बाउमकुखन (ट्री केक)

Submitted by मृणाल साळवी on 16 July, 2014 - 01:03

"बाउमकुखन" (Baumkuchen) मधे Baum म्हणजे जर्मन भाषेत झाड आणि Kuchen म्हणजे केक. हा केक originally rotisserie मधे बनवला जातो आणि जेव्हा हा केक कापतात तेव्हा त्यात झाडाच्या खोडामधे जश्या rings किंवा layers दिसतात, तसे ते वाटते. म्हणुन ह्याला झाडाचा केक (Baumkuchen) असे म्हणतात. माझ्याकडे rotisserie नसल्यामुळे मी तो केक पॅनमधे बनवायचा try केला आहे. I hope तुम्हाला सगळ्यांना आवडेल.

साहित्यः

केक साठी:

मैदा - १/२ कप
साखर - १/२ कप
थोडेसे ब्राउन केलेले बटर - १/२ कप
अंडी - २
बेकिंग पावडर - १/२ टी.स्पुन
रम इसेन्स - १/४ टी.स्पुन
व्हॅनिला इसेन्स - १/२ टी.स्पुन
दुध - ३ चमचे

चॉकलेट टॉपिंग साठी -

कुकिंग ७०% डार्क चॉकलेट - २०० ग्रॅम
heavy cream - १/२ कप
जिलेटीन - १ चमचा
रम इसेन्स - १/४ टी.स्पुन
व्हॅनिला इसेन्स - १/२ टी.स्पुन
गरम पाणी - १/४ कप
साखर - १ चमचा

कृती:

१. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन यावे.
२. एका बाउल मधे २ अंडी, साखर, व्हॅनिला इसेन्स, रम इसेन्स एकत्र फेटुन घ्यावे.

c1

३. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे.पाण्याला उकळी आल्यावर त्यावर ते अंड्याचे मिश्रण असलेले बाउल ठेवुन ३ मिनिटे परत फेटावे. (double boiler method वापरावी)
४. हे बाउल खालील गरम पाण्यास लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. नाहितर अंड्याचे scrambelled egg तयार होईल. Wink

c2

५. ३-४ मिनिटे चांगले फेटल्यावर त्यात थोडेसे brown केलेले पण खुप गरम नसलेले बटर ह्या अंड्याच्या मिश्रणामधे ओतुन निट मिक्स करावे.
६. निट मिक्स झाल्यावर त्यात चाळुन घेतलेला मैदा व बेकिंग पावडर टाकावे. हलक्या हाताने हे एकत्र करावे.
७. हे मिश्रण डोश्याच्या पिठाएवढे किंवा पॅनकेकेच्या पिठासारखे असले पाहिजे. जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको.

c3

८. ओव्हन २०० degree celcius ला preheat करुन घ्यावा.
९. एक केकचे भांडे घेउन त्याला बटर व मैदा लावुन घ्यावा व त्यावर बटर पेपर लावावा, त्यामुळे केक भांड्याला चिकटत नाही.

c4c5

१०. आता ह्या भांड्यामधे वरच्या मिश्रणातील १ पळी मिश्रण ओतावे. ते पुर्ण भांड्यात निट पसरुन घ्यावे व ओव्ह्नमधे ठेवुन ५ मिनिटे बेक करावे.

c6c7

११. ५ मिनिटात तो एक लेयर तयार झाला असेल. भांडे बाहेर काढुन त्यात अजुन १ पळी मिश्रण ओतावे व परत ओव्हनमधे ५ मिनिटे बेक करुन घ्यावे.

c8

१२. अशा प्रकारे सर्व मिश्रण संपेपर्यंत करावे. शेवटचा लेअयर तयार झाल्यावर केक बाहेर काढुन थंड होवुन द्यावा.

c9

१३. केक थंड होईपर्यंत चॉकलेटचे टॉपिंग बनवुन घेवु.
१४. एका भांड्यामधे क्रिम गरम करुन घ्यावे. त्यात चॉकलेटचे तुकडे, साखर, रम इसेन्स व व्हॅनिला इसेन्स टाकुन एकत्र करावे.
१५. वाटीमधे थोडे गरम पाणी घेउन त्यात जिलेटीन निट विरघळवुन घ्यावे. हे पाणी वरील चॉकलेटच्या मिश्रणामधे टाकुन निट मिक्स करावे.
१६. हे मिश्रण आता थंड झालेल्या केकवर ओतावे. सर्व बाजुने हे चॉकलेट लागले पाहिजे व वर चाचॉकलेटचा लेयर thick असला पाहिजे.

c10

१७. आता केक १-२ तास फ्रिजमधे सेट होण्यासाठी ठेवावा.
१८. केक खायला तयार आहे.

c11c12c13

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्ना, मी फक्त वाटण्याबद्दल लिहिलंय Happy तेव्हा सहमती आहेच..
मृणाल, बहिणीकडे जाऊन करीन आता एखादे दिवशी. एकीला दोघी तरी असतील मग माकाचु शोधायला!

चिऊ, आईसिंग पण जमेल. त्यात आपण जिलेटिन टाकल्यामुळे ते सेट होतेच. काहि प्रॉब्लेम येत नाही.

भारी आहे केक. तुमच्या ब्लॉगवरच्या बाकीच्या रेसिपीज पण मस्त आहेत पण मला हा केक सोडला तर बाकी कशाचेच फोटो दिसत नाहीत. काय कारण असावं?

