नेहा,
कुठून आणि कशी सुरवात करू हे कळत नाही. पण विखुरलेला एक एक मोती जसा उचलून हातातल्या धाग्यात अलगदपणे गुंफून माळ तयार करावी तस-काहीस करणार आहे. काही वर्षांपूर्वी (२००५-६ असावे बहुधा) मी तुला खगोल मंडळाच्या कार्यक्रमात प्रथम पहिले तेंव्हाच तुझी हुशारी आणि निरागस हास्य मला आवडले होते. तशी आहेसच तू सुंदर ! कोणालाही आवडशील अशी. पण स्वतःच्या मनाची चलबिचल थांबवण्यसाठी एखद्या निस्तब्ध पाण्यात खडा टाकून ते पाणी ढवळून काढावे असे मला कधीच वाटले नाही. याउलट तिन्ही ऋतूत बहरणाऱ्या रंगीबेरंगी गुलमोहराप्रमाणे तू सदैव बहरत रहावेस अगदी तसाच आदर तुझ्याविषयी नेहमी वाटत राहीला.
अभियांत्रिकी अभ्यासात काही काळ निघून गेला. त्यानंतर काही फिरतीची नोकरी असल्याने खगोल मंडळात फारसे येणे झाले नाही. मध्येकधी एखादी फेरी झालीही असेल कदाचित, पण फारशी आठवत नाही. अंधारात जळणारा दिवा जसा मंदमंद होत अदृश्य व्हावा तश्या वेळेसरशी तुझ्या आठवणीही धुसर होत गेल्या. पुढे करियर आणि महत्वाकांक्षा यांच्यासमवेत उडणारे आयुष्याचे पान मला उच्चशिक्षणासाठी सातसमुद्र ओलांडून अमेरीकेला कधी घेऊन आले हे कळलेही नाही.
मध्ये आणखी काही वर्षे निघून गेली. वर्षभरा पूर्वी फेसबुकवर मंडळाची वेबसाईट दिसली. ती पाहताना नकळतपणे तुझ प्रोफाइल पेज समोर आल आणि हेमंतात एकामागूनएक येणाऱ्या प्रवाशी पक्ष्यांनी संपूर्ण किनारा जसा भरभरून यावा, तशा तुझ्या आठवणी पुन्हा उजळ होत गेल्या. आणि आता अधून मधून तुझ फेसबुक पेज धुंडाळताना तुझा मनमोकळा स्वभाव, तुझी सामाजिक जाणीव, एस्ट्रोफिसिक्सची तुझी आवड आणि तुझी भटकंती या सर्व गोष्टी पुन्हा समोर येतात. खरच ! फार सुंदर! सर्वाना आपलस करून जीवनात असीम गोडवा निर्माण करावा, अगदी अश्शीच आहे तुझी स्टाइल.
माझ शिक्षण तस जवळपास संपलय. वयही आता तिशीजवळ झुकलय. काही महिन्यात चांगली नोकरीही मिळेल आणि पुढील आयुष्य अगदी सुकर असेल यात कोणतीही शंका नाही. नवीन महत्वाकांक्षा अजूनही आहेत. आणखी नवनवीन शिखरं गाठायची आहेत. कला जोपासायची आहे, नवीन ठिकाणं पहायची आहेत, जगप्रवास करायचं आणि मनसोक्त जगून घ्यायचय. पण हे सर्व होताना महत्वाची गोष्ट अशी की, सहचारिणी शोधण्याची वेळही आता अगदी जवळ आली आहे. त्यामुळे एरवी स्थितप्रज्ञ असणारे माझे मन, अरेंज म्यारेज च्या समुद्र मंथनातून बाहेर येणारी बायको नक्की कंप्याटीबल असेल कि नाही? या विचाराने गलबलते आहे. आणि म्हणून इतरत्र मुली पाहण्या आधी, खरोखर माझ्या आईडीयल मुलीच्या चौकटीत बसणाऱ्या तुला हे सर्व सहजपणे समजून सांगण्यासाठीच हा खटाटोप मी केला आहे.
