दुसरा किस्सा क्रमांक २
छोटासाच किस्सा आहे, याचा संबंध शिर्षकाशी असल्याने एकाच लेखाअंतर्गत डकवले आहे परंतु पहिल्या किस्श्याशी याचा थेट संबंध जोडू नका.
डिसक्लेमर पुन्हा देतो - नाव-संदर्भ बदललेले आहेत.
बहुराष्टीय कंपनी म्हटले की परदेशी क्लायंट वा परदेशी सहकर्मचार्यांचे येणेजाणे असतेच. अशीच एक आमच्याच कंपनीची परदेशी कर्मचार्यांची टीम आमच्या ब्रांचला विजिटसाठी आली होती. अर्थात, सारेच मोठ्या पोस्टवरील अधिकारी होते. देशाचे नाव घेऊन कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमाचे उल्लंघन करायची इच्छा नाही पण छान गोरेचिट्टे लोक होते. रंगाचा उल्लेख मुद्दाम केला कारण "गोर्या" फॉरेनर लोकांसमोर बरेचदा भारतीय दबून जातात हा अनुभव. (ज्यांना वरचेवर फॉरेनर बघायची आणि त्यांच्यात मिसळायची सवय नसते त्यांना हे लागू, तसेच ज्यांचे ईंग्लिश कच्चे असते त्यांना आणखी लागू, इतरांना कदाचित गैरलागू) असो, तर तीन दिवस त्यांचा आमच्याकडे मुक्काम होता. सर्वांना आपापले वर्कस्टेशन नीट नेटके अॅण्ड क्लीन ठेवायची सूचना झाली होती. ड्रेसकोड देखील कोणतीही सबब न देता फॉर्मलच हवा होता. आदल्या दिवशी एच.आर. डिपार्टेमेंटने याचा खास रिमाईंडर मेल टाकला तेव्हाच खरे तर लक्षात आले होते की कंपनीच्या दृष्ट्टीने हि महत्वाची मंडळी दिसताहेत.
सकाळी ठरल्यावेळी ते आले आणि पुर्ण ऑफिसभर फिरत सर्वांच्या वर्कस्टेशनला भेट देऊन गेले. आम्हा सर्वांना पोशाखाबद्दल जो आदेश दिला होता तो त्यांना लागू नसावा कारण त्यांच्यापैकी काही जण सूटबूटमध्ये आले होते तर काही जणांनी चक्क जीन्स-टीशर्ट घातले होते. त्यांचा राऊंड संपल्यावर आमच्यात यावर चर्चा सुरू झाली - जर ते गोरे लोक बिनधास्त आपल्या कम्फर्टनुसार कॅज्युअल पोशाख घालू शकतात तर एकाच कंपनीचे असून शिष्टाचाराची हि पॉलिसी फक्त आपल्यालाच का पाळायला लावत आहेत. पण तरीही चलता है, इटस ओके, त्यांचा देश वेगळा, त्यांची विचारसरणी वेगळी, पण आपण आपल्या भारतीय ब्रांचची संस्कृती जपायला हवी यावर बहुतांश लोकांचे एकमत झाले. उर्वरीत लघुतांश लोकांमध्ये अर्थातच मी एक होतो, ज्याने भारतीय संस्कृतीचा मुद्दा निघताच मग पारंपारीक भारतीय पोशाख का नको? असे म्हणताच सर्वांनी विषय तिथेच संपवला.