शूम्पी, ओह्ह.. असे का बरे??? काय माहित नाही गं. मला तर सगळे फोटो दिसतात. परत एकदा ट्राय करुन बघ.

सगळ्यांना थँक्स.. हो मी काल घरी जाऊन चेक केले. जर पिकासा अल्बमचा प्रॉब्लेम झाला होता. आता चेक करुन बघा परत. सगळे फोटो दिसतात आता. Happy

वर्षा_म चाच प्रश्न मला पडलाय. लास्ट लेयर ला १५ मि बेकिंग पावडर बॅटर मध्ये असेल मग काही प्रॉब्लेम नाही होणार? आणि पुण्यात हेवी क्रीम कुठे मिळेल? हेवी म्हणजे व्हिपिंग क्रीम एवढं घट्ट का पातळ पण फॅट मुळे हेवी असं हवंय? आणि अल्युमिनियम चं नेहमीचं केक पात्र चालेल का? खूप थिक बॉटम नाहीये ते.

गायु.. हो अगं. काहि फरक पडत नाहि. पुण्यात हेवी क्रिम तर सगळ्या सुपर मार्केट मधे मिळायला पाहिजे. केक साठी whipping cream असे सांगायचे, ते रिलायन्स सुपरमार्केट मधे पण मिळेल बहुतेक.
हो. अल्युमिनियम चं नेहमीचं केक पात्रही चालेल. पण मग तुझ्याकडे अजुन कुठल दुसरे मोठे पात्र असेल, तर त्यात हे पात्र ठेवुन मग बेक कर. म्हणजे मग ते थिक बॉटमचे काम करेल.

मी ही पाककृती वापरून आयसिंग केलं. छान झालं. भारतात अमूलचं फ्रेश क्रिम मिळतं ते वापरून हे आयसिंग करता येतं.

इकडे लिहिल्याप्रमाणे अर्धा कप फ्रेश क्रिम घेतलं. त्यात घरी होती तेवढी चॉकलेट स्लॅब घातली. बहुतेक १००-१२५ ग्रॅमच होती. बाकी साखर, इसेन्स वगैरे सेम इथल्या मापाप्रमाणे.
मला व्हेज जिलेटिन मिळालं. ते एक चमचाभर पाव वाटी कोमट पाण्यात घातलं पण खूपच घट्ट मिश्रण तयार झालं. अजून थोडं पाणी घालूनही ते घट्टच होत गेलं. त्यामुळे झालं काय की ते जिलेटीन चॉकलेट+क्रिम मिश्रणात घातल्यावर टेक्श्चर ओबडधोबड झालं. ब्लेंडर घालून मिक्स करावं की काय वाटत होतं, पण क्रिममधून लोणी निघालं तर? अशीही भिती वाटली. त्यामुळे चमच्याने फेटून जितकं गुळगुळीत करता येईल तितकं गुळगुळीत केलं.
मस्त सेट झालं. चवही आवडली. मुख्य म्हणजे घरच्या घरी आयसिंग केल्यामुळे लेक प्रचंड खुश झाली. आता पुढच्यावेळी माकाचुवर मात करून इथे वर फोटोत दाखवलम तेवढं सुंदर आयसिंग नक्कीच करता येईल असा कॉन्फिडन्स आला आहे.

थँक्यू मृणाल Happy

ग्रेट मंजुडी... मस्तच. अगं ते जिलेटिन गरम पाण्यात आधी निट क्स करुन घ्यायच आणि मगच ते चॉकलेट मधे मिक्स करायचे. ते मिक्स झाले कि लगेच केक वर ओतायचे आणि सेट होऊन द्यायचे. तुला वाटले तर नेक्स्ट टाईम, जिलेटिन थोडे कमी वापर. छान होईल मग आयसिंग.

हो, जिलेटीन कमी घ्यायला हवे.

हे जिलेटिन काय असते नक्की?
व्हेज. जिलेटिनचे घटक काही वेगळे असतात का? पाण्यात मिसळ्यावर येणारा वास थेट अंड्याचा होता Wink

हो हे जिलेटिन animal fats पासुन बनवलेले असते बहुतेक पण आजकाल व्हेज जिलेटिन सुद्धा मिळते, पण ते एव्हढे easily सगळीकडे मिळत नाही.

वॉव मस्त केक. सुंदर दिसतोय.

इतका काटेकोरपणा जमेलसा वाटत नाही. कुणी केलाच तर खायला आवडेल Wink

वेज जिलेटीन म्हणजे अगरअगर. चायना ग्रासपासुन बनवलेले असते बहुधा.
जे जिलेटीन अगदी कमी लागते, म्हणजे दोन कप पाण्यात एक छोटा चमचा पण पुरेसे होते.

जिलेटीन प्राण्यांच्या (गाय-बैलव्वगैरे) हाडापासून असते.
वेजिटेबल जिलेटीन अगार-अगार ह्यापासून असते.
इती नेट्साभार

DSC_0626.JPG

इथली आयडीयाची कल्पना वापरुन केलेला पिल्सबेरी चॉकलेट + गोल्डन वॅनिला केक. २-२ लेअरचे २ केक केले. ते चिकटवायला / जोडायला फ्रेश क्रिम + जिलेटीनची एक अगदीच पातळ लेअर वापरली. ती खरे तर जाड अपेक्षीत होती पण क्रिम कमी घेतले मी. रक्षाबंधनाच्या गडबडीत वर व्हाईट चोकोलेट चे आयसिंग करायचे होते ते राहुनच गेले.

Pages