कदाचित तू मला आता ओळखतही नसशील अथवा विसरलीही असशील. त्यामुळे एखाद्या अनोळखी मुलाने अशा प्रकारे लग्नासाठी तुझ्याकडे संपर्क साधणे तुला आवडेल कि नाही? हे माहित नाही. पण खरं सांगायचं तर एकदाच मिळालेल्या ह्या आयुष्यात अधिकाधिक आवडणाऱ्या माणसांच्या सहवासात जीवन घालवणे म्हणजे खरोखरीचे आनंदाने जगणे नव्हे का? आणि म्हणून अशा प्रकारचा एकेरी प्रयत्न मी केला आहे. मी येत्या डिसेंबरमध्ये महिन्याभरासाठी भारतात परततोय. तेंव्हा बघशील मला एकदा भेटून? माझ्याशी बोलून? मला माहितीय की, आवडणाऱ्या सर्व गोष्टी मिळतीलच असं नाही आणि त्या मिळाव्यातच अशी माझी ईच्छाही नाही. त्यामुळे मला भेटून जर तुला खरंच माझ्या विषयी जवळीक वाटली आणि तुझी पूर्ण संमती असली तरच पुढील पाऊले टाकू. मी वाट बघतोय तुझ्या कॉफी इनव्हीटेशनची ..!
अभिषेक
काय वाटतं तुम्हाला ? हे पत्र पाठवू तिला ? तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय
(नावे बदलली आहेत)
हे अस एक घाव दोन तुकडे
हे अस एक घाव दोन तुकडे करण्यापेक्श्या तुम्ही तिच्याशी ओळख करुन का घेत नाही? पहीली स्टेप तिचा फेसबुक फ्रेंड व्हा. फेबु, मॅसेन्जर, फोन मधुन बोलुन एकमेकांना समजुन घ्यायचा प्रयत्न करा. मन जुळलीत तर मग हे असल काही प्रपो़ज करा. अर्थात तेव्हा थोडाफार बदल करावा लागेल पत्रात. काहीच नाही तर एक मैत्रीण तरी मिळेल
माझ्या मते तरी हा असा डायरेक्ट अप्रोच आवडणार नाही, आवश्यकही नाहीये.
तिला मायबोली वर येण्याईतक मराठी कळत नाही मग ह्या अश्या काव्यात्मक, साहित्यिक मराठीतल पत्र कळेल का?
अदितिला अनुमोदन. हा अप्रोच
अदितिला अनुमोदन. हा अप्रोच सुटसुटीत वाटतो.
Khup kami lokan na hi sandhi
Khup kami lokan na hi sandhi bhette Karan tumche vay 30 aahe tumhala sandhi bhetli sodu naka .baki nashib mi manat nahi. jas karal tas hoil. Aani ho lagnala jarur bolva.....
हद्द आहे राव!!! लव लेट्रा ची
हद्द आहे राव!!! लव लेट्रा ची बी रिव्यु मागाया लागलीन लोक!!!
सोन्याबापू. चालायचंच!!!! मी
सोन्याबापू. चालायचंच!!!!
मी प्रपोझ कराय्चे शंभर मार्ग असे एक पुस्तकच लिहिणार आहे आता.
शब्द शब्द जुळवुनी वाचिते
शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना |
आवरू कसे किती धीर नाही लोचना ||
जा जा कबूतर जा जा !!!
तिला मायबोली वर येण्याईतक
तिला मायबोली वर येण्याईतक मराठी कळत नाही मग .........
>>>>>
गंमत वाटली या वाक्याची.
मायबोलीवर यायला मराठी भाषा अमुक तमुक लेवल पर्यंत यावी लागते का?
तसेच ज्यांची मराठी फर्स्टक्लास आहे ते सारे मायबोलीवर (किंवा कुठल्याही मराठी संकेतस्थळावर) असतातच का?
अहो ॠन्मेष, त्या वाक्यापुढे
अहो ॠन्मेष, त्या वाक्यापुढे एक स्माईली आहे तो बघा.
गंमत वाटली या वाक्याची<< गंमत
गंमत वाटली या वाक्याची<< गंमत म्हणुनच लिहीलं होत. माझ्यासारखे अर्धवट मराठीवालेही ईटर्नेट अॅक्सेस्स मिळाला की आधी मराठी साईटस शोधतात
साती, अदिती ... वोक्के..
