काय फायदा झाला... सो, बेस्ट ऑफ लक डूड, बेस्ट ऑफ लक !

एक (नाटकी?) सुस्कारा टाकून सलीम पुन्हा त्याच्या डाव्या खांद्यावर थोपटून पुढे निघून गेला तेव्हा पीटरची विचारमग्न मुद्रा माझ्या लबाड नजरेतून सुटली नाही.

पण खेळ इथेच संपत नव्हता. किंबहुना हा फर्स्ट पार्ट होता. त्यानंतर मला घेऊन सलीम तडक जान्हवीच्या विंगमध्ये शिरला आणि अंदाजानेच कॅंटीनच्या दिशेने गेला. ती तिथेच सापडली. त्याला पाहून ती हलकेच सटकू लागली तसे याने सराईतपणे तिला अडवले आणि तिलाही धन्यवाद म्हणतच तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. पुढचे काही मला ऐकू गेले नाही पण मागाहून जे काही सलीमकडून समजले ते असे - "जान्हू, मला सोडून तू पीटरच्या मागे गेलीस तिथेच माझे तुझ्याबद्दलचे प्रेम कायमचे संपले. जे प्रेम तुला थांबवू शकले नाही त्याची किंमत तिथेच शून्य झाली. पण आता तू मात्र विचार कर की तुला पीटरकडून कितपत प्रेम मिळेल. जसे तू मला सोडून त्याच्याबरोबर गेलीस तसे ईतर कोणाबरोबर जाणार तर नाहीस ना हि भिती त्याच्या मनात कायम राहणार आणि तू कितीही प्रयत्न केलास तरी तू असे वागणार नाहीस हे त्याला पटवून देऊ शकणार नाहीस. तसेच उद्या पुढेमागे तो तुला सोडून जाण्याची शक्यताही तितकीच प्रबळ आहे. कारण तू स्वता कोणालातरी सोडून त्याच्याजवळ गेल्याने त्या परिस्थितीत तुझ्याकडे त्याला जाब विचारायचा नैतिक अधिकार शिल्लक नसणार... सो, बेस्ट ऑफ लक जान्हू, बेस्ट ऑफ लक !

ईति ब्रेक अप के बाद वाला किस्सा समाप्त !

मी सलीमचे हात हातात घेत स्वताच्या डोक्याला लाऊन जय गुरूदेव म्हणत मनोमन त्याच्या पाया पडलो.
"काडी तर व्यवथित टाकलीस, पण आता पुढे तुझे काय?", असे विचारताच त्याने खूप सुंदर उत्तर दिले.
म्हणाला, "रिशी, म्हटलं तर काडी आणि म्हटलं तर वस्तुस्थिती. मी फक्त मला जी जाणीव झाली ती त्या दोघांनाही करून दिली. दॅट्स ईट! माझे म्हणशील तर जान्हवीशी प्रेमप्रकरण चालू असण्याच्या काळात मला काही मुली आवडल्या होत्या, काही ठिकाणी समोरूनही ग्रीन सिग्नल मिळत होते. पण जान्हवीशी एकनिष्ठ असल्या कारणाने मी ते सारे इग्नोर केले. बस्स आता त्यापैकीच एकाला पिवळा सिग्नल द्यायचाय. आयुष्याच्या गाडीला ब्रेक नसतात रे. तुमची मर्जी असो वा नसो, ती आपल्याच वेगाने पळत असते. तिला लाल सिग्नल पडला आहे असे समजण्याची आपणच जी चूक करतो तीच आपल्या आयुष्यात अपघात घडवते....
"लाईफ मस्ट गो ऑन..." हे किती सहज सुंदर शब्दात आणि स्वताच्या उदाहरणासह सांगून गेला, माझा मित्र सलीम !

