हिंदी आणि कानडी भाषेत मायबोलीचं एक छोटं पाऊल
या गणेशचतुर्थीला मायबोलीला १८ वर्षे पूर्ण झाली आणि त्याच शुभमुहुर्तावर मायबोलीने हिंदी आणि कानडी भाषेतल्या वेबसाईट सुरु केल्या आहेत.
२०१२ मधे बातम्या.कॉम ही वेबसाईट मायबोली समुहाचा भाग बनली. या दोन वर्षात या साईटला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. एक थोडी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मायबोली.कॉम किंवा बातम्या.कॉम या ठिकाणी पहिल्यांदा धडकणारा वाचकवर्ग हा बहुतांशी वेगळा आहे. आणि हळूहळू त्यांना दुसर्या साईटची माहीती होते आहे :)
"आमची कुठेही शाखा नाही" असे म्हणायचे दिवस संपले. किंवा आजच्या स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर जितक्या जास्त ठिकाणी तुमची शाखा असेल तितकं चांगलं हे व्यावसायिक यशाचं सूत्र होत चाललं आहे.
बातम्या.कॉमच्या साचावर आधारित या दोन वेबसाईट सुरू करून महाराष्ट्राच्या अंगणापलीकडे पाय टाकण्याचं धाडस करतो आहोत. पहिल्यांदाच या दोन भाषांमधे काम करतो आहोत. कानडी फाँंटही आमच्यासाठी नवीन आहे. काही चुका राहिल्या असतील, आणि त्या इथे सांगितल्या तर आम्हाला दुरुस्त करता येतील.
hindi.khabar.io - हिंदी.खबर.आयो - खबर आयो, समाचार लायो !
kannada.khabar.io - kannada suddi - ಕನ್ನಡ.ಖಬರ್.ಅಯೋ - ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿ ಆನ್ಲೈನ್
अनेकानेक शुभाशयगळू! वंदु
अनेकानेक शुभाशयगळू!
वंदु मायबोलीप्रकार साईट कन्नडभाषादल्ली चालु माड बिडी.
>> साती, वळ्ळे कल्पना. ननगे कन्नडा टायपिंग बरूदुल्ला, निने क्लास तोगोरी.
मायबोली, हार्दिक अभिनंदन.
लै भारी बॉस! अभिनंदन आणि
लै भारी बॉस! अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
इतर भाषांकरताही त्यांच्या त्यांच्य मायबोली साईट्स सुरू करायला हरकत नाही खरंतर.
(रच्याकने, अॅडमिन, थोड्या स्माईली अॅड करा ना. टाळ्या वाजवता येत नाही.)
अभिनंदन!
अभिनंदन!
Pages