साती, अदिती ... वोक्के.. स्माईली नव्हती आली ती ध्यानात.. चूक कबूल
आणि तसेही मला त्यावर तावातावाने भांडायचे नव्हतेच, म्हणून मी सुद्धा स्माईली वापरली होती ..;)
@ धाग्याचा विषय _ आजचा मुहुर्त चांगला होता पत्र द्यायला. नसेल दिले तर किमान दहिहंडीचा तरी चुकवू नका. मारा खडा आणि फोडा एकदाचा घडा .. साक्षात गोपिकांच्या श्रीकृष्णाचा आशिर्वाद लाभला तर नकार मिळायचा प्रश्नच नाही
तसे लिहिले उत्तम आहे आपण हे
तसे लिहिले उत्तम आहे आपण हे पत्र!!! गुलाबी कागद बिगद वापरलान की काय द्येवा!!!, बाकी एकंदरीत मौज वाटली !! आजकाल ही पत्रे जिवंत आहेत हे पाहुनश्यानी!!!, आजकाल काय एफ बी ला रिक्वेस्ट टाका दोन चार दिस गुलु गुल (म्हणजे जेवलीस का ?? किती चपात्या??? भाजी तुमच्याकडे कशी करतात इत्यादी बकलोल कामे!!! ) मग हळुच नंबर मागुन घ्यावा!!! अश्या "विडीओ गेम स्टेजेस" प्पार करुन मग "गेम ओवर" करावा !! काय!!!?
(मी तर आमच्या पहिली ला, "कॉलेज मधे पोरे मला तुझ्या नावाने चिडवतात, मग? द्यायचा का अर्थ त्या चिडण्याला ?" असे प्रपोज केले होते !!!!!!)
@सोन्याबापू - बगा एकदम झ्याक
@सोन्याबापू - बगा एकदम झ्याक संगीतलन तुमी ! पन फेबु मेसेज करताना आमचा टांगा पलटी आनि घोडं फरार ..! कसं व्हायचं आमासनि काय कळना बागा .! गुलाबी कागदाची युक्ती आवडीली ! 'स्मित'
@ स्वराली - <<असे सगळ्यांना विचारून चर्चा करण्यासाठी लिहिलेले वेगळे आणि शेवटी स्वतःच्या मनातले फक्त तिच्याच साठी असे वेगळे असते ना ,असा त्या addition चा अर्थ आहे .>> ओह ..! गॉट इट नाऊ.! सगळ्या विषयात मी उत्तम होतो. पण 'स्त्रीवाक्याचा अर्थ लावणे ' हा विषय काही मला आजपर्यंत जमलेला आणी गमलेला दिसत नाही ..! "स्मित" Thank you !
@ आदिती - मस्त आहे तुमची आईडीआ, पाहतो काय होते ते !
@नंदिनी - तुमच्या पुस्तकाची मी वाट पाहोतोय, "स्मित"
@महेश - <<शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना |
आवरू कसे किती धीर नाही लोचना ||>>आतिशय सुन्दर वाटल्या तुमच्या चारोळी | असा काही प्रतिसाद आला तर जीवन धन्य ..!
पण उत्तर म्हणून -
'' पत्र रागे जाळवूनी वांच्छिते तू भासना ||
आवरू कसे किती हे श्वान माझे सांगना ||"
-- असे काहीतरी आले तर मात्र कर्माने मेलो ..! "स्मित" .... [ भास (ग्रामीण) -हरवून जा ]
घरट्या भाऊ!!!, तुमच्या भावना
घरट्या भाऊ!!!, तुमच्या भावना लै जेन्युईन आहेत ह्यात दुमत नाही दादा, पण पोरीला ही त्या फिलिंग्स आहेत का ? हे आधी शुवर व्हा, मगच अशी तरल भावविभोर पत्रे द्या असा आमचा एक प्रेमळ पण आगाऊ अन फुकाचा सल्ला!!!! कारण तसे नसले तर आपला "सोन्याबापू" व्हायचा चान्स बनतो!!!! अन एकच माणुसघाणा प्रॅग्मॅटीक वेडा भरपुर असावा!!! आपले भले होवो
त्या माझ्या चारोळी नसुन
त्या माझ्या चारोळी नसुन ग.दि.मांचे गीत आहे सुखाची सावली चित्रपटातले.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Shabd_Shabd_Julavuni
घरटेबुवा, एक विचारू? तुम्ही
घरटेबुवा,
एक विचारू? तुम्ही कधी अनोळखी मुलींशी स्वत:हून बोललात का? तसं धाडस केलेलं असेल तर तुम्हाला अशी पत्रं लिहायचं कारणच उरणार नाही मुळी!