बस्स आजच्या धरसोड वृत्तीच्या लव्हबर्डसनी यावर शांतपणे विचार केला आणि कुठेतरी, एकाला जरी, याचा फायदा झाला, तरी माझी टंकलिखाणाची मेहनत वसूल.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मे बी याच कारणाने ....... >>>> शक्य आहे. मी कुठेही असा दावा केला नाही की माझा मित्र यात निर्दोष किंवा निरागस आहे. तरी माझ्या माहितीप्रमाणे दोघांमध्ये खूप मस्त जमायचे जेणेकरून माझीही गर्लफ्रेंड मला त्यांचे उदाहरण द्यायची. त्यांच्यात ब्रेकअप आधी फारशी भांडणे वगैरेही पाहिली नाहीत. आणि मग एके दिवशी अचानक सहजच तुटले. याचा अर्थ जर असे मानले चुकी सलीमची होती तरी नाते टिकवण्याचा प्रयत्न समोरूनही झाला नसावा. तसेच जान्हवीने एक नाते तोडून पीटरशी जोडलेय हे कसे विसरता. आणि सलीम नही तो कोई और सही असे म्हणत पटकन तिने पीटरचा हात धरला नसून तो त्या आधीच तिच्या आयुष्यात आला असणार. म्हणजे त्या काळात सलीमचे एक लक्ष इतर मुलींच्या सिग्नलकडे होतेच असे गृहीत धरले तरी त्याच काळात जान्हवीने तर सरळ कोणाच्या सिग्नलला झेंडाही दाखवून झाला होता. आता इथे मला त्या जान्हवीलाही दोष द्यायचा नाही ना बदनाम करायचे आहे. पण सलीमचे प्रेम तकलादू म्हटल्यास जान्हवीचे त्यापेक्षा जास्त होते असे नक्की म्हणू शकतो.

जनरली प्रेमभंग झालेल्या मुलामुलींच्या आयुष्यात 'अब ये प्यार न होगा फिर हमसे' अशी एक स्टेज येते ती सलीमच्या आयुष्यात न येता >>>>>> एक्झॆक्टली हेच जान्हवीच्याही आयुष्यात न येता तिने अब ये प्यार होगा पीटरसे असे केले. ते ही ब्रेकअपच्या आधीच. क्या बात है!

जान्हवीशी एकनिष्ठ आहे म्हणून दुसरी मुलगी आवडूनही तिला नकार देणं आणि जान्हवीच्या प्रेमात असल्यामुळे दुसरी कोणी मनातच न भरणं यात खूप फरक आहे. >>> पुन्हा हे देखील जान्हवीलाही लागूच की... सलीमशी प्रेमप्रकरण चालू असताना पीटर तिच्या मनातच नाही भरला तर तिने त्याचा हातही धरला.

सलीम आपला जीव घेईल अशी शक्यता असतानाही पीटर आणि जान्हवी एकत्र आले जिवावर उदार होऊन म्हणजे त्यांचं एकमेकांवर भलतंच गाढ प्रेम असलं पाहिजे नाही का? >>>> हा मुद्दा मी जास्त गंभीरपणे घेत नाही. कारण अशी शक्यता लक्षात घेऊन घाबरून माघार घेणे हे छोटेमोठे अफेअर वा निव्वळ अ‍ॅट्रेक्शनमध्येही घडत नाही. त्यासाठी खूप प्रेमच असावे लागते असे काही नाही. अगदीच सलीम अंडरवर्ल्डमधील कोणी प्रथितयश गॅंगस्टर असता जो वेळ पडल्यास कायदाकानून धुडकावत एखाद्याचा गेम बजावू शकतो तरच हा मुद्दा बनला असता.

तळटीप - उद्या या पोस्टवर आणखी प्रतिवाद झाल्यास कदाचित मी उत्तर लागलीच न देता एखाद दिवस थांबेन हे आधीच नमूद करतो. Happy

पण सलीमचे प्रेम तकलादू म्हटल्यास जान्हवीचे त्यापेक्षा जास्त होते असे नक्की म्हणू शकतो.

तेच तर! सलीम जान्हवीची रिलेशनशिप तकलादू होती दोन्ही बाजूनी. त्यामुळे जान्हवीला दोष देण्यात आणि सलीमला सपोर्ट करण्यात काही अर्थ नाही.

ऋन्मेष,

तुम्ही सतीष देवपुरकरांना ओळखता का? किंवा कामाच्या संदर्भात तुमचा त्यांच्याशी काही परिचय?
त्यांच्या ग्रूपमधले त्यांना प्रोफेसर म्हणूनही ओळखतात.

