दिनांक ९/०७/२०१४ रोजी आषाढी एकादशी (देवशयनी) आहे .हे व्रत करणार्या सर्वांना ते विशेष फलप्रद व पुण्यप्रद ठरो ही विठ्ठलचरणी प्रार्थना
विठ्ठलाचे काही शेर
जेव्हा हवे घेशी बुडवशी विठ्ठला स्वतःमधे
आयुष्य माझे का तुला बिस्कीट-खारी वाटते
______________________________________
फुकटचे दु:ख प्याले की गझल चाखायला मिळते
तुझ्या गुत्त्यातली का मग सुखे खर्चीक मागू मी
______________________________________
एक सिग्रेट प्यावी तशी आठवण ओढतो मी तुझी
आणि प्रत्येक श्वासातुनी एक जादूगरी वाहते
______________________________________
नको बोलावणे धाडूस आषाढात यंदाच्या
पुन्हा शब्दांमुळे माझ्या तुझा पेटेल गाभारा
______________________________________
ना तुझा भार वाहणे माये
विठ्ठलाचा हमाल आहे मी
______________________________________
अन् मनाची तल्खली जोमात वाढू लागली
बस् तुझ्या यज्ञातली समिधा बनावे वाटले
______________________________________
साल हे आणेलही दुष्काळ बहुधा
वाटले नव्हते कमी भरणार वारी
______________________________________
~वैवकु
समिधा, सिग्रेट खूप आवडले
समिधा, सिग्रेट खूप आवडले
खर्चिक पण खूप आवडला
खर्चिक पण खूप आवडला
धन्यवाद जोशी
धन्यवाद जोशी
बिस्कीट-खारी आवडले वेगळं
बिस्कीट-खारी आवडले
वेगळं वाटलं.
सुंदर... फुकटचे दु:ख प्याले
सुंदर...
फुकटचे दु:ख प्याले की गझल चाखायला मिळते
तुझ्या गुत्त्यातली का मग सुखे खर्चीक मागू मी
... मस्तच
छान जमले शेर सारे. ll विठ्ठल
छान जमले शेर सारे.
ll विठ्ठल विठ्ठल ll
छान
छान