बघायलाच हवा, असा नसावा हा "रमा-माधव"

Submitted by मनिषा लिमये on 3 September, 2014 - 23:22

" रमा माधव"
नाही भावला हा चित्रपट.कदाचित मी फार फार जास्त अपेक्षेने गेले बघायला पण नाही भावला .
स्वामी ची कित्येक पारायणं केली तरीही पुन्हा पुन्हा वाचावीशी वाट्ते पण हा चित्रपट नाही भावला.
मुळात हमामा, आरती, मुजरा, रमा माधवाचे प्रेमगीत, मंगळागौरीचे गाणे या सगळ्याची एकत्र मोट बांधण्याचा किंवा हे सग़ळ एकत्र कोंबण्याचा प्रयत्न अनाठायी वाट्ला. त्यातही मुजर्‍याची खरंच आवश्यक्ता होतीच का असा प्रश्न पडला ज्याचं माझ्या मनातलं उत्तर 'नाही' असं आलं
तसंच तालमीतला प्रसंग. कितीही काही झालं तरी त्या काळात स्त्रीया, त्याही पेशव्यांच्या स्त्रीया [मग त्या कितीही लहान असेनात] , त्यातही सुना अशा सहज तालमीत जाऊ शकायच्या का? याबद्दल शंकाच वाट्ते.
पात्रनिवडीबाबत रविंद्र मंकणी आणि अमोल कोल्हे सोडता पेशव्यांचा आब कोणालाही नीट दाखवता आला नाही.राघोबा आपल्या पुतण्याला ,मुजर्‍याला जाण्यापुर्वी आपल्याबरोबर यायचा आग्रह करतात तो प्रसंग तर फारच वाईट. ते पेशवे [म्हणजे त्यांचे बंधु ] होते आणि ते इतक्या सहज आपल्या पुतण्याला [जो पेशवेपुत्र व भावी पेशवा असु शकतो] असं सांगतील हे पटत नाही.
तरीही काही वगळता पात्रनिवड ओके आहे छोटी रमा मोठ्ठी गोड वाटली..मोठी छान आहे.
सोनाली कुलकर्णी खरंच खानदानी पेशवीण नाही वाटली. मला तर सतत असं वाटत होतं की आता ही कोणत्याही क्षणी उठून लावणी नाचायला लागेलं.
मात्र पार्वतीबाई छान वाटल्या. पण तोतया येतो तेव्हा पायरीवरच बसकण मारुन रडतानाचा प्रसग पाहुन वाटले की काहीही असले तरी राजघराण्यातल्या स्त्रीया असे कुठेही बसून आपल्या भावना व्यक्त करत असतील का? [माहीत नाही]
संपुर्ण चित्रपटात मृणाल कुलकर्णी स्वतःला विसरत नाही. खुप भव्यदिव्य दाखवण्याच्या नादात बरंच काही हरवतंय असं वाट्त रहात आणि जे दिसतं ते तितकंही भव्यदिव्य दिसत नाहीये याची जाणीव होतं रहाते.नेपथ्यापेक्षा साड्या आणि दागिन्यात जास्त अडकलाय चित्रपट असं वाट्तं रहातं आणि त्त्यामुळे एखादं चांगल चित्र आणखीन चांगल करण्याच्या नादात चित्र कधी बिघडत जातं ते कळतच नाही.तसंच काहीस झालंय ...

असो आणखी खुप काही आठवेल तसे लिहिते यात

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्फेक्ट परीक्षण. नाय आवडला. मृणाल कुलकर्णी बाई गुडी गुडी दिसायच्या नादात, माधुरीसारखे सतत हसण्याच्या नादात, स्वतःवर सतत कॅमेराचा फोकस ठेवण्याच्या नादात, आणी लाडे लाडे बोलण्याच्या नादात अभिनय करायला विसरतात. त्या अजूनही रमाबाई च्या इमेज मधुन बाहेर पडु इच्छितच नाहीत.

हे असे भ्रमनिरास फार होतात आजकालच्या सिनेमाबद्दल..रमा माधव पाहिला नाहीये अजून पण एकूण कल्पना आलीच ट्रेलर पाहून. ४ आण्याची कोंबडी आणि १२ आण्याचा मसाला!

