
सुवासिक तांदुळ ( आंबेमोहोर किंवा बासमती) एक वाटी
एक छोटा चमचा प्रत्येकी तेल आणि तूप . किंचितस मीठ.
श्रावण महीना सुरु झाला, आता थोड्याच दिवसात गौरी गणपतीचे वेध लागतील. गणपतीच्या नेवैद्यासाठी सुबक, कळीदार मोदक करण्याची प्रत्येकीलाच इच्छा आणि हौस असते. पण मोदक चांगले होण्याच गुपित त्याची उकड चांगली होण्यात आहे. ती एकदा जमली की मोदक वळण काही अवघड काम नाही. मी आज उकड करण्याची एक हमखास जमणारी रेसिपी सांगत आहे. अ़जून दोन तीन रविवार आहेत मध्ये. एखाद्या रविवारी रंगीत तालीम करा म्हणजे गणपतीत अधिक आत्मविश्वासाने मोदक करता येतील.
तांदुळ धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. मोजून दीड वाटी पाण्यात ते चार तास भिजन घालावेत.
नंतर ते मिक्सर मध्ये अगदी गंधासारखे बारीक वाटावेत. वाटताना तांदुळ भिजवलेले पाणीच वापरावे जास्त पाणी घालू नये. पण दीड वाटी पाणी घालावेच. ( एक वाटी तांदुळाला दीड वाटी पाणी हे माप आहे उकडीचे)
ही पेस्ट एका निर्लेप पातेल्यात काढून घ्यावी. त्यात चवीपुरत मीठ, आणि वर लिहीलेल तेल आणि तूप घालून ते गॅस वर ठेवावे आणि लाकडी कालथ्याच्या मागच्या बाजूने सतत ढवळत रहावे. थोड्याच वेळात ते घट्ट होईल. घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. मोदकांसाठी लागणारी मऊ, कडा न फुटणारी , जास्त मळायची गरज नसलेली अशी उकड तयार आहे. नारळाच पुरण त्यात भरा आणि कळीदार मोद़क विनासायास बनवा. मी केलेल्या मोदकांचा हा फोटो.
From mayboli
सर्रास सगळीकडे बारामहीने मोद़काची तयार पिठी चांगली मिळत नाही, विशेषतः परदेशात आणि लहान गावात. त्यांच्यासाठी ही पद्धत छान आहे.
पाणी दिलेल्या प्रमाणा एवढेच वापरावे. जास्त अजिबात नको. काकणभर कमीच चालेल एकवेळ पण जास्त नको.
साधारणतः एक वाटीचे मोठ्या आकाराचे ८-९ मोदक होतील.
कळवल्याब्द्दल धन्यवाद. त्या
कळवल्याब्द्दल धन्यवाद. त्या साईटचा आणि मायबोलीचा संबंध नाही.
आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो आहोत. ज्या लेखकांचे लेखन परवानगी वाचून चोरले आहेत त्यानीही तिथे प्रतिसादात लिहिले तर मदत होईल.
मनिमोहर यांचे नाव आहे.
.मनिमोहर यांचे नाव दिले आहे. टीपा फ्रॉम मायबोली लिहिलंय.
परवानगिशिवाय लेखन चोरले आहेच
परवानगिशिवाय लेखन चोरले आहेच त्यामुळे ते चुकच आहे पण चोर थोडा प्रामाणीक आहे त्याने लेखन फक्त कॉपीपेस्ट केलेय वाटत त्यामूले मनिमोहर चे नाव तरी दिसते आहे नाहितर लेखन चोरुन स्वतःच्या नावानिशी छापणारे निर्लज्ज सुद्धा असतात.
मायबोली लिहिले आहे.पण
मायबोली लिहिले आहे.पण रिडायरेक्ट करणारी लिंक एकच ए लिहिल्याने चुकीच्या जागी जाते.
या आणि जुन्या काही लेखात क्रेडिट दिलेय. नव्या लेखांमध्ये काही ठिकाणी क्रेडिट दिलेले नाहीये
तसेच इतर कुठेतरी छापून आलेले लिखाण कॉपी पेस्ट करून आपल्या साईटवर ऍडसेन्स वापरून हिट्स वाढवणे मूळ लेखकाचे नाव दिले तरी परवानगी शिवाय करणे योग्य नसेल.
आणखीही पा.kru.आहेत तिथे
आणखीही पा.kru.आहेत तिथे,निगुतीची बर्फी आणि बकरीचे पुडींग.
तसेच इतर कुठेतरी छापून आलेले
तसेच इतर कुठेतरी छापून आलेले लिखाण कॉपी पेस्ट करून आपल्या साईटवर ऍडसेन्स वापरून हिट्स वाढवणे मूळ लेखकाचे नाव दिले तरी परवानगी शिवाय करणे योग्य नसेल.>> नाहिच आहे! योग्य ती कारवाई आवश्यक आहे
पुर्ण लेख किवा क्रुती वाटरमार्क करता येते का?