असो, तर त्यानंतर कंपनीतील मोठ्या साहेबांबरोबर त्यांची मिटींग वगैरे झाली आणि ते जेवायला बाहेर गेले. दुपारी कधीतरी परत आल्यावर त्यातील एक सूट-बूटवाला विलायती बाबू मला वॉशरूममध्ये भेटला. त्यांची इतर सारी खातरदारी जोरात असली तरी त्यांना वॉशरूम मात्र सर्वांसाठी असलेलेच वापरायचे होते. वॉशरूममध्ये फारशी वर्दळ नव्हती. मी ज्या कामासाठी गेलो होतो ते आटोपून हात धुवायला बेसिनवर आलो तर तिथे तो विलायती बाबू आरश्यासमोर उभे राहून केस ठिकठाक करत होता. माझ्याकडे बघून उगाचच ओळखीचे हसला आणि कुठल्यातरी अगम्य अॅक्सेंटमध्ये पण ओळखीच्या अश्या ईंग्रजी भाषेत काहीतरी बोलला. मला त्यातील अक्षरही न कळता तो असेच काहीतरी अरबट चरबट बोलला असणार या विश्वासावर मी पुर्ण जबडा फाडत एक स्माईली दिली. पण जर माझा अंदाज चुकला असेल तर उगा पंचाईत नको म्हणून त्याच्या चेहर्यावरील नजर फिरवून घेतली, आणि ती फिरता फिरता त्याच्या पायांवर स्थिरावली. तिथे जे काही दिसले ते पाहता आता मी खरोखरच मनातल्या मनात मोठ्याने ह्यॅं ह्यॅं करू लागलो. माझ्या सोबत असलेल्या आणि मगासच्या आमच्या चर्चेत सामील असलेल्या मित्रालाही ते इशार्यानेच दाखवले. तसे तो देखील कुजकटपणेच हसत म्हणाला, वड्डे लोग वड्डी बाते.. पण माझ्या मनात आले, ‘नाम बडे और लक्षण खोटे’.. कारण ज्यांच्यासाठी आम्ही सो कॉलड फॉर्मल शिष्टाचार पाळत होतो त्यातीलच एक उच्च परदेशी अधिकारी आमच्या वॉशरूममध्ये चक्क सॉक्सवर म्हणजे बूट न घालता फक्त मोज्यांवर आला होता .. आता बोला !
सर्व तळटीपा पहिल्या भागाप्रमाणेच.
याउपर अध्येमध्ये येणार्या ईंग्रजी शब्दांसाठी क्षमस्व! पटापट प्रतिशब्द न सुचल्याने जे डोक्यात येईल तसे लिहून काढलेय.
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष
>>तुमच्या कंपनीत त्याचा बूट
>>तुमच्या कंपनीत त्याचा बूट चोरीला गेला असेल <<
हा हाा. आणी तो बिचारा तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करत असेल; त्याच्या अगम्य अॅक्सेंट मधे...
>>आणि साधं इंग्रजी कळत नाही
>>आणि साधं इंग्रजी कळत नाही >>>> ते सांधं नव्हतंच .. पण तरीही .. फारच वादग्रस्त विधान आहे हे.
ईंग्लिश न समजणे किंवा न जमणे हे ज्या दिवशी आपल्याला "लक्षण खोटे" वाटू लागले की समजायचे आपला सर्वांचा मातृभाषेचा अभिमान संपला.
कृपया वैयक्तिक घेऊ नका, पण मी लिहितो मराठी, मी बोलतो मराठी, मी ऐकतो मराठी .. अरे मी जगतो मराठी !!!!>>
ऋन्मेऽऽष .. मित्रा, you are missing the point.
मी असं म्हणालो कि तो परदेशी पाहुणा तुझ्याबद्दल साधं इंग्रजी कळत नाही असं म्हणू शकतो (ते बरोबर असेल असं नाही. पण फक्त तो तसं म्हणाला तर? असा विचार कर).
जशी तू अपेक्षा केलीस कि त्यानी बाथरूम मधे बूट घातले पाहिजेत आणि तसं न केल्यामुळे त्याचं लक्षण खोटं, तसंच तो अपेक्षा करू शकतो ना कि एवढ्या चांगल्या (दिसणार्या) ऑफिसातल्या लोकांना इंग्रजी येत असेल आणि त्याचं इंग्रजी बोलणं तुला कळालच पाहिजे!
तुला खरच इंग्रजी येत कि नाही किंवा तुझा मराठी भाषेचा अभिमान वगैरे चा संबंधच नाही रे.
मुद्दा हा आहे कि अशा प्रसंगावरून त्याच्याबद्दल हे असं मत बनवणं योग्य वाटत नाही.