ओये काय हे,
एवढ्या मोठ्या पोस्टला एका वाक्यात निष्कर्ष काढून निपटवले ... Sad

जान्हवीचे प्रेम आणि कमिटमेंट तकलादू होते हे मान्य केलेत याबद्दल धन्यवाद, पण सलीम कसा लगेच तकलादू झाला. फक्त प्रेमप्रकरणाच्या काळात इतर मुलीही आसपास आहेत याचे भान त्याला असल्याने तो तसा ठरतो का? आपल्याला हिरझारा वीररांझा टाईप प्रेम अपेक्षित असल्यास ते चित्रपट आणि नॉवेलमध्येच होते. मी सुद्धा या सर्व फेजमधून गेलोय जातोय, त्यावरून सांगू शकतो की आपण म्हणता तसे इतर मुलींचा विचारही मनात न येणे हे सुरुवातीला होते पण नंतर रूटीन लाईफ चालू झाल्यावर इतर जगही आहे याचे भान असते, पण म्हणून प्रेम कमी झाले असे नसते .. कुठेतरी एखादी छानशी मुलगी दिसल्यास तिला वळून पाहणे वेगळे आणि प्रतारणा करणे वेगळे ..

हुप्पाहुय्या,
नाही.
काही विशेष Happy

ऋन्मेऽऽष

<< आपल्याला हिरझारा वीररांझा टाईप प्रेम अपेक्षित असल्यास ते चित्रपट आणि नॉवेलमध्येच होते. >>

नक्कीच मी तरी प्रत्यक्षात अजून लेस्बियन प्रेमिक आणि गे प्रेमिक पाहिले नाहीत.

हिरः- महिला, झारा:- महिला
वीरः- पुरुष, रांझा:- पुरुष

सबब आपण बनविलेल्या दोन जोड्यांपैकी हिरझारा ही लेस्बियन जोडी आणि वीररांझा ही गे जोडी होईल.

चेतनजी Proud
मी ते मुद्दामून लिहिलेले. असे छोटेमोठे शब्द इकडचे तिकडे अन याचे त्याला करणे हा माझ्या आवडीचा खेळ आहे Happy

पण एक फायदा तर झाला याचा, मला हिर-रांझा जोडीत कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे हे नावावरून कधी समजले नव्हते, ते आज समजले.

इकडचे तिकडे अन याचे त्याला करणे हा माझ्या आवडीचा खेळ आहे >> तुम्ही जे बीबी उघडताय त्यावरून ते कळतंच आहे. वेगळं सांगण्याचं प्रयोजन कळलं नाही. Proud Light 1
असो... फार वेळ असतो तुमच्याकडे इतकं तर नक्कीच समजलंय.

देवपुरांकराबद्दल विचारले कारण तुमचे विचार आणि तुमचं लिखाण एकदम त्यांच्याच तालमीत तयार झाल्यासारखे वाटतंय.
निकृष्टं दर्जाचं लिखाण, अर्थाअर्थी संबंध नसललेल्या आणि मनरचित गोष्टी घुसडणे, बाळबोध लॉजिक, ऊठसूट जनरलायझेशन करायचा हट्ट, दुसर्‍याच्या एका प्रतिसादासाठी आपले दोन ऊथळ प्रतिसाद, 'गिरे भी तो पैर ऊपर' टाईप्स मानसिकता.

तुम्ही चालू द्या! मायबोलीवर गिर्‍हाईकांची कमी नाही, लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला कस्टमर आहे ईथे. तुम्हालाही नाऊमेद करणार नाही ईथली पब्लिक.

काही व्यक्तीसाठी प्रेम म्हणजे नसतं …. म्हणून आजकालची पिढी girlfriend or Boyfriend शोधताना सगळीकडे दिसतात.
>>>>>>

हे माझे वाक्य असते तर जनरलायझेशनचा धादांत आरोप झाला असता Wink

असो, पण आपण म्हणता तसे चित्र दिसतेय खरे. किंबहुना येणार्‍या प्रत्येक नवीन पिढीत त्याचे प्रमाण वाढतेय. याला मोठ्या प्रमाणात जबाबदार फेसबूकसारख्या सोशलसाईटस देखील आहेत. आणि म्हणूनच मी माझे फेसबूकचे अकाऊंट कायमचे उडवून मायबोलीवर आलो आहे.

