"बाउमकुखन" (Baumkuchen) मधे Baum म्हणजे जर्मन भाषेत झाड आणि Kuchen म्हणजे केक. हा केक originally rotisserie मधे बनवला जातो आणि जेव्हा हा केक कापतात तेव्हा त्यात झाडाच्या खोडामधे जश्या rings किंवा layers दिसतात, तसे ते वाटते. म्हणुन ह्याला झाडाचा केक (Baumkuchen) असे म्हणतात. माझ्याकडे rotisserie नसल्यामुळे मी तो केक पॅनमधे बनवायचा try केला आहे. I hope तुम्हाला सगळ्यांना आवडेल.
साहित्यः
केक साठी:
मैदा - १/२ कप
साखर - १/२ कप
थोडेसे ब्राउन केलेले बटर - १/२ कप
अंडी - २
बेकिंग पावडर - १/२ टी.स्पुन
रम इसेन्स - १/४ टी.स्पुन
व्हॅनिला इसेन्स - १/२ टी.स्पुन
दुध - ३ चमचे
चॉकलेट टॉपिंग साठी -
कुकिंग ७०% डार्क चॉकलेट - २०० ग्रॅम
heavy cream - १/२ कप
जिलेटीन - १ चमचा
रम इसेन्स - १/४ टी.स्पुन
व्हॅनिला इसेन्स - १/२ टी.स्पुन
गरम पाणी - १/४ कप
साखर - १ चमचा
कृती:
१. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन यावे.
२. एका बाउल मधे २ अंडी, साखर, व्हॅनिला इसेन्स, रम इसेन्स एकत्र फेटुन घ्यावे.
३. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे.पाण्याला उकळी आल्यावर त्यावर ते अंड्याचे मिश्रण असलेले बाउल ठेवुन ३ मिनिटे परत फेटावे. (double boiler method वापरावी)
४. हे बाउल खालील गरम पाण्यास लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. नाहितर अंड्याचे scrambelled egg तयार होईल.
५. ३-४ मिनिटे चांगले फेटल्यावर त्यात थोडेसे brown केलेले पण खुप गरम नसलेले बटर ह्या अंड्याच्या मिश्रणामधे ओतुन निट मिक्स करावे.
६. निट मिक्स झाल्यावर त्यात चाळुन घेतलेला मैदा व बेकिंग पावडर टाकावे. हलक्या हाताने हे एकत्र करावे.
७. हे मिश्रण डोश्याच्या पिठाएवढे किंवा पॅनकेकेच्या पिठासारखे असले पाहिजे. जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको.
८. ओव्हन २०० degree celcius ला preheat करुन घ्यावा.
९. एक केकचे भांडे घेउन त्याला बटर व मैदा लावुन घ्यावा व त्यावर बटर पेपर लावावा, त्यामुळे केक भांड्याला चिकटत नाही.
१०. आता ह्या भांड्यामधे वरच्या मिश्रणातील १ पळी मिश्रण ओतावे. ते पुर्ण भांड्यात निट पसरुन घ्यावे व ओव्ह्नमधे ठेवुन ५ मिनिटे बेक करावे.
११. ५ मिनिटात तो एक लेयर तयार झाला असेल. भांडे बाहेर काढुन त्यात अजुन १ पळी मिश्रण ओतावे व परत ओव्हनमधे ५ मिनिटे बेक करुन घ्यावे.
१२. अशा प्रकारे सर्व मिश्रण संपेपर्यंत करावे. शेवटचा लेअयर तयार झाल्यावर केक बाहेर काढुन थंड होवुन द्यावा.
१३. केक थंड होईपर्यंत चॉकलेटचे टॉपिंग बनवुन घेवु.
१४. एका भांड्यामधे क्रिम गरम करुन घ्यावे. त्यात चॉकलेटचे तुकडे, साखर, रम इसेन्स व व्हॅनिला इसेन्स टाकुन एकत्र करावे.
१५. वाटीमधे थोडे गरम पाणी घेउन त्यात जिलेटीन निट विरघळवुन घ्यावे. हे पाणी वरील चॉकलेटच्या मिश्रणामधे टाकुन निट मिक्स करावे.
१६. हे मिश्रण आता थंड झालेल्या केकवर ओतावे. सर्व बाजुने हे चॉकलेट लागले पाहिजे व वर चाचॉकलेटचा लेयर thick असला पाहिजे.
१७. आता केक १-२ तास फ्रिजमधे सेट होण्यासाठी ठेवावा.
१८. केक खायला तयार आहे.
वॉव! मी करायचा प्रयत्न
वॉव!
मी करायचा प्रयत्न करेन.
अनफ्लेवर्ड जिलॅटीन, अनसॉल्टेड बटर आणि रम इसेन्स मिळणे कठीण.
मस्तचं. आवडला.
मस्तचं. आवडला.
वॉव ! सुप्पर दिसतोय केक
वॉव !
