काँग्रेस आणि खास करुन राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात आपली डाळ शिजणे कठीण आहे हे जाणवल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या चाली खेळायला सुरवात केली आहे. त्यातली एक चाल आरक्षणाची होती. न्यायालयात हे टिकणार नाही माहित असताना ज्यांना राजकारणातल काही कळत नाही अश्या सामान्य लोकांच्या समोर आम्ही काहीतरी केल हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता. सहानभुती मिळवण्याचा हा प्रयत्न होता.
यातुन डाळ शिजायला किती उपयोग होतो हा एक संशोधनाचा भाग असेल. जनसामान्यांच्या खास करुन हे आरक्षण प्रत्यक्षात आल तर ज्यांचा फायदा होणार आहे अश्या लोकांच्या काही चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत अस दिसत नाही. आपली फसवणुक झाली आहे किंवा कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्यास फसवणुकीची खात्री झाल्याशिवाय रहाणार नाही.
ज्या आरक्षणाचा मंडल कमिशनने विरोध केला आहे, राणे कमिशनने विरोध केला आहे, २२ व्या बॅकवर्ड क्लास कमिशनने विरोध केला आहे अस असताना या न्यायिक प्रक्रियेतुन आरक्षण सुटणे म्हणजे दिव्य आहे.
http://www.thehindu.com/news/cities/mumbai/pil-challenges-maratha-reserv...
http://www.hindustantimes.com/india-news/mumbai/populist-but-will-decisi...
श्री केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टात जनहितार्थ याचिका दाखल करुन मंत्रीमंडळाने घेतलेल्या आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
स्थानिक नेते मात्र बॅनर बांधुन कुणी मेटे यांच तर कुणी काँग्रेस नेत्यांच तर कुणी छत्रपती महाराजांच अभिनंदन करुन मोकळे झाले आहेत. या सर्वांचा कयास आहे की खर काय ते शेवटच्या फसवणुक झालेल्या माणसाला समजेल तोवर निवडणुका होऊन काही मत गाठीला बांधता येतील. सामान्य जनतेला काय माहित की मंत्रीमंडळाचा निर्णय म्हणजे थोडीच अंमलबजावणीचा जी आर असतो.
भाजप -सेना या निर्णयावर मौन साधुन आहे. विरोध करावा तर लोकांना वाईट वाटेल आणि अभिनंदन कराव तर फसवणुकीच्या पापात सहभागी झाल्यासारख आहे. त्यापेक्षा मौन हे श्रेयस्कर.
या सर्व प्रकरणातली हवा गेल्यानंतर आता अजित पवारांनी १४४ जागा मागितल्या आहेत. याला बेस काय तर लोकसभेच्या काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादीला चार. म्हणजे राष्ट्रवादीच बळ महाराष्ट्रात जास्त आहे.
खरतर ज्या आघाडी धर्मावर या लोकसभा निवडणुकीत चर्चा झाली तो धर्म राष्ट्रवादीच्या लोकांनीत पाळला नाही अस आजवरच चित्र आहे. भाजप - सेना आघाडीच पण असच आहे. मीच मुख्यमंत्री होणार म्हणुन आधी उध्दवसाहेबांनी हवा केली. वास्तविकता लक्षात आल्यावर मग हे विधान मागे घेतले. आता त्याला उत्तर म्हणुन भाजपच्या जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीत स्वबळावर निवडणुका लढण्याचे आव्हान नेत्रुत्वाला केले गेले?
जनतेला एक चांगल सरकार हव आहे जे असल्या फुटकळ सवंग घोषणाबाजीत न अडकुन पडता चांगले निर्णय घेईल जे आमलात आल्यास जनतेचे भले होईल.
