Submitted by बेफ़िकीर on 25 August, 2014 - 14:59
रातराणीसारखे गंधाळणे हे वाहवा
जी न वाहे त्या हवेवर भाळणे हे वाहवा
तू कशी आहेस ह्याची कल्पना नाही मला
पण तरीही मी तुला कवटाळणे हे वाहवा
एकमेकांना किती कालावधीने भेटलो
वाचलेल्या पुस्तकाला चाळणे हे वाहवा
लाज वाटावी असे कित्येकदा वागूनही
चारचौघांच्यातले ओशाळणे हे वाहवा
जात असताना नजर खाली झुकवणे आपली
अन् वळत माझी नजर कुरवाळणे हे वाहवा
(अपूर्ण गझल)
-'बेफिकीर'!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकमेकांना किती कालावधीने
एकमेकांना किती कालावधीने भेटलो
वाचलेल्या पुस्तकाला चाळणे हे वाहवा
वा.
ती कुठेही असो खुरटलेली
पण फुले एक खंत भवताली
हा शेरही आवडला.
अपूर्ण गझल सॉलीड होतेय...
अपूर्ण गझल सॉलीड होतेय... पूर्ण वाचायला आवडेल...
मला गझलेतल काहि कळत नाहि..पण
मला गझलेतल काहि कळत नाहि..पण वाचायला छान वाटल अगदी...
तू कशी आहेस ह्याची कल्पना
तू कशी आहेस ह्याची कल्पना नाही मला
पण तरीही मी तुला कवटाळणे हे वाहवा
एकमेकांना किती कालावधीने भेटलो
वाचलेल्या पुस्तकाला चाळणे हे वाहवा
क्या बात है !
मतलाही आवडला ...विशेषतः सानी मिसरा .
वाहवा बाबत साशंकीत
वाहवा बाबत साशंकीत आहे..
बाकी,
रातराणीसारखे गंधाळणे हे
जी न वाहे त्या हवेवर भाळणे हे ... . मस्तच
बेफि. नेहमीप्रमाणे सुंदर आणि
बेफि.
नेहमीप्रमाणे सुंदर आणि अर्थपूर्ण गज़ल !
हे नंतर स्वल्पविराम किंवा अर्धविराम टाकला असता तर अर्थ अधिक स्पष्ट झाला असता असे वाटते!
सर्व शेर आवडले
सर्व शेर आवडले
ती कुठेही असो खुरटलेली पण
ती कुठेही असो खुरटलेली
पण फुले एक खंत भवताली ,,,, क्या बात ! अफलातून.
भवताली वाले दोन्ही शेर
भवताली वाले दोन्ही शेर आवडले.
'हे वाहवा' हे प्रकरण काही झेपले नाही.
वाचलेल्या पुस्तकाला......क्या
वाचलेल्या पुस्तकाला......क्या बात है.
वाहवा बद्दल साशन्क आहे.
एकमेकांना किती कालावधीने
एकमेकांना किती कालावधीने भेटलो
वाचलेल्या पुस्तकाला अर्थानेचाळणे हे वाहवा
लाज वाटावी असे कित्येकदा वागूनही
चारचौघांच्यातले ओशाळणे हे वाहवा
जात असताना नजर खाली झुकवणे आपली
अन् वळत माझी नजर कुरवाळणे हे वाहवा >>>> हे तीनही छान वाटले.
--------------------------------------------------------------------------------------------------------
वैयक्तिक मत मांडतो : (चुकलंही असेल)
वाहवा हा शब्द प्रशंसा करणे या अर्थाने वापरला जातो.
इथेही तसा वापरला असल्यास 'हे वाहवा' ऐवजी 'ही वाहवा'
असे हवे होते का असे वाटले.
(परंतु तसे केल्यास शेराचा तोल बिघडू शकतो असेही वाटले.)
कारण मराठीत वाहवा हा शब्द स्त्रीलिंगी म्हणून वापरला जातो.
'वाहवा केली' असे म्हटले जाते.
अर्थात, मी सर्व शेर वाचताना 'हे वाहवा' हे
"हे वाहवा करण्यासारखे आहे/वाटले" असे समजून वाचले.
वाहवा हा शब्द प्रशंसा करणे या
वाहवा हा शब्द प्रशंसा करणे या अर्थाने वापरला जातो.
इथेही तसा वापरला असल्यास 'हे वाहवा' ऐवजी 'ही वाहवा'
असे हवे होते का असे वाटले.<<<<<<<<<< नाही उकाका तसे नाही ते . हे हा शब्द हे कुरवाळणे , हे चाळणे, हे ओशाळणे असा घेवून अर्थ लावायचा आहे
ही अशी कृत्ये जी केली जात आहेत त्याना उपरोधिकपणे वाहवा म्हटले आहे काही ठिकाणी चांगल्या अर्थानेही ही वाहवा घेता येतेच आहे .
रदीफ छान आहे पण हे एक्सक्लॅमेशन शेराच्या शेवटी आल्याने जोडून पाहताना तुटक वाटत राहत असावे त्यामुळे संबंधिताना शाशंकता इत्यादी वाटत असावी असे माझे आपले वै.म.
हा तुटकपणा लिहिताना टिंबाटिंबांनी स्पष्टच दाखवून दिला तर...... ? चुभुद्याघ्या
सुंदर
सुंदर
एकमेकांना किती कालावधीने
एकमेकांना किती कालावधीने भेटलो
वाचलेल्या पुस्तकाला चाळणे हे वाहवा
>>> सुंदर ! मस्त गजल !
बेफी तुमच्या जवळपास प्रत्येक गजलेतला एकतरी शेर कायम लक्षात राहुन जातो अन अगदी योग्य वेळेला आठवतो ... परवाच एका अशा वेळेला
दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस
हा शेर आठवला ...
आता बघुया वरील शेर कधी आठवतो ते
तिसरा आणि चाैथा सगळ्यात जास्त
तिसरा आणि चाैथा सगळ्यात जास्त आवडले सर
जात असताना नजर खाली झुकवणे
जात असताना नजर खाली झुकवणे आपली
अन् वळत माझी नजर कुरवाळणे हे वाहवा
कुरवाळणे... व्वा...!