हुप्पाहुय्या,
माझे आजवरचे लिखाण आणि प्रतिसाद वाचले याबद्दल आणि त्याची दखल घेत दिलेल्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद !

याला मोठ्या प्रमाणात जबाबदार फेसबूकसारख्या सोशलसाईटस देखील आहेत. आणि म्हणूनच मी माझे फेसबूकचे अकाऊंट कायमचे उडवून मायबोलीवर आलो आहे.>>
हे असं आहे होय, मग चालुद्या, आम्ही उगाच 'सिरीयस मोड' वर आलो होतो. Wink Light 1
बाकी दोन्ही साइटसवर भरपुर टाइम पासही आहे आणि उपयोगही आहे, जे पहिजे ते घ्या..

बाकी दोन्ही साइटसवर भरपुर टाइम पासही आहे आणि उपयोगही आहे, जे पहिजे ते घ्या..>> धाग्यावरील एकमेव उपयुक्त वाक्य!!

हुप्पाहुय्या,
दुसर्‍याच्या एका प्रतिसादासाठी आपले दोन ऊथळ प्रतिसाद,
>>>>>>>>>

हि लिंक बघा माझ्या कालच्या धाग्याची - http://www.maayboli.com/node/50969
इथे ५० च्या वर प्रतिसाद झालेत पण माझा एकही प्रतिसाद नाही.
आय रीपीट, त्या ५०+ प्रतिसादांत माझा एकही प्रतिसाद नाही.

तर यावरही आपले एक्स्पर्ट कॉमेंट येऊ द्या. इथे किंवा तिथे त्या धाग्यावर.
आणि शक्य असल्यास अवलोकन करून माझ्यावरचा घृणास्पद आरोप मागे घ्या. Happy

अरे पण ऋन्मेऽऽष, कदाचित सलीमच्या काही गोष्टी ह्या जान्हवीला पटत नसतील म्हणून लग्ना आधीच तिने हा निर्णय घेतला असावा , अर्थात सलीम कधी तुला स्वताची चूक नाहीच सांगणार पण खर सांगायचं तर उगीच कोणतीही मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला सोडत नाही.

sorry पण मला हा सलीम काही चांगला ,महान वगैरे वाटत नाही .

मला तर तो सूड बुद्धीने वागणारा वाटला
मला सोडलस का आता मी तुझ्या नव्या नात्यात विष कालवणार अश्या वृत्तीचा वाटला
दुसर्यांच्या नात्यात विष कालवून तत्त्वज्ञाचा आव आणला

त्यामुळे जान्हवीने जे केल ते योग्यच केलं
कारण तुमचा मित्र खरच चांगला असता तर अस वागला नसता जर त्याला जान्हवीचा राग आला होता ,किंवा वाईट वाटल होत तर तिला जाउन चार शिव्या द्यायच्या होत्या
पण जान्हवी आणि पीटर च्या नात्यात अविश्वास आणि असुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न करून त्याने हे सिद्ध केल कि जान्हवीचा त्याला सोडण्याचा निर्णय अगदी योग्य होता
मुळात तिने ह्याला का सोडल ? पीटर तिच्या आयुष्यात कसा आला ?
ह्याची नक्की कारणं तुम्हाला माहीत आहेत का ?
कारण जरी हे नात तुटण्यात सलीमची चूक असेल तरी तो स्वतः ची चूक थोडीच सांगणार
कारण लोक स्वतःची चूक कधी सांगत नसतात फक्त समोरच्याची चूक बघतात

त्यांचं नात तुम्हाला वरून छान छान वाटत होत म्हणजे ते तस असेलच अस काही नाही
प्रियकर प्रेयसी ,नवरा बायको ह्याचं आपापसातल नात नक्की कस आहे हे फक्त त्या दोघांनाच
माहित असतं