१००% सहमत. पोषाखीपणा जास्त आहे. मी तर मध्ये झोप काढली एक तो आजारी पडल्यावर. फेसबुक वर इथे तिथे प्रिमीअरचे बायकांचे नटून थटून फोटो आहेत निव्वळ. मुळात कथेतच फार जीव नाही. प्रेम कथा आहे असे उगीच प्रचार करून ठसवल्यासारखे वाटते. हू नोज? मृणालच्या पात्राला वैधव्य आले आहे असे काहीही चेहर्‍यावर दिसत नाही. रमे चा पार्ट केलेली बाई चक्क बावळट दिसते चेहृयावरून. पुणेरी पणा थोडा वेळ बरा वाट्तो. लूट लियो गाणे मस्त आहे बाकी. पण ते तेव्ढेच. त्रिगुणी पैठणी का काय आहे त्याची आणि त्या एकूण पेशवाई लुकची डिमांड येणार एनाराय ललनांमध्ये असे वाटते.

सती जाते तेव्हाचा प्रसंग पण पोषाखीच वाट्तो. प्रसंगाचे गांभीर्य, कारुण्य, क्रौर्य दिसत नाही.

त्रिगुणी पैठणी का काय आहे त्याची आणि त्या एकूण पेशवाई लुकची डिमांड येणार एनाराय ललनांमध्ये असे वाटते.

Happy Happy Happy Happy


नेपथ्यापेक्षा साड्या आणि दागिन्यात जास्त अडकलाय चित्रपट असं वाट्तं रहातं आणि त्त्यामुळे एखादं चांगल चित्र आणखीन चांगल करण्याच्या नादात चित्र कधी बिघडत जातं ते कळतच नाही.तसंच काहीस झालंय ...

हे खुप वेळा होते. बहुतेक तिहासकालीन चित्रपट केवळ इतिहासकालीन दिसण्याइतपतच इतिहासकालीन राहतात. बाकी जे दाखवतात ते कलाकाराचे स्वातंत्र्य नावाखाली खपवतात.

माझे काही मुद्दे:
(१) माधवरावांनी रघुनाथरावांना नजरकैदेत टाकणे आणि मग रघुनाथरावांनी माधवरावांना कैदेत टाकणे हे घडते. माधवराव विचारतात "तुम्ही मला कैदेत टाकले त्याचे काही कारण असेलच ना?" त्याचे उत्तर मिळत नाही. फोकस प्रेमकथेवर आहे हे मान्य पण मग हे स्पष्टीकरण आणि आगापिछा नसलेले दोन प्रसंग नसते तरी चालले असते किंवा मग स्पष्टीकरण द्यायला हवे होते.

(२) माधवरावांवर खूनी हल्ला होतो तेव्हा माधवराव स्वतः सावध असल्याने वाचतात. मग नंतर त्या सैनिकाला जेरबंद केले जाते. इथे माधवरावांना इतर सैनिकांनी वाचवले असे दाखवले आहे.

(३) सदाशिवरावभाऊ "पडल्यावर" त्यांच्या पत्नी पार्वतीबाईंसाहेबांना भाऊंच्या काही विश्वासू सरदारांनी पानिपतावरुन शिताफीने बाहेर काढून पुण्याला आणले. वाटेत मल्हारराव होळकर यांनी या कामी मदत केली. चित्रपटात मात्र या पानिपतावर गेलेल्या दाखवलेल्या नाहीत (चु.भु.द्या.घ्या).

(४) चित्रपटात माधवरावांचे डोके रमाबाईसाहेब श्रीगजाननाच्या देवळातच मांडीवर घेतात असे दाखवले आहे. माझ्या माहितीनुसार सती जाताना चितेवर बसल्यावर असे करत असत व रमाबाईंनी देखील तसेच केले होते.

मुद्दे क्रमांक २, ३, व ४ या बाबतीतः कलात्मक स्वातंत्र्य (creative freedom) या नावाखाली असल्या चुका अपेक्षित नाहीत.

या चारही चुका टाळल्या असत्या तर लेखात व प्रतिसादांत वर्णिलेल्या मुद्द्यांसकट हा सिनेमा आणखी चांगला करता आला असता.

मी त्या गोपिका बाई इत्यादी बाफ वर पण लिहीले होते या बाबत. चुरुचुरू बोलणारी नौवारीतली बारकी मुलगी, पेश्वाई मेकप वगैरे ही एक टेंप्लेट झाली आहे. वावर आधुनिकच. शनिवार वाड्याच्या बाल्कनीतून पर्वती पाहण्याचा सीन, मयुर पलंग वगैरे खूप गोड पण खूप काल्पनिक आहे. एव्हरीथिंग इज सो ग्लॉसी. मृणालचे पात्र पुरूषांबरोबर बैठकीत बसते. पण ते नुसतेच. काहीही धडाडी नाही. चुकीचे निर्णय आणि फालतू रुसवे फुगवे. मुलगा आम्हाला पोरके करून जाऊ नका म्हणतो हा सीन अतिशय छान करता आला असता. पण तो शॅलो झाला आहे. त्यापेक्षा गेम ऑफ थ्रोन्स मध्ये खूप डेप्थ आहे.

