Submitted by पुरंदरे शशांक on 30 July, 2014 - 23:09
एक चिऊ गोजीरवाणी
एक चिऊ गोजीरवाणी
गात अस्ते गाणीच गाणी
गोबरे लाल मोठ्ठे डोळे
दुडकत चिऊ कश्शी चाले
हातात असते भावली एक
नाचत गिरकी घेत सुरेख
भाव्लीचे कधी लाड फार
कधी मिळतो चापट-मार
हे काय नि ते काय
चिऊताई थांबतंच नाय
तंद्रीत अस्ता चिऊताई
ऐकू मुळीच येत नाही
चिवचिव करता चिऊताई
हळुचकनी झोपून जाई ....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगली आहे , भावलीच्या जागी
चांगली आहे , भावलीच्या जागी बाहुली हा शब्द हवा.
मस्त बालगीत. भावलीच्या जागी
मस्त बालगीत.
भावलीच्या जागी बाहुली हा शब्द हवा.>>> मला वाटतं भावली शब्द मुद्दाम योजला आहे. लहान मुले असंच बोलतात म्हणून.
भावलीच्या जागी बाहुली हा शब्द
भावलीच्या जागी बाहुली हा शब्द हवा.>>> मला वाटतं भावली शब्द मुद्दाम योजला आहे. लहान मुले असंच बोलतात म्हणून. >>>> यू गॉट इट ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण मी तर बर्याचदा मोठ्या
पण मी तर बर्याचदा मोठ्या माणसांना सुद्धा भावली हाच शब्द उच्चारताना ऐकलाय म्हणुन सांगितलं