प्राध्यापकाला चावले आहे झुरळ

Submitted by खडूसराव on 8 July, 2014 - 00:58

प्राध्यापकाला चावले आहे झुरळ
की बहकला आहे पुरा लागून चळ ?

बोलायचा अवकाश की 'बंडल गझल'
प्रतिसादकाची काढतो अक्कल सरळ !

मद हुंगतो अपुलाच आणिक झिंगतो
भेंडाळला आहे पहा लिहितो उथळ

मंचावरी हा काफियांचा पूर का ?
ह्याच्या घरी मोरीतला फुटलाय नळ !

अवतार त्याचा हासुधा संपेल की
माबो ..तुला सोसेल तितकी काढ कळ

के. गो.

(शेवटचा शेर वैभव कुलकर्णी ह्यांचा.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांना प्राध्यापक संबोधून "प्राध्यापक" या शब्दांचा नकळत अपमान करत आहात. Wink
कृपया त्यांना देवपूरकर असेच संबोधावे.

आता काय झालं ?
शंभरी पार केलेल्या एका धाग्यावर मला आत्ताच्या क्षणी ६७ नवीन प्रतिसाद दिसतायत.. तिथेच काही तरी झालं असणार....

देवा ! पुरे कर !

गजल व्हायला किमान पाच शेर लागतात.

तुम्हाला एटीकेटी लावुन पास करुया.

एक शेर अजुन लिहा

वा खडूसराव वा
अजूनेक शेर कराच मग पाच शेर होतील

मद हुंगतो अपुलाच आणिक झिंगतो<<उत्तम

शेवटचा शेरही अप्रतीम

या गझलेवरून निकाळजे गायब आहेत. निकाळजेंना उलट्या होत आहेत असं कळालं. सांभाळा म्हणावं, उन्हाळा आला.

हाहाहा..... जबरी....वो आयेगा....जरुर आयेगा.....नाम बदल बदल कर आयेगा.....मस्त रचना

अहो ते ' हे पण पहा' बदलत रहातं. आता त्यांचीच एक दुसरी गझल आहे.
खैर, तुमचं तेवढं भाग्य नसावं Happy

मला तर दिसतायत हे पहा.
Untitled.jpg

पाखरांच्या थव्यांना दिसू लागले!
हासलो मी ब-याच वर्षांनी!

मला एक समजत नाही. एक व्यक्ती इतक्या विविध प्रकारच्या द्वीपदी इतक्या विविध भावनांच्या छटांनी घेऊन येतात; त्याला आक्षेप का असावा? काही द्वीपदी कुणाला आवडत नसतील तर त्या वगळून टाका. प्रत्येक द्वीपदी अर्थशून्य आहे का? मला तर वाटते की प्रोफेसरांच्या बहुसंख्य द्वीपदी अगदी अर्थपूर्ण आणि सुंदर आहेत. त्यांचा आस्वाद घ्या ना? Happy

माबोच्या ओबीव्हॅन द्वारा प्रसारीत झालेल्या काही तत्काळ प्रतिक्रिया

पहिला प्रतिसादक : ही गझल प्रोफेसरांची नाही. प्रोफेसरांवर केलेली आहे. प्रोफेसर ड्युआय घेत नव्हते तर त्यांचा ख-या नावाचा आयडी ब्लॉक झाल्याने नाईलाजास्तव त्यांना नवे नाव घ्यावे लागत होते. पण दर वेळी मोबाईल नंबरही देत होते. त्यामुळे इथे काही जण हा आयडी प्रोफेसरसाहेबांचा आहेत असं जे सूचित करत आहेत त्या संदर्भात एव्हढंच म्हणावंसं वाटतंय की त्या माणसाला आपले राहण्याचे ठिकाण मुंबई असं खोटं लिहीण्याची बुद्धी होणं शक्यच नाही.

दुसरी प्रतिसादिका : त्यांच्या गझला सुमार असतील तर दुर्लक्ष करायला हवे होते. पण वयानुसार ते चिडतात म्हटल्यावर अनेक ड्युआय काढून त्यांना उकसवणे, मग चिखलफेक, मग वयातल्या अंतराचा मुलाहिजा न ठेवता गलिच्छ शेरेबाजी (आणि मायबोली प्रशासनाने सुद्धा मूक पणे सर्व काही पाहणे) आणि त्याला प्रतिवाद करताना तोल गेला की गच्छंती हा क्रम काही वर्षे चालू होता. मात्र याच गोटातल्या एका सदस्याने चोरीच्या कथा लिहील्याचे उघड झाल्यावर मात्र त्याच्यावर कारवाई होऊ नये यासाठी अरण्यरूदन करण्यात हेच लोक पुढे का होते यावर मी मराठी मधे पॉईण्ट ब्लॅण्क या सदरात चर्चा होणार आहे. चर्चेसाठी इथल्याच विद्वतसभेतल्या यशस्वी कलाकारांना आमंत्रण दिलेले आहे. या कार्यक्रमात हाताने उचलून फेकता येतील अशा ठोस वस्तू वक्त्यांच्या आसपास ठेवू नयेत अशा सूचना काही सुजाण आयडींनी केल्या आहेत.

तिसरा प्रतिसादक : प्रोफेसर साहेबांच्या शेरामधे अमक्या तमक्याची जमीन वापरल्याने घोर अपराध झाला हे अत्यंत संतापाने लिहील्यावर घेतलेल्या अशा उल्टसुलट भूमिकेने तमाम मराठी विश्वात खळबळ माजलेली आहे. नाक्यानाक्यावर हीच चर्चा चालू आहे. सांस्कृतिक क्षेत्रात उलथापालथ होऊन प्रकाशनगृहांच्या शेअर्सचे भाव कोसळल्याने सोन्याला मागणी आली आहे. हाच ट्रेन्ड सुरू राहीला तर लक्ष्मीच्या घरी सरस्वती पाणी भरते हा वाक्प्रचार या ही पिढीला वापरात आणावा लागणार आहे. सांस्कृतिक क्षेत्राचा ठेका घेतलेल्यांमधे असे अनेकानेक ड्युआर निपजल्याने या क्षेत्रात संस्कृतीला पायजम्यांच्या नाड्या शोधत फिरण्याची वेळ आलेली आहे.

इथल्या सखोल आणि चिंतनयुक्त प्रतिसादामुळे आता बाळासाहेबांच्या मागे ड्युआयचे मोहोळ उठणार आहे हे तर उघडच आहे. पण गेल्या खेपेला बाळासाहेबांनी सत्तेत न येताही रिमोट कंट्रेलद्वारे चार आयडी गारद केले होते त्या सुंदर आठवणी इथे अप्रस्तुत ठरणार नाहीत.

खडूसराव एक नाही नि दोन नाही.
आत्ता एव्हढ्यात पुन्हा उगवले ते ही बायकी शैलीत आणि गायब झाले ते...