ट्रेलर पाहिला आहे, पण तेव्हाच फार भडक आणि नाटकी वाटत होते.
पुर्ण चित्रपट पाहिला तर कसा असेल असा विचार करत होतोच.

मी बघितला नाही पण तूम्हा सर्वांचे मत योग्य असेल अशी खात्री आहे. आजकाल चित्रीकरणाचा दर्जा खुप सुधारलाय त्यामूळे प्रत्येक फ्रेम जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात कथानक आणि पात्रे
हरवतात.
"भारत एक खोज" या मालिकेत हे सर्व टाळले होते. सर्व कथा आणि पात्रे अस्सल वाटत असत त्यातली.

<<पात्रनिवडीबाबत रविंद्र मंकणी आणि अमोल कोल्हे सोडता पेशव्यांचा आब कोणालाही नीट दाखवता आला नाही.>>

मी सिनेमा नाही पाह्यलाय पण ट्रेलर बघून तरी वाटलं की प्रसाद ओकनेही चांगलं काम केलं असावं (कारण तो जनरली चांगलंच काम करतो ;)). बाकी मंकणी आणि अमोलचा प्रश्नच नाही. त्यातही अमोलचं विशेष कौतुक वाटतं की आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भाऊसाहेब पेशवे- सगळ्या ऐतिहासिक भूमिका ताकदीने पेलतो.

पण माधवरावांच्या भूमिकेत जो नविन मुलगा आहे तो तितका इम्प्रेसिव्ह नाही वाटला.

अजून एक मुद्दा म्हणजे-

मी ती स्वामी सिरीयल लहानपणी बघितली होती. त्यात माधवरावांचा पराक्रम, कर्तबगारी, त्यांनी मिळवलेलं यश यापेक्षा त्यांचं आजारपण आणि रिलेटेड रडारड हेच आठवतं जास्ती. कसली डिप्रेसिंग सिरीयल होती. म्हणजे ते तसं घडलं होतं हे मान्य, पण ते आजारपण, सती जाणं हे डिटेलमध्ये दाखवायला हवंच होतं का? मी जर हा सिनेमा केला असता तर माधवराव पानिपताच्या पराभवाचा कलंक पुसून मराठी साम्राज्याची घडी पुन्हा नीट बसवतात अशा happy note वर संपवला असता.

स्वामी मालिका स्वामी कादंबरीवर आधारित होती त्यामुळे त्या कादंबरीचा फोकस हाच मालिकेचा फोकस होता. कुठेही डिप्रेसिंग असल्याचं तरी कधी वाटलं नाही
आणि त्या मालिकेतही संबंधित राजकारण अतिशय उत्तम दाखवलं होतं. परफेक्ट कास्टिंग - बाळ आपटेंचे इच्छारामपंत, सूर्यकांत मल्हारराव होळकर, चारुशीला पटवर्धनांची आनंदीबाई, दया डोंगरेंची गोपिकाबाई आणि सगळ्यात प्रभावी काम होतं श्रीकांत मोघेंनी रंगवलेला राघोबादादा... रवींद्र मंकणी विषयी प्रश्नच नाही. अगदी स्पष्टच बोलायचं तर माझ्यासाठी तरी या प्रतिमा सहजी पुसल्या जाणं शक्य नाही.
सती जाणं दाखवलं नव्हतं मालिकेत - नुकतंच रूपकंवर प्रकरण झाल्यामुळे

सोनाली कुलकर्णी खरंच खानदानी पेशवीण नाही वाटली. मला तर सतत असं वाटत होतं की आता ही कोणत्याही क्षणी उठून लावणी नाचायला लागेलं. <<<< Lol

इंटरेस्टिंग परीक्षण. पहिल्यांदाच या चित्रपटाबद्दल असे मत वाचले. याआधीची सगळी वाचलेली मते खूप प्रशंसा करणारी होती.

दिनेश - भारत एक खोज पार दुसरे टोक वाटायचे मला. चुकून सुद्धा कोणी सुंदर दिसता कामा नये टाईप. शकुंतला सुद्धा बोअर होती त्यातली.