नसेल केलं तर जरूर करून पहा. इथे इंग्लंडमध्ये अनोळखी मुलींशी बोलणं अवघड असतं. अमेरिकेत सोपं असतं असं ऐकून आहे. भारतातही हल्ली सोपं झालंय. चॅट वगैरे मधून होणारा संपर्क म्हणत नाहीये मी. समोरासमोर थेट भेट म्हणतोय. अनोळखी मुलीशी स्वत:हून बोलाण्याचा आत्मविश्वास हीच गुरुकिल्ली आहे.
नेहाला अनोळखी नाही हे मान्य. पण तुमचा आत्मविश्वास वाढवणे हा कळीचा मुद्दा आहे!
आता त्या पत्राकडे वळूया. ते पत्र जरूर पाठवा तिला. मात्र त्यापूर्वी एक करा. नेहाशी संपर्क साधा आणि तिच्यासमोर बसून त्या पत्रातले एकेक मुद्दे तिला सहज गप्पा मारतांना सांगा. सगळे मुद्दे एकाच भेटीत सांगायला पाहिजेत असं नाही. तसेच काही मुद्दे परतपरत सांगितलेत तरी चालतील. एकदा का नवीन मुद्दे संपले की मग तिला हे लेखी पत्र पाठवा. अनुकूल परिणामाची तीव्रता अनेक पटीने वाढेल.
घाईमुळे हे तोंडी सांगणं जमलं नाही तर निराश होऊ नका. पण अनोळखी मुलीशी बोलण्याचा तुम्हाला आत्मविश्वास असलाच पाहिजे.
मोहिमेस शुभेच्छा!
आ.न.,
-गा.पै.
>>पण अनोळखी मुलीशी बोलण्याचा
>>पण अनोळखी मुलीशी बोलण्याचा तुम्हाला आत्मविश्वास असलाच पाहिजे.
कप्तान साहेब, खरं तर अशा
कप्तान साहेब, खरं तर अशा गोष्टींबाबत मायबोलीवर प्रश्न विचारणे कितपत योग्य आहे माहित नाही. हे ह्या करता कारण आपल्याला मदतीची अपेक्षा असली तरी त्याबरोबर इतर वात्रट सल्ले, फुकाच्या चौकशा, तुमचं मुल्यमापान (थोडक्यात प्याकेज काढणे) हे सगळं होणार. ह्या सगळ्यानी उगाच तुम्हाला वेगळाच डिप्रेशनचा वगैरे त्रास सुरु व्हायचा. असो. आता विचारलाच आहे ना? तर जाऊ द्या.
मला फारएण्डची पोस्ट सेन्सिबल वाटते पण त्याच बरोबर असं वाटतं की जास्त विचार न करता तुम्हाला हवं त्या मार्गाने लवकरात लवकर त्या मुलीला विचारा. ते सगळ्यात महत्वाचे आहे. त्याचं असं आहे सुर जुळायचे म्हंटले की कसे ही करुन जुळतात त्यामुळे ताबडतोब "विचारणे" हे सरवात महत्वाचे आहे. मुलगी काय म्हणेल, तिला काय वाटेल ह्याचा विचार करत बसलेली कित्येक मुलं पुढे मामा बनली आहेत हे मी माझ्या डोळ्यानी बघितलेले आहे. तर परत, Just go and ask her, right now! Do it. Do it.
पण अनोळखी मुलीशी बोलण्याचा
पण अनोळखी मुलीशी बोलण्याचा तुम्हाला आत्मविश्वास असलाच पाहिजे.
>>>>
इयत्ता दहावीत हा गुरु मंत्र मला मिळाला होता आणि त्यानुसार प्रॅक्टीकल सुद्धा आम्ही केले होते. सविस्तर किस्सा पुन्हा कधीतरी पण पाँईट वॅलिड.
अजून एक, चुकूनही पहिल्या भेटीत प्रेम व्यक्त करू नका. ना थेट ना हिंट देऊन. आवड आणि आकर्षण जरूर दाखवा.