महाराष्ट्रातली जनता या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या मोळी बांधुन पोळी पिकवण्याच्या राजकारणाला कंटाळायला वेळ लागणार नाही. दुर्देवाने फक्त संधीसाधु नेते पाचव्या सहाव्या आणि सातव्या पक्षात असल्याने सध्यातरी नसल्याने ही सत्तेची रणधुमाळी पहात रहाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही याची जाणिव या चार पक्षांना आहे म्हणुन हा खेळ चालला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची ही चाल आहे की चारही पक्ष स्वतंत्र रित्या जर निवडणुका लढवतील तर निवडणुकानंतर काही आशादायक चित्र निर्माण होउन आपली सत्ता येईल. यासाठी भाजप सेनाच्या स्थानिक नेत्यांना फुस देण्याचे राजकारण ते करत आहेत. भाजप आणि सेना यात बेरकी नेतृत्व नसल्याने हे घडणार याची चाहुल आता या पक्षांच्या जाहिर वक्तव्यातुन आता येत आहे.
याचा परीणाम म्हणुन महाराष्ट्रात जे सरकार येईल त्यात समाजवादी पक्षाचे, मायवतीच्या बहुजन समाजवादी पक्षाचे, ज्यांना अस्तित्व अजिबात नाही अश्या कम्युनिस्ट पक्षाचे आमदार निवडुन येऊन सरकारला बाहेरुन पाठींबा दिल्यास आश्चर्य वाटायला नको.
असे झाल्यास येणारे सरकार फारच संधीसाधु लोकांचे असेल ज्याचा परिणाम म्हणुन कोणतेही चांगले निर्णय न होता फक्त लोकांना नको असलेले निर्णय होतील.
असे सरकार हवे आहे का महाराष्ट्राला ? याचा निर्णय घ्याची वेळ आलेली आहे.
गेल्या दोन दिवसात माझ्या या
गेल्या दोन दिवसात माझ्या या लेखनाला काहीच प्रतिसाद आला नाही त्यामुळे हा खरच जनतेच्या मनातला विषय होताका हा संभ्रम मलाच पडला होता.
आज सकाळी "सकाळ" आला आणि मायबोलीकरांनी नाही तर जनतेने या लेखाला प्रतिसाद दिला अश्या भावना माझ्या मनात आल्या. हे अगदी मला वाटत अगदी तस नसल तरी जनतेच्या सर्वसाधारण प्रतिक्रिया अश्याच आहेत.
ही घ्या इसकाळची लिंक
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4729013342367354430&Se......
अर्थशास्त्र सांगते.. गरजांचे
अर्थशास्त्र सांगते..
गरजांचे दोन प्रकार असतात.
१ रिअल नीड ... ही त्या व्यक्तीची प्रत्यक्ष गरज असते.
२. फेल्ट नीड ... सबंधित व्यक्तीला असे वाटते की ही आपली गरज आहे.
रिअल नीड हीच जेंव्हा फेल्ट नीड. असते तेंव्हाच माणसाची पावले योग्य मार्गावर रहातात.
उदा.
अन्न वस्त्र निवारा या रिअल नीड आहेत. पण दारुड्या माणसाला दारु ही गरज जास्त तीव्र वाटत. असते. दारु ही रिअल नीड नाही , ती त्याची फेल्ट नीड असते. पण्मनुष्य फेल्ट्नीडला जास्त महत्व्देतो.
* * मन्दिर, अमु.भाषेतच शिका, श्रींचे राज्य याअसल्या भ्रामक फेल्ट नीडच्या मागे हा देश आजवर धावला आहे.
आणि ज्यांनी रिअल नीड्स भागवायला पाहिल्या त्या सत्तधीशांच्या पदरात मात्र शिव्याच आलेल्या आहेत. मg ते मोघल असोत वा इंग्रज वा काँग्रॅस असो.
असो.
आणि ज्यांनी रिअल नीड्स
आणि ज्यांनी रिअल नीड्स भागवायला पाहिल्या त्या सत्तधीशांच्या पदरात मात्र शिव्याच आलेल्या आहेत. मg ते मोघल असोत वा इंग्रज वा काँग्रॅस असो.
असो. किंवा मोदी असोत.
काय सिध्दांत आहे. जेव्हा राजसत्ता असा प्रकार नव्हता तेव्हा भुकबळीच जात होते. जंगलात सुध्दा प्राणि स्थलांतर करतात आणि भुक भागवतात.