वरदा - श्रीकांत मोघे जबरी वाटला होता त्यात. नारायणरावाच्या खुनामुळे राघोबा व्हिलन झाला, पण तोपर्यंतच्या त्याच्या कॅरेक्टर मधे इतिहासकारांनी त्याला एवढा खलनायकी का दाखवला आहे कळत नाही. पेशवा होण्याची इच्छा हे एकच कारण होते का?

अरे यार!!! का असे शिणुमे काढतात??? ऐतिहासिक वगैरे सिनेमे काढताना जरा काळाचं भान ठेवायला हवं इतकी साधी अपेक्षाही का पूर्ण करत नाहीत?

लेखाचं शीर्षक इतकं कन्फ्युजिंग का आहे ??

>>> शिणुमा पाहून आल्यावर मलिच्या डोक्याचं जे झालंय त्याचं प्रतिक म्हणून तिनं हे शीर्षक ठेवलंय बहुतेक . असू देत बदलू नकोस. त्यामुळे प्रसंगाचं गांभिर्य लक्षात येतंय.

ट्रेलर पाहिला होता तेव्हा इन्टरेस्टिंग असेल असे वाटले. मग यू ट्युब वरच्या मुलाखतीत ते मुजरा, काही भन्साली टाइप दृष्ये वगैरे पाहून जरा शंका आली होती. बघायला केव्हा मिळेल माहित नाही, पण हे परीक्षण वाचून आता पूर्वग्रह नक्की असेल मनात. अमांच्या पोस्टी भारी आहेत Happy

वरदा + १
न.न्दिनी + १
स्वामी ने वेगळीच छाप सोडली होती, पात्र-निवड पण अगदी परफेक्ट होती,
माझी ट्रेलर बघुन अजुन तरी उत्सुकता टिकुन आहे.
मुर्णाल आत्ताच डायरेक्शन आणी चित्रपट निर्मितीत उतरतेय, होइल हळहळु तयार.. अर्थात एतिहासिक कथानक मनोर.न्जक करुन दाखवण आव्हानात्मकच ठरले असणार.. बाकी चित्रपट बघितल्यावरच कळेल..

फक्त एकच ट्रेलर पाहिला होता ज्यात सोनाली कुलकर्णी 'आनंदीबाई' असं म्हणून काहीतरी बोलते. तिचा ते नाव घेतानाचा अ‍ॅक्सेंट अशा पिक्चरमध्ये अजिबातच शोभत नाही. तो ऐकूनच माझा हिरमोड झाला.

<सोनाली कुलकर्णी खरंच खानदानी पेशवीण नाही वाटली. मला तर सतत असं वाटत होतं की आता ही कोणत्याही क्षणी उठून लावणी नाचायला लागेलं.> प्रचंड अनुमोदन

रश्मी , जिज्ञासा, साधना, अमित्रजित , महेश, दिनेशदा, गण्या, वेदिका, वरदा, गजानन, निशदे, मैत्रेयी, प्रजक्ता , श्रीयु , पेरु धन्यवाद सगळ्यांनाच.
वावर आधुनिकच.<<< अमा अगदी बरोबर. संवादफेक तर अगदीच आत्ताचीच. [काही अपवाद वगळता.]

स्वामी चे गारुड तर अजुनही आहेच पण ते बाजूला ठेऊन पाहिला तरीही हेच मत आहे माझे.

लेखाचं शीर्षक इतकं कन्फ्युजिंग का आहे ??<<<<< नंदिनी ? कन्फ्युजिंग ? Uhoh मला तर नाही तसं वाट्त. उलट मला जे काही म्हणायचंय ते शीर्षकात अचुकपणे आलंय अस मला वाततंय. अर्थात ज्याचे त्याचे मत.

याआधीची सगळी वाचलेली मते खूप प्रशंसा करणारी होती.<<<<फारएण्ड , हो बरोबर. मराठीत अस भव्यदिव्य आणि ग्त्य्तून पेशवाई सारखा मराठी मनाचा जिव्ह्जाळ्याचा विषय आणि शिवाय मृणाल कुलकर्णी याचा परिणाम असेल कदाचित हा.

ऐतिहासिक वगैरे सिनेमे काढताना जरा काळाचं भान ठेवायला हवं इतकी साधी अपेक्षाही का पूर्ण करत नाहीत?<<<<< मामी करेक्ट.
त्यामुळे प्रसंगाचं गांभिर्य लक्षात येतंय.<<< मामी Happy

तिचा ते नाव घेतानाचा अ‍ॅक्सेंट अशा पिक्चरमध्ये अजिबातच शोभत नाही. <<<< सायो तेच म्हणते आहे मी.