पाककृती हवी आहे -ज्वारी व गहू पीठ

Submitted by शबाना on 18 August, 2014 - 17:05

नुकतेच घर बदलले. इथे स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक कुकर आहे. भाकरी आणि पोळी मुळीच चांगली होत नाहीये. सगळी पीठ तशीच पडून आहेत. भाताचे प्रकार खाउन कंटाळलो आहोत. ज्वारी आणि गव्हाच्या पीठाचे उकड आणि घावन या प्रकारचे पदार्थ सोडून अजून काय करता येईल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्वारीच्या पीठाची उकड तांदळाच्या पीठाच्या उकडीसारखीच करायची का? << हो. म्हणजे मी तरी तशीच करते. फक्त तांदळाच्या पिठीपेक्षा पाणी थोडे जास्त लागते आणि शिजायला वेळ लागतो.

ज्वारीच्या पिठामधे (तां. च्या डोश्याप्रमाणे) उडिद डाळ व मेथ्या वाटून घालून डोसे चांगले होतील. २ वाट्या पिठाला अर्धी वाटी भिजवलेली डाळ वाटून रात्री मिक्स करून ठेवली तर सकाळी चांगले डोसे होतील. घावनांचा कंटाळा आलाय हे वाचले वरती पण नुसत्या पिठाची घावने थोडी बोअर होतात. डोसे आवडतील.

लोकहो धन्यवाद

तवा ठेऊन प्रयोग चालू आहेत - पण सपाटून भूक लागलेली असताना आणि ब्रेड, पास्ता असे तत्सम पदार्थ खाउन उबलेले असताना पुन्हा ते प्रयोग ही पीठ संपवायला म्हणून करणार नाहीच नाही

शेंगोळ्या कधी केल्या नाहीत, पण करेन या शनिवारी

बाकी दाल बाटी गार्डनमधल्या तीन दगडाच्या चुलीत असा बेत आहे - बघुयात या रविवारी हवामानखात्याचा अंदाज घेऊन
.

गेल्या शनिवारी भाकरीचे पीठ मळून दोन अर्ध्या दाम्ट्या टाकून झाल्या, न तर भाजल्या गेल्या आणि नाही फुगल्या म्हणून वैतागून रेसिपी बघत होते, तेव्हा नागपुरी उकड ची रेसिपी मिळाली. मी मळलेल्या पीठासहीत, अर्धकच्च्या भाकऱ्या उकडीत घातल्या, मस्त फोडणी दिली -- खरंच छान लागलं -- हा उकड करण्याचा एकमेव अनुभव, आतापर्यंत!

हम्म धपाटे विसरले होते बरीच वर्षे- ते नक्की करणार .

पौष्टिक लाडू करताना ज्वारीचे पीठ ही घालते नेहमी, छान लागतात लाडू, पण हा हिवाळी पदार्थ त्यामुळे आणखी काही महिन्यांनी.

असो -- frustration मध्ये टाकलेल्या पोस्टीस मिळालेला प्रतिसाद मात्र उत्साहवर्धक आहे. पुढचे काही दिवस आता काय सैपाक करायचा याला उत्तरे तरी मिळाली.

Pages