१४-१५-१६-१७ - चार दिवस झाले
१४-१५-१६-१७ - चार दिवस झाले धागा काढुन.. इतके दिवस फक्त इथले प्रतिसाद वाचुन उत्तर देण्यातच जाताहेत. लवकर हालचाल करा नाहीतर ती फेबुवर स्वत:चा मेंदी काढलेल्या हाताचा फोटो टाकेल आणि तुम्ही फक्त लाईक करत बसाल. आजच करा काय करायचीय ती अॅक्शन आणि इथे लिहा काय झाले ते.
@नंदिनी - तुमच्या पुस्तकाची
@नंदिनी - तुमच्या पुस्तकाची मी वाट पाहोतोय, "स्मित">> नको. माझा लिहिण्याचा स्पीड अफाट आहे, अजून वीस तीस वर्ष सहज जातील
घरट्या भाऊ झाल कि नाही पत्र
घरट्या भाऊ झाल कि नाही पत्र पाठवून ? हे पत्र पाठवू का? म्हणून मायबोलीकरांना विचारताय ना म्हणून आपल विचारलं तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहोत
एक अनुभवी सल्ला - पत्रात
एक अनुभवी सल्ला - पत्रात मुलीचे नाव पेन्सिल ने लिहा ..
एक अनुभवी सल्ला - पत्रात
एक अनुभवी सल्ला - पत्रात मुलीचे नाव पेन्सिल ने लिहा .. >>>>>> सोबत खोडरबरही द्या, ठेवायचे की खोडायचे हे तिलाच ठरवू द्या
पत्रात मुलीचे नाव पेन्सिल ने
पत्रात मुलीचे नाव पेन्सिल ने लिहा >>>
आजकालच्या मुली असल्या
आजकालच्या मुली असल्या पत्रांना फारच फिल्मी म्हणून इग्नोर करतील कारण आजकाल मुलीना फेबुवर पोरं इतके message पाठवतात कि त्या कंटाळून जातात आणि मग कुठल्या चांगल्या मुलाने जरी message केला असेल तरी त्या इग्नोर करतात.
तुम्ही म्हणालात कि तुम्हाला फेबुवर request पाठवणं अवघड पडेल, पण तरी सुद्धा try करा.. वर कोणीतरी सांगितल्या प्रमाणे आधी message पाठवून ओळख काढा आणि मग हळू हळू बोलणं वाढवा. सुरुवातीला दिवसातून १ message आणि मग नंतर frequency वाढवत जा. वेळ आणि मूड बघून तिचा फोन number घ्या, whatsapp वर add करा. तिच्या आवडी निवडी जाणून घ्या आणि गप्पा मारताना हे जाणून घायचा प्रयत्न करा कि तिच्या life मध्ये दुसरा कोणी आहे कि नाही. जर कोणी असेल तर हळूच काढता पाय घ्या आणि नसेल तर तुमची गाडी अजून थोडी फास्ट करा. जर तुमच्या तारा जुळत असतील तर १-२ महिन्यात तुमचा नक्कीच काही ना काही fix होइल. (personal experience आहे)
वेडा अनुभवाचे बोल भारीच आहेत
वेडा अनुभवाचे बोल भारीच आहेत
<<१४-१५-१६-१७ - चार दिवस झाले
<<१४-१५-१६-१७ - चार दिवस झाले धागा काढुन..>>,
<<तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहोत>>
<< go and ask her, right now! >>
फास्ट ट्रेन नको म्हणून एकदम पत्र न देत्ता तुमच्या सुचनेनुसार एक साधासा(ओळख सांगणारा व मैत्रीपूर्ण ) फेसबुक मेसेज (चुकुनही प्रेम व्यक्त न करता) दहीकाल्याचे अवचीत्य साधून पाठविण्यात आला आहे. उत्तर अजूनही मिळाले नाही. अनोळखी व्यक्तींनी केलेला मेसेज फेसबुकच्या others chatwindow मध्ये गेल्याने पटकन लक्षात येत नाही. धडधड वाढत आहे. असो !
पण तुम्हा लोकांच्या प्रोत्साहनाला सलाम !