बकरीचे पुडींग.>>> बकरीचे
बकरीचे पुडींग.>>> बकरीचे नाही ताई भाकरीचे.
मला तो सर्राइत चोर वाटतोय. जर कुणी लेखकाने सायबर गुन्हा दाखल केला त्याच्याविरुद्ध तर कदाचित काही होईल असेही वाटतेय
बकरीचे नाही ताई भाकरीचे.....
बकरीचे नाही ताई भाकरीचे......ho g ho.taipatana भाकरी होते. autocorrect zale असावे.मीही आज सकाळी पाहिले,पण संपादन करू शकत नाही आता.
मला उकडीबद्दल असा प्रश्न आहे
मला उकडीबद्दल असा प्रश्न आहे की तांदूळ पिठी एकदम फ्रेश लागते का? यावर्षी माझी उकड काही केल्या नीट येत नाही. मला तसेही उकडीचे मोदक सुमार दर्जाचे येतात. पण पूर्वी निदान सुमार तरी जमायचे. यावर्षी उकड कितीही मळली तरी कडेनी भेगा पडतायत. मी 2 वेळा काढली. आता अजून तांदुळाची भाकरी नाही खाऊ शकत. फक्त तांदूळ पिठी जुनी आहे. एवढंच लक्षात आलंय.
मला उकडीबद्दल असा प्रश्न आहे
.
एक खूप बेसिक प्रश्न आहे.
एक खूप बेसिक प्रश्न आहे.
मी इंद्रायणी तांदूळ वापरू शकते का उकडीसाठी?
त्या मराठी कट्ट्यावर अगदी
त्या मराठी कट्ट्यावर अगदी मनीमोहोर नावाने ही रेसिपी दिलीय, खरं म्हणजे हे करायला नको होतं माझ्या परवानगी शिवाय. तिथे ही लिहिणारच आहे.
पण एकदा नेटवर टाकलं की आपला कंट्रोल जातो. परवानगी घेणे वैगेरे गोष्टी आहेत पण किती जणांना इतका विवेक असतो ? आणि कोण तक्रारी वैगेरे करणारे , म्हणून ह्यांचं फावत. ही लोकं नेटच्या महासागरातून हुडकून काढण ही किती कठीण आहे आणि धडा शिकवणं तर जवळ जवळ अशक्य. माझा फणसावरचा लेख पण असाच कोणीतरी आपल्या नावावर खपवला होता आणि तो जवळ जवळ 350 जणांनी शेअर केला होता . अचानकच मला ह्याचा शोध लागला ,मी तिथे निषेध ही नोंदवला पण आणखी फार काही करू शकले नाही मी.
मला उकडीबद्दल असा प्रश्न आहे
मला उकडीबद्दल असा प्रश्न आहे की तांदूळ पिठी एकदम फ्रेश लागते का? >> होय लागतेच , जुन्या पिठाचा चिकटपणा कमी होतो ज्याला विरी जाणे म्हणतात आणि उकड चिकट होत नाही त्यामुळे मग पारी फाटते, मोदक नीट वळता येत नाहीत.
मी विकतच पीठ आणलं तर नेहमी फ्रीज मध्ये ठेवते मग अगदी वर्षभर ही छान टिकत.
नुसत्या इंद्रायणीचे नाही होणार चांगले कारण तो तांदूळ खूपच चिकट असतो त्यात थोडा बासमती किंवा रोज चा कोलम मिक्स केला तर छान होतील.
मी ही याप्रमाणे केले होते
मी ही याप्रमाणे केले होते एकदा, पूर्ण इंद्रायणी तांदूळ वापरला होता. मोदक वळताना हाताला बोटांना चिकटत राहते मग. पण अजिबात चिरा नाही पडत.
पुन्हा करताना बासमती व इंद्रायणी अर्धा अर्धा घेईल.
यावर्षी शॉर्टकट मारलाय. रव्याची उकड काढून केलेत.
'तो' च आहे कशावरुन?
राँग धागा. सॉरि. काढुन टाकलेली आहे.
नुसत्या इंद्रायणीचे नाही
नुसत्या इंद्रायणीचे नाही होणार चांगले कारण तो तांदूळ खूपच चिकट असतो त्यात थोडा बासमती किंवा रोज चा कोलम मिक्स केला तर छान होतील.>>करून बघते असं. धन्यवाद!!!
सई,
सई,
मला यंदा प्रॉपर मोदक पिठी मिळालीच नाही, जनरली भारतातून अग्रज वगैरेची पाकिटं आणतात कोणीतरी नातेवाईक.
