पाककृती हवी आहे -ज्वारी व गहू पीठ

Submitted by शबाना on 18 August, 2014 - 17:05

नुकतेच घर बदलले. इथे स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक कुकर आहे. भाकरी आणि पोळी मुळीच चांगली होत नाहीये. सगळी पीठ तशीच पडून आहेत. भाताचे प्रकार खाउन कंटाळलो आहोत. ज्वारी आणि गव्हाच्या पीठाचे उकड आणि घावन या प्रकारचे पदार्थ सोडून अजून काय करता येईल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थालीपीठ करता येइल. त्यात किसलेला दुधी, कोबी किंवा पालेभाज्या घालता येतील. इलेक्ट्रिक कुकर म्हणजे कॉइल वाला की स्मुद टॉप? त्याचे एकदा तंत्र जमले की पोळ्या नीट होतात.

माझ्या कडे पूर्वी कॉइलवाला होता. आच कमी केली तरी कॉइल तापलेली रहाते आणि आज वाढवली तरी कॉइल तापून तवा तापायला वेळ लागणार हे लक्षात घ्यायचे. हळू हळू जमेल. मी सुरुवातीला पोळीचा गोळा लाटून तेल पीठ लावुन त्रिकोणी घडी करुन घ्यायची. अशा पुरेशा लाट्या झाल्या की पोळ्या लाटून भाजायची. हळू हळू अंदाज आला. महिन्याभरात जमायला लागले. भाकरी शेकायला एक जाळी मिळते. आपण ओपन फ्लेम वर भाकरी शेकतो त्या स्टेपला ती जाळी वापरायची.

स्वाती +१ मीही कॉइल वापल आहे. गव्हाच्या पिठाची गोड पेज ब्रेकफास्ट साठी चांगली होईल, गव्हाच्या पिठाचा बदाम टाकुन शिराही छान लागतो.

कणकेची उकडपेन्डी.

शबाना, पिल्सबरी, शक्तीभोग ( दिल्ली) किन्वा आशीर्वाद असेल तर कॉईलवर देखील पोळ्या बर्‍या होतात. लोखन्डी तव्या ऐवजी नॉनस्टीक तवा वापरुन बघ.

इंडक्षन कुकर आहे का साधी शेगडी? इंड. कुकर वर सर्व स्वयंपाक पोळ्यासहित मस्त होतो. भाकरीचा अनुभव नाही. नाहीच तर १७६० ब्रेड व पावाचे प्रकार मिळतातच कि युरोपात ते खाता येतील.

ज्वारीच्या पीठामध्ये बेसन, थोडी भाजणी किंवा जाडसरपणासाठी थोडा रवा+ब्रेडक्रम्स तसेच भाज्या, कॉर्न, कोथिंबीर, जिरे- धने पुड / जिरे व ओवा (थोडक्यात काहीतरी फ्लेवर) घालुन वडे / पुर्‍या / घारगे येतील.
तसेच कणकेचे / गव्हाच्या पीठाचे भोपळघारगे, तिखटमिठाच्या पुर्‍या, पालकपुरी, मेथी पुरी, मठरी असे काहीही करता येईल Happy

थालीपिठे, धपाटे
होममेड पास्ता किंवा न्यॉकी (रेफर लाजो),
गव्हाच्या पिठाचे दोदोलसारखे प्रकरण,
बिस्किट भाकरी - याची नेटवर मिळेल पाकृ बहुतेक किंवा कोणी गुज्जु असेल आजूबाजूला तर गाठ.

स्वाती२ +१.
पोळ्या सगळ्या आधी लाटून एकदम गरम तव्यावर भराभर भाजायच्या.
माझे तंत्र साधारण असे होते: पोळी टाकली तव्यात की २/ ३ सेकंदात लगेच उल्टायची, मग १० सेकंदांनी परत आणि अजून १० सेकंदात (पूर्ण फुगून) झाली. माझी एक मैत्रीण स्वच्छ फडक्याने पोळीला दाबून ती फुगवायची.
मुख्य मुद्दा म्हणजे तवा व्यवस्थित तापलेला हवा. सावकाश गरम झाली तर पोळी पापडात रूपांतरित होते. Happy

भाकरीची कल्पना नाही.

तुमचा तवा सपाट आहे की पॅराबोलिक? माझ्याकडेही इलेक्ट्रीक कुकरआहे, पण तवा सपाट असल्याने पोळ्या चांगल्या होतात. भाकरी मला येत नाही त्यामुळे माहीत नाही. वर स्वाती२ नी म्हटल्याप्रमाणे मी जाळी वापरते फुलके करायला आणि पापड भाजायला ( भारतात जनरली दुधाचं पातेलं झाकायला वापरतात तशी विथ हँडल ). पौंड लँड मधे मिळ्ते ती जाळी.

मला कोणी धपाटे म्हण्जे काय आणि कसे करायचे ते सांगेल का प्लीज?

माझ्या मते, गव्हाचे पीठ, गूळ आणि साजूक तूप एकत्र करून (मावे मधून देखील) गूळपापडीच्या वड्या / वळता आले तर लाडू करता येतील.

हाच प्रयोग ज्वारीच्या पीठासोबत (आपापल्या जबाबदारीवर) करून बघता येईल.

अपर्णा,
धपाटे थालीपिठासारखेच असतात. ज्वारीच्या पिठात बेसन ३:१ प्रमाण आणि थोडे तांदळाचे पीठ, आवडी प्रमाणे कांदा किंवा भोपळा वगैरे किसुन, ओवा, कोथिंबीर, तीळ, गोडा मसाला/धणे-जीरे पावडर, हळ्द, तीखट, मीठ, आवडत असेल तर लसूण पेस्ट घालून कोमट पाण्याने पीठ भिजवायचे. तेलावर थालीपिठासारखेच भाजायचे.

धन्यवाद स्वाती२, करून बघते.
थालीपीठापेक्षा पातळ म्हण्जे लाटून करायचे की थापूनच करायचे?

माझ्यामते पोळी भाकरीला पर्याय नाही. त्यामुळे आहे ह्याच शेगडीवर पोळ्या चांगल्या कशा होतील ते तंत्र विकसीत करा. अनुभवाने आणि सरावाने नक्की जमेल तुम्हाला हे.

बारा वर्षे मी असाच कोइल वर पोळ्या केल्या. सपाट तवा घ्या . मी आधी नोनस्टिक तवा वापरायचे पण त्या कोइल खूप जास्त तापतात त्यामुळे असे तवे लवकर खराब होतात त्यामुळे मग walmart मधला cast iron चा सपाट जाड तवा वापरला . सुरवातीला तंत्र जमेपर्यंत जरा वेळ लागतो पण मग पोळ्या काय अगदी पुरणपोळ्या पण छान होतात.

Pages