काहीतरी सकारात्मक झाल्यास पेन्सिल, खोडरबर, आणि भूमितीच्या कोनमापकांसोबत कॅमलीनची संपूर्ण कंपासपेटी देण्यात येईल रे...! स्मित
अनोळखी व्यक्तींनी केलेला
अनोळखी व्यक्तींनी केलेला मेसेज फेसबुकच्या others chatwindow मध्ये गेल्याने पटकन लक्षात येत नाही.>>>
स्साले इथेच फेसबूक मार खाते, ऑर्कुट सही होते, मुलीचे स्क्रॅपबूक उघडे दिसले तर पाठवता यायचा मेसेज ..
मेल टाकून बघा .. मी कॉलेज संपल्यावर एका मुलीचा (जी मला फक्त चेहर्यानेच ओळखत होती) मेल आयडी मिळवून शुभेच्छाचा मेल पाठवला आणि बोलणे सुरू करून नंतर फेसबूकवर पोहोचलो. सध्या आम्ही चांगले मित्र आहोत. माझे टारगेट तेवढेच होते. तुम्ही पुढे जाल अशी शुभेच्छा
अवांतर - हल्ली व्हॉट्सपने एक भारी काम केलेय. आधी मुलीचा नंबर मागायचा म्हणजे फार जिकीरीचे काम होते. कित्येकदा समोरून नकार आल्यावर पुढे गाडी कशी सरकवायची हे आणखी गोंधळून जायला व्हायचे. आता मात्र फक्त एवढेच विचारायचे, "तू व्हॉट्सपवर आहेस का?" .. बस्स मग मुलगी स्वताहून नंबर तरी देते लगेच किंवा मी स्मार्टफोन वापरत नाही वगैरे लोणकढी थाप मारते. आपण काय ते समजून जायचे.
ते फोन नं मिळवा, मग इमेल
ते फोन नं मिळवा, मग इमेल मिळवा किंवा व्हॉट्सअॅप वगैरे उमेदवारी करत बसलात तर फार वेळ जाईल हो.. तुमचा फंडा क्लिअर आहे ना? (नाहीच जमलं तर तुम्हाला 'मामा' किंवा 'चांगला मित्र' होण्यात इंटरेस्ट नाही असं धरून चालतो. अशा केस मधे बर्याचश्या मुलांना नसतोच.. नुसतच म्हणायला म्हणतात).
तेव्हा सरळ मनातलं बोलून टाका. बर्याच मुलींना असं डायरेक्ट विचारलेलं जास्त भावतं (बर्याच म्हणालो, सगळ्या नाही). उगाच हिंडून फिरून ट्राय मारण्यापेक्षा ते बरं. तिला बर्याच मुलांकडून विचारलं गेलं असेलही आत्तापर्यंत.. आणि काही 'चांगले मित्र'ही लायनीत असतील. तेव्हा माझ्या थोड्याश्या अनुभवावरून हे सांगतो कि ती स्वतःच्या लग्नाबद्दल सिरियस असेल तर तिला हे सरळ विचारणं पटकन भावेल. तिचा तसा काही विचार नसेल तर ती उगाच वेळ काढत बसेल. तेव्हा तिला तुमच्यात इंटरेस्ट नसेल तर तुम्ही तरी पुढे जायला मोकळे व्हाल आणि ती पण, नाही का?
फक्त बोलताना तुम्ही कोणीतरी रोडछाप रोमोयो कॅटेगरी किंवा टाईमपास करताय असं तिला वाटेल असं काही बोलू नका. तुम्ही सिरियस आहात हे कळालं तर ती तुम्हाला सिरियसली घ्यायचे चान्सेस जास्त आहेत. आणि हो, तिला विचार करायची; निर्णय घ्यायची जबरदस्ती नाही हे नक्कि कळूद्यात. उद्या तुम्ही न न न न न नेहा करत (क क क क किरण वाल्या शा खा च्या थाटात) ,तिच्या मागे लागणार नाही ना हा विचार ती सगळ्यात आधी करेल.
रच्याकने -- ऋन्मेऽऽष, लोणकढी
रच्याकने -- ऋन्मेऽऽष, लोणकढी म्हणजेच थाप. "लोणकढी थाप" ही द्वीरुक्ती झाली रे मित्रा. ते म्हणजे पिवळं पितांबर म्हणल्यासारखं झालं.
Pages