मग मी साध्या तांदूळ पिठाची उकड काढली. त्यात 2 वेगळ्या ब्रँड्सची पीठं घरात होती. पहिली नवी पिशवी फोडली पण ती उकड भाकरी करायला ठेवून दिली कारण एकदम फ्लॉप झाली. दुसरी मात्र व्यवस्थित झाली. ते पीठ खरं तर जुनं होतं. पण वर्क झालं.
तात्पर्य- नुसतं नवं की जुनं याबरोबरच वेगवेगळे ब्रँड्स, त्यात कोणता तांदूळ वापरलाय यानेही फरक पडतो.
हे सगळं खूप क्लेशकारक आहे.
हे सगळं खूप क्लेशकारक आहे. माझ्याकडे एक नवी पिठी आहे ती पाहते उघडून आणि घरी तांदूळ धुवून वाळवून करून पाहते.
पुढच्या वेळी नक्की तुमच्या
पुढच्या वेळी नक्की तुमच्या रेसिपीने करुन पाहते. यावेळी सोहम पिठी आणि प्लॅस्टिक मुद पाडायच्या चमच्याने पारी झिंदाबाद!
मोदक मस्तच दिसताहेत अंजली !!
मोदक मस्तच दिसताहेत अंजली !!
धन्यवाद अस्मिता
धन्यवाद अस्मिता
प्लॅस्टिक मुद पाडायच्या
प्लॅस्टिक मुद पाडायच्या चमच्याने>>>म्हणजे नक्की काय ते कळलं नाही.
बाकी मोदक खूप सुरेख दिसत आहेत!!
मनीमोहोर, आज तुमच्या या
मनीमोहोर, आज तुमच्या या पद्धतीने उकड काढून मोदक केलेत. एकदम मस्त, सोप्पी पद्धत आहे. जास्त मळायला लागली नाही आणि चक्क थंड झाल्यावरही व्यवस्थित पारी झाली. थँक्यू व्हेरी मच!
स्पर्धेसाठी पाककृती दिली आहे.
सुकुर मोदक
https://www.maayboli.com/node/76272
प्लॅस्टिक मुद पाडायच्या
प्लॅस्टिक मुद पाडायच्या चमच्याने>>>>>>>>>>>>> म्हणजे आपण सत्यनारायण प्रसादाची मुद पाडतो ना किंवा भाताची त्या चमच्यात उकडीचा गोळा दाबून वाटीसारखा आकार केला.
अंजली मस्त झालेत मोदक .
अंजली मस्त झालेत मोदक . मध्यंतरी मी ही हा व्हिडीओ पाहिला होता. दुसऱ्या एका व्हिडिओत तिने टूथ पीक ने मार्क करून कळ्या काढल्या होत्या ते ही छान दिसत होते.
मनीमोहोर, आज तुमच्या या पद्धतीने उकड काढून मोदक केलेत. एकदम मस्त, सोप्पी पद्धत आहे. जास्त मळायला लागली नाही आणि चक्क थंड झाल्यावरही व्यवस्थित पारी झाली. थँक्यू व्हेरी मच! Happy >> वावे थॅंक्यु. छानच झालेत मोदक . तिकडे ही लिहिलं आहेच. स्पर्धेसाठी शुभेच्छा .
मी आज या पद्धतीने उकड काढून
मी आज या पद्धतीने उकड काढून मोदक केले. खरेच खूपच सोपी पद्धत आहे. धन्यवाद. पण मोदक वाफवल्या नंतर मोदकांना चिरा पडल्या. माझं काय चुकलं असेल?
म्हणजे आपण सत्यनारायण
म्हणजे आपण सत्यनारायण प्रसादाची मुद पाडतो ना किंवा भाताची त्या चमच्यात उकडीचा गोळा दाबून वाटीसारखा आकार केला.>> ही कल्पना भारी आहे
ममोताई ,
ममोताई ,
आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे उकड काढून मोदक केले . रोजचा भाताचा लचकारी तांदूळच वापरला.
कसलं भन्नाट पीठ जमून आलं. मोदक पटापट वळता आले.
वर वावेने म्हटल्याप्रमाणे थंड झाल्यावरही व्यवस्थित पारी झाली.
आणखी एकदोन वेळा याच पद्धतीने करेन. मग एकदम fullproof .
मला, मोदक नीट वळायला जमायला लागल्यापासून , उकडीचे मोदक करायला फार आवडतात. पण उकड कधी जमली नाही.
.
.
माझ्या मावशीने मला मोदक वळायला शिकवले आणि आता तुमच्या मुळे उकड पण शिकले.
Happy teachers day . I want to meet you personally and give one tight hug
काय देखणे झालेत
काय देखणे झालेत
वा.. काय सुरेख झालेत
वा.. काय सुरेख झालेत
Pages