काय ऐकताय?

Submitted by रमा. on 19 July, 2014 - 08:59

कुठलं गाणं ऐकताय आत्ता? हिंदी, मराठी, इतर कुठल्या भाषेतली? कुठलं गाणं घोळतय मनात आणि वाजतय तुमच्या प्लेलिस्ट वर?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास!

चित्रपट : हरजाई (१९८१)
चित्रीत : रणघीर, टीना
गायिका : दिदी
संगीत : आर डी बर्मन
गीत : मुक्तिदा हसन निदा फाझली
***********************************
तेरे लिए पलकों की झालर बुनु
कलियों सा गजरे में बंधे फिरू
धुप लगे जहा तुझे
छाया बनु आजा साजन

गाण्यात चुनरिया शब्द असून पिक्चरायझेशन मध्ये नसणे...
असो
तरी सध्या रिपीट मोड वर आहे
(चित्रपट-जुग जुग जियो, गाणं- रंगी सारी गुलाबी चुनरिया)
https://youtu.be/bSAlE_WgHxY

एस>> खूप Doesn't
माहीत नव्हतं शोभाजीचं हे गाणं
निव्वळ अप्रतिम...

Submitted by एस on 9 July, 2022 - >>> हे नव्हत माहीत . धन्यवाद

>> गाण्यात चुनरिया शब्द असून पिक्चरायझेशन मध्ये नसणे...
true Lol

>> शोभा गुर्टु यांचे रंगी सारी गुलाबी
क्या बात !

>> या गाण्याची चाल खूप ओळखीची वाटतेय. हिंदी चित्रपटगीत?
हो ओळखीची वाटतेय. अगदी अशीच चाल नाही पण "ये नयन डरे डरे" आठवले

हि गाणी आधी ऐकली नव्हती. एका फेबु पोस्टच्या निमित्ताने ऐकली/ऐकतोय:
मदनमोहन हे रसायनच वेगळे आहे. पहिल्याच ऐकण्यात विरघळवण्याची ताकत आहे त्यात.

आज सोचा तो आंसू भर आये:
https://www.youtube.com/watch?v=lCk_tykuo_E

बैरन निंद न आये:
https://www.youtube.com/watch?v=UpqYMoxdL1g

है इसी मे प्यार कि आबरू:
https://www.youtube.com/watch?v=AlgzFrPoXlA

एकदा उस्ताद बडे गुलाम अली खान एका मोकळ्या ठिकाणी मैफीलीत गाणे सादर करीत होते. दूरवरुन कोणाच्यातरी रेडीओवरुन गाणे ऐकू आले 'कदर जाने ना'| तात्काळ त्यांनी मैफील थांबवली आणि ते म्हणाले याला म्हणतात खरा सूर. मी काय गाणार यापुढे? लतादीदी अणि मदन मोहनजींच्या गाण्याला मिळालेली यापेक्षा मोठी पावती ती कोणती? आज सोचा तो आंसू भर आये सारखे भावनाप्रधान गाणे रेकॉर्ड करताना लताजींना गहिवरुन आले. त्यांना गाणे म्हणता येईना इतक्या त्या भावविवश झाल्या.
(त्या post मधून साभार)

>> कुठलं गाणं घोळतय मनात

हे अचानक कुठून आलं मनात. काहीही आगापिछा नसताना. ते अजून सुरूच आहे. अशी गाणी मध्येच एखादी पाकोळी यावी आणि भिरभिरत खोलीभर फिरावी तसे मनात बराच काळ रुंजी घालत राहतात:
कल्पनेचा कुंचला

अगदी अचानक च हे गाणं कानावर पडलं आणि एक्दम मंत्रमुग्ध का काय ते झालं..
मन मायल. मायल ह्या शब्दा चा अर्थ कळाला तर बरं होईल Happy