तुम्ही जान्हवीशी कधी बोलला आहात का ?
विचारलं का कि तिने सलीमला का सोडलं ?
जर नाही तर तुम्ही कशावरून हा निष्कर्ष काढलात कि जान्हवीच प्रेम तकलादू होत
दोन्ही बाजू जाणून घेतल्याशिवाय कुठलाही निष्कर्ष काढू नये

उदाहरणार्थ एखाद्या नवरा बायको मध्ये नवरा जर बायकोला छळत असेल म्हणून तिने जर नवऱ्याला सोडलं तर तुम्ही अस म्हणणार का कि बायकोच प्रेम तकलादू होत कारण तिने आधी सोडल नवर्याला

anyways leave it
all the best to Janhavi ,Peter & Saleem

पण खर सांगायचं तर उगीच कोणतीही मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला सोडत नाही.
>>>>>>>

मुली नक्कीच तुलनेत मुलांपेक्षा जास्त एकनिष्ठ असतात, नात्याला जास्त जपतात हे कबूल.
पण वरचे ठाम विधान मात्र अशक्यय Happy

उलट मुलीने सोडले म्हणजे मुलाचीच चुकी असणार आणि मुलाने सोडले तर अर्थातच मुलाचीच चुकी असणार हा तर अन्याय आहे मायलॉर्ड!

मनरंग,
पटतेय, वर आधीही एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सलीमला थोर मी कुठेच म्हणालो नाही.
सलीमची चूक नसताना त्याला जान्हवीने सोडल्यास तिच्या त्या नात्यात ज्यासाठी तिने सलीमला सोडले त्यात सूडबुद्धी दाखवत विषही कालवायचे नाही हे तर फारच मोठे संतांचे लक्षण वा गांधीगिरी झाली. अर्थात गांधीगिरीचेही (मला गांधीजींचे म्हणायचे नाही) कौतुक करण्यापेक्षा नावे ठेवणारेच या जगात जास्त लोक आहेत हि वस्तुस्थिती आहेच.

वर कोणीतरी सलीमचे प्रेम तकलादू म्हणाले म्हणून मी तोच निकष लाऊन मग जान्हवीचे तकलादू असे प्रतिसादांता म्हटलेय. लेखात असा कुठेही उल्लेख नाही की तसा लेखाचा रोख नाही.

बाकी तुम्ही ज्याला विष कालवणे म्हणत आहात त्याचा प्रभाव तेव्हाच जेव्हा जान्हवी आणि पीटरचे प्रेम तकलादू असेल. Happy

असो, थँक्स फॉर युअर विशेस. सलीम जान्हवी पीटर तिघांचेही भले व्हावे हिच माझीही प्रार्थना Happy

कटूसत्य...

वेदिकाताई:
सलीम आपला जीव घेईल
अशी शक्यता असतानाही पीटर
आणि जान्हवी एकत्र आले जिवावर उदार
होऊन म्हणजे त्यांचं एकमेकांवर भलतंच गाढ प्रेम
असलं पाहिजे नाही का?
≥>>>>>>>>

जाह्नवीला असा साक्षात्कार एकदा झाला म्हणजे पुन्हा कधीही होऊ शकतो.. कारण nobody is perfect..
तिचा परफेक्ट जोडीदाराचा शोध न संपणारा असू शकते.

माझं व्यक्तिगत मत आहे कि एखादे नाते जोडणे जितके महत्वपूर्ण असते, त्याहीपेक्शा ते टिकवणे महत्वाचे आहे. अहंकार आणि जोडीदाराला कमी लेखणे याचे पर्यवसान पुढे ब्रेक अप मधे होते.

मनरंग: आपलं म्हणणं पटतंय.. पण gf सोडून गेली म्हणून रडत बसण्यापेक्शा त्याने अश्रूंचे destination तेवढे बदलायचा प्रयत्न केला.... Wink

लिहिलेलं योग्य वाटल... पण ते व्हाईस वर्सा हि असाव... (म्हणजे एखाद्या मुलीला असा अनुभव आला तर तिनेही अश्रू ढाळत न बसता सलीमप्रमाणे कुटनीती वापरावी).