मग त्या उच्च परदेशी
मग त्या उच्च परदेशी आधिकार्याला टेक्निकल (किंवा त्याच्या विषयातले ज्ञान) कमी होते का? बुट घातले नाहीत तर त्याचे लक्षण खोट ठरवलत तुम्ही
लेखाचा उद्देश जर शेवटचा
लेखाचा उद्देश जर शेवटचा सॉक्सचा असेल तर दोन ते तीन ओळीत लिहायच विषय पाणी घालून पाणचट झालाय. त्या ऐवजी तुम्ही कसे एटीकेट्स वाले आणि पॉश ठिकानी काम करायला सरावलेले हे सांगण्यात वाचणा=याचा वेळ घेतल्याने बोअर मारतो जाम. किती पिळायचं राच? प्रत्येक रिप्लाय नंतर लेखकाचा रिप्लाय हा त्या पेक्षा जास्त बोअर आहे. तुम्ही जित्के रिप्लाय द्याल तितके तुम्हाला पिळत बसतील लोक. वाचणार्य लोकांना हे सर्व नवीन असेल या हिशेबाने लेख लिहीला असेल तर तिथच गडबड झाली आहे. तुमच्या मित्रांना याचं अप्रूप वाटेल.
चौकट राजा, ओके नाऊ गेटींग
चौकट राजा,
ओके नाऊ गेटींग युअर पॉईंट ...
पण तरीही पुर्णतः सहमत मात्र नाही. एखाद्याला एखादी भाषा येत नाही हे खोटे लक्षण जर तो परदेशी किंवा कोणीही मानत असेल तर ते चूकच. किंबहुना त्याचीही स्वताची ईंग्लिश चांगली नव्हतीच. अगम्य अॅक्सेंट एवढ्यामुळेच की त्याचेही किंबहुना त्या लोकांचेही ईंग्लिश चांगली नसतेच. त्यांचीही राष्ट्रभाषा वा मातृभाषा वेगळीच आहे, फक्त ईंग्लिश आमच्यातील कॉमन लँगवेज म्हणून त्यात संवाद साधतो, कामकाज करतो इतकेच.
अदिती,
ज्ञान, अक्कल, हुशारी, कौशल्य ईत्यादी हे वेगळे आणि स्वभाव, सवयी, शिष्टाचार वगैरे हे वेगळे.
त्यांचीही राष्ट्रभाषा वा
त्यांचीही राष्ट्रभाषा वा मातृभाषा वेगळीच आहे>>>
अच्छा असं आहे तर! मग तुम्ही त्याच्या देशाच्या संस्कृतीत मोज्यां मध्ये प्रसाधन गृहात जाणे शीष्टाचारात बसते का हे बघितले का? की त्याशिवायच त्याच्याबद्दल मत बनवले?
कोरा आई डाऊट की जगातल्या
कोरा आई डाऊट की जगातल्या कोणत्याही देशात प्रसाधनगृह वा शौचालयात सॉक्सवर जात असतील. एकवेळ नंगे पाव समजू शकेल की त्यानंतर ते मैले पाय धुता तरी येतात पण सॉक्स म्हणजे तसेच बूटाच्या आत गेले !
बलं ले लाजा!! आपण की नाई
बलं ले लाजा!!
आपण की नाई सगल्यांना 'तुमचं लच्चन खोटं! खोट्टं खोट्टं खोट्टं' म्हणत टूक टूक कलू. बस्स!
ललू नको बलं तू आता, शांत बस पाहू, ऊठसूट धाग्यांचा कचला कलू नको ईथे तिथे, शाना ना तू माझा बाल.
मोदक पाहिजे ना तुला, मग ब्बाप्पाला जाऊन नमस्काल कल बलं. म्हणावं, ब्बाप्पा मला लवकल शाणं कल, चांगली बुधी दे आणि माबोकलांना सुखात ठेव.
अरे बस करारे आता किती तो
अरे बस करारे आता किती तो एखाद्या गोष्टीचा किस पाडायचा
(No subject)
प्रीतीऽऽजी, आपल्या बोलण्यातील
प्रीतीऽऽजी,
आपल्या बोलण्यातील गभितार्थ समजला, आपण तृतीय येऊद्या असे म्हणत आहात ना.
पण तुर्तास क्षमस्व, गणेशोत्सवानिमित्त ब्रेक घेतलाय
Pages