सुप्पर दिसतोय केक
वॉव!! सुपर्ब केक. मी फक्त
वॉव!! सुपर्ब केक.
मी फक्त चॉकलेट आयसिंग करेन या कृतीने
मृणाल, वेगळी कृती आहे.
मृणाल, वेगळी कृती आहे. केकमधले लेअर्स आणि चॉ. आयसिंगपण मस्तच दिसत आहे.
I hope तुम्हाला सगळ्यांना आवडेल <<< खूप आवडला आणि अंड्याशिवाय ट्राय करेन.
मस्त दिसतोय!!
मस्त दिसतोय!!
I can get you Rum essence.
I can get you Rum essence. Terrific jhaale aahe.
अमा, रम इसेन्स प्लिज प्लिज २०
अमा, रम इसेन्स प्लिज प्लिज २० तारखेला घेऊन येशील का?
स्लर्प......
स्लर्प......
मस्तंच वाटतोय केक.
मस्तंच वाटतोय केक.
अबब क्रूती आहे पण केक
अबब क्रूती आहे पण केक नक्कीच यम्मी असेल.
एक प्रश्ण , इतक्या वेळा ते
एक प्रश्ण , इतक्या वेळा ते प्रत्येक भाग शिजल्याने द्राय लागत नाही का?
झंपी, केक ड्राय नाही लागत.
झंपी, केक ड्राय नाही लागत. वरती असलेल्या चॉकलेटच्या लेयरमुळे तो थोडा moist होतो. त्यामुळे काहि वाटत नाही.
वॉव, काय दिसतोय. अगदी सविस्तर
वॉव, काय दिसतोय. अगदी सविस्तर पाकृ आणि फोटो ही सुंदर. खूप स्कील लागत असेल ना हे करायला? ग्रेट आहात.
केक खुप इन्वाईटींग आहे....
केक खुप इन्वाईटींग आहे.... खुपच सही.... अंडी न घालता करता येईल का?
मी अंडी न घालता अजुन कधी केक
मी अंडी न घालता अजुन कधी केक केला नाहि. पण तुम्ही नॉर्मल बिनांड्याचा केक करत असाल, तर तेच मिश्रण थोडे पातळ करुन अशाप्रकारे बेक करुन बघा. माझ्यामते तो केक सुद्धा असाच दिसेल. फक्त चव थोडी वेगळी होईल.
मस्त दिसतोय केक. करायला मात्र
मस्त दिसतोय केक. करायला मात्र भिती वाटेल.
वॉव, काय
वॉव, काय दिसतोय................. मला तर आताच पाहिजे..:)
मस्त आहे एकदम.. करुन बघेन
मस्त आहे एकदम.. करुन बघेन एकदा.
ह्याची कृती वाचताना मला गोवन पदार्थ बेबेंकाची आठवण झाली. तोही असाच एकेक थर शिजवुन करतात.
बाकी असले जोखमीचे काम करताना हौशी फोटोग्राफरही सोबत असणे आवश्यक आहे ना??
जर्मनीच्या विजयासाठी हा केक
जर्मनीच्या विजयासाठी हा केक का?
केक आणि फोटो अगदी प्रो दिसतायत.
साधना धन्स अगदी बरोबर
साधना धन्स अगदी बरोबर ओळखलेत. हौशी फोटोग्राफरच आहे तो.
वर्षा, हो नक्कीच. जर्मनीसाठी त्यांचाच स्पेशल केक.
मस्त दिसतो आहे. टेम्प्टिंग पण
मस्त दिसतो आहे. टेम्प्टिंग पण टु मच वर्क
सुंदर ! ज्यांना हा केक खायला
सुंदर !
ज्यांना हा केक खायला मिळाला ते लकी
अतिशय टेम्टींग
अतिशय टेम्टींग
वॉव. भारीच दिसतो आहे.
वॉव. भारीच दिसतो आहे.
मृणाल अप्रतिम दिसतोय केक.
मृणाल अप्रतिम दिसतोय केक.
अब्बा! काय दिसतोय केक. उम्मॉ!
अब्बा! काय दिसतोय केक. उम्मॉ! मला केकमध्ये चॉकलेट आवडत नाही, पण हा केक आणी त्याचे लेयर्स कसले कातिल आहेत. अप्रतीम!
सही तोंपासु आहे. शंका - वरचे
सही तोंपासु आहे.
शंका - वरचे लेअर शिजताना / बेक होताना, खालचा जळत नाही का? अगदी रंग पण बदलला नाहिये.
तसे होउ नये म्हणुन बॅटर पातळ करायचे का?
वॉव...अप्रतीमच! आणि फोटोही
वॉव...अप्रतीमच!
आणि फोटोही टेम्प्टिंग!
अप्रतिम दिसतोय केक. आयता
अप्रतिम दिसतोय केक. आयता मिळाला तर बहार येईल
Pages