उद्या जान्हवीने सलिमची जी कोण संभाव्य असेल तिला भेटून सांगितले की...बघ बाई..मी त्याच्याबरोबर नाही राहू शकले..त्याच्यापेक्षा सुयोग्य जोडीदार मला पीटर वाटला आणि सामंजस्याने आम्ही रिलेशनशिप संपवले...पण त्याने पीटरला भेटून आमच्या नात्यात विष कालवले...
तुही बघ तुझे फ्युचर..तुला या माणसाबरोबर आयुष्य काढायचे आहे...तुझे नशिब आणि तू...

आणि सलिमला भेटून असे सांगितले - तुझ्या या अशा विष कालवण्याच्या वृत्तीमुळेच मी तुला सोडून गेल्याचा निर्णय बरोबर वाटत आहे. मला वाटत नाही कुठली मुलगी तुझ्याबरोबर जास्त वेळ टिकू शकेल रादर तुला हे रिलेशन टिकवता येईल.

मयुरी,
पण ते व्हाईस वर्सा हि असाव... >> व्हाई नॉट व्हाई नॉट, नक्कीच Happy

आशुचँप,
वाह बेटा, सलीमची गोळी सलीमलाच ..
(वाह बेटा संबोधन न घेता उद्गारवाचक म्हणून घ्यावे Happy )

पण मला वाटते संदर्भ बदलतील.

एक म्हणजे सलीमने जान्हवीला नाही तर सलीमला जान्हवी सोडून पीटरकडे गेलीय. सलीमच्या आयुष्यात येणार्‍या मुलीला हे ठाऊक असणारच, त्यामुळे ती जान्हवीला थारा देणार नाही. तिचे काही ऐकायच्या आधीच ती आपल्या आयुष्यात विष कालवायला आलीय अशीच धारणा असणार.

तसेच सलीमने त्यांच्या नात्यात शाब्दिक विष पेरलेय, तिला विष पाजायचा क्रूरपणा नाही केलाय. तर हा काही सलीम चांगला मुलगा नाही हे दाखवायचा मुद्दा होऊ शकत नाही.

याउपर सलीमने आपल्या नवीन प्रेयसीला प्रामाणिकपणे आधीच सांगितले असेल की मी आधीच्या प्रेमभंगात रडत न बसता असे केले होते तर मग प्रश्नच मिटला की ..

( बाकी हा प्रकार जान्हवी तेव्हाच करायला येईल जेव्हा तिचे आणि पीटरचे ब्रेक अप होईल. मेला आमचा सलीम त्यानेच खुश होईल Wink )

आयुष्याच्या गाडीला ब्रेक नसतात रे..... तुमची मर्जी असो वा नसो, ती आपल्याच वेगाने पळत असते. तिला लाल सिग्नल पडला आहे असे समजण्याची आपणच जी चूक करतो तीच आपल्या आयुष्यात अपघात घडवते....
"लाईफ मस्ट गो ऑन.."

मस्तच...

गुड्डू, धन्यवाद Happy

अबिर, तो तसा नाहीये, हे मला माहीत आहे, तरीही तो तसा लेखातून वाटत असेल तर मी लिहिण्यात कुठेतरी कमी पडलो. Happy

सलीम विघ्नसंतोषी मानसिकता असलेला मनुष्य आहे. >>
असे लेखातून खरेच वाटत आहे...जर त्याचे खरेच प्रेम होते तिच्यावर, तर त्याने हे कधीही केले नसते..

पण खर सांगायचं तर उगीच कोणतीही मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला सोडत नाही.
>>>>>>> हे बरेचदा खरे असते... (स्वानुभव)..फक्त ती कारणे समजणे कठीण असते..

आयुष्याच्या गाडीला ब्रेक नसतात रे..... तुमची मर्जी असो वा नसो, ती आपल्याच वेगाने पळत असते. तिला लाल सिग्नल पडला आहे असे समजण्याची आपणच जी चूक करतो तीच आपल्या आयुष्यात अपघात घडवते....
"लाईफ मस्ट गो ऑन..>>

हे आवडले..

असे लेखातून खरेच वाटत आहे...जर त्याचे खरेच प्रेम होते तिच्यावर, तर त्याने हे कधीही केले नसते..

+१११११

Pages