नाकावरच्या रागाला औषध काय ?

Submitted by prajo76 on 11 September, 2014 - 02:25

काहि वर्षांपुर्वी एक चित्रपट आला होता. कळत नकळत्...त्यातलं गाणं आठवतंय ?..
नाकावरच्या रागाला औषध काय ?

अशोक सराफ या माणसाचं किती कौतूक करावं तेवढं थोडंच आहे. ह्या माणसाने ह्या गाण्याचं सोनं केलय हे मात्र अगदि नक्कि. लहानग्या मुलीला..समजावताना..मधेच तिची खोडी काढ्णे...केवळ अप्रतीम.

गाण्याच्या शेवट्च्या कडव्यात..नाकावरच्या रागाला औषध काय ? हे म्हणताना..त्याने मुलिच्या आई कडे पाहुन जो कटाक्ष टाकला आहे तो खूप काहि सांगून जातो....

काहि वेळा माणुस खरच चुकतो. पण खरि चूक कबूल केली असेल तर त्या माणसाला माफ करणे योग्य. असो....

उल्लेख करावा असे वाट्ले म्हणून लिहिले....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे गाणं माझं पण आवडतं आहे. लेकीला सुद्धा बघायला आवडतं ते..
त्या कटाक्षाबद्दल + १.. कथेला अनुसरून गाण्याच्या योग्य ओळीवर आलाय तो..

अशोक सराफ, आज अनेक वर्षे आपला आब संभाळून आहे. अजूनही त्याच्या अभिनयाचा कस लागेल अशी भुमिका
त्याला मिळालीच नाही असे वाटतेय.

त्याच्या बरोबरचे रविंद्र महाजनी, रविराज, संजय जोग.. असे कितीतरी कलाकार पुढे गायब झाले.

बाय द वे, Dilantin नावाचे एक औषध नाकावरच्या रागावर उपयोगी पडेल, असे डॉ. बाळ फोंडके यांच्या एका लेखात वाचले.. अर्थातच ते तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचे असते. साईड इफेक्ट्स आहेत Happy

अशोक सराफची सर्वोत्कृष्ट भूमिका (माझ्या मते) भस्म्या या पिक्चरमध्ये होती. त्यात तो मसणजोगी दाखवला आहे. अत्यंत गंभीर असलेली भूमिका त्याने अप्रतिम केली आहे.

माझी लेक वय वर्षे ४, हिने गेल्याच महिन्यात हे गाणे पाहिले तिला ते एव्हढे आवडले की काही दिवस रोज ती मुद्दाम रुसुन बसायची आणि मी तिच्यासाठी हे गाणे म्हणायची. शेवटच्या कडव्याला बंडु आणि पांडुच्या गोष्टीला लगेच ती हसुन 'तुच तुच' म्हणुन हसत बसायची.
मस्तच आहे गाणं. ती खरोखर जरी रडु लागली आणि हे गाणं म्हंटलं तरी ती खुश होते.

मस्तं गाणं आहे.
आता व्हिडिओ मिळवून मुलांना दाखवायला पाहिजे.

त्यातलं 'जपानी काय शिकायची असते , ती तर बोलायची असते' हे खूप गोड आहे.