राजसत्तेची आवश्यकता सेफ्टी निड मधुन आली आहे. सर्व जग आपल्या आमलाखाली आणाव ह्या राक्षसी महत्वाकांक्षांना पायबंद घालायला मग ते मुघल असोत की इंग्रज.
जर ६५ वर्षे राज्य करुन बेसीक गरजा भागवता येत नसतील तर स्वतःहुनच पाय उतार व्हायला हवे होते. ६५ व्या वर्षी फुड सिक्युरीटी बील आणुन स्वतः भोवती आरती फिरवण्याचा निलाजरे पणा कुणी केला नसेल.
मोदी सरकारनेही त्याच बिलाच्या
मोदी सरकारनेही त्याच बिलाच्या खाली गोरगरीबाना अन्न देऊ असे जाहीर केले.
सर्व भारतावर सत्ता गाजवण्याची इच्छा ही राक्षसी इच्छा !
मग हिंदु संस्कृतीत अश्वमेध यज्ञ , वेदातील कॄण्वन्तु विश्वम आर्यम आणि भाजपाचा पूर्ण बहुमताचा आgrah हे काय होते?
वाजपेयी सरकारने जाताना कॉम्ग्रेसला रिकामी तिजोरी दिली होती.
सोनिया सरकारने मोदी सरकारला तिजोरी भरलेल्या अवस्थेत दिलेलीआहे.
मोघलानी आणि इंग्रजानीही देशाची तिजोरी भरुन मग निरोप घेतला होता. हिंदु संस्थानिकांनी मात्र ४७ साली निरोप घेताना तिजोरी आपल्या घरीच ठेवली.
जागे व्हा !
जागे व्हा ! आणि काय करा??
जागे व्हा !
आणि काय करा?? काय करण्यासारखे आहे? ऑप्शन्स द्या..
कॉंग्रेस् आणि राहुलबाबा हाच एकमेव उतारा असेल बहुतेक..... birds of same feathers...
मग हिंदु संस्कृतीत अश्वमेध
मग हिंदु संस्कृतीत अश्वमेध यज्ञ , वेदातील कॄण्वन्तु विश्वम आर्यम आणि भाजपाचा पूर्ण बहुमताचा आgrah हे काय होते?
भारतातल्या कोणी राजाने गेल्या एक हजार वर्षात कुणावर आक्रमण केलेले नाही. हे वाक्य माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे आहे.
सिकंदर भारतात आला, मुघल भारतात आले, इंग्रज भारतात आले ते काय जनसेवा करायला ? लुट केली लुट त्यांनी हे इतिहासाला मान्य आहे.
भारतातुन मात्र कुणी बाहेर गेले नाही याच अर्थ भारतीय हांडगे होते अस नाही.
संस्कृती प्रचार म्हणजे धर्माच्या नावाखाली होणारे आक्रमण टाळणे. जो जे वान्छील तो ते लाहो हे ज्ञानेश्वरांनी म्हणलय ते याच हिंदु संस्क्रुतीच्या आधाराने.
लुट केली लुट त्यांनी हे
लुट केली लुट त्यांनी हे इतिहासाला मान्य आहे.
.......
आणि इथल्या एतद्देशीय राजांनी काय केलं ? समाजसेवा का? ४७ साली केली तशी ?
लगो, केवढा जालिम द्वेष
लगो, केवढा जालिम द्वेष तुम्हारे मन मे कूट कूट के भरा हुआ है !
तो आत्यंतिक द्वेषाचा रंगीत चष्मा काढून बघा एकदा.
कॉंग्रेस् आणि राहुलबाबा हाच
कॉंग्रेस् आणि राहुलबाबा हाच एकमेव उतारा असेल बहुतेक..>>> असेल बहुतेक नाही.तोच उतारा आहे त्यांच्यामते.
हिंदु संस्थानिकांनी मात्र ४७ साली निरोप घेताना तिजोरी आपल्या घरीच ठेवली...... मुस्लिम संस्थानिकांनी देशासाठी संपत्ती वाटली का ?
<आणि काय करा?? काय
<आणि काय करा?? काय करण्यासारखे आहे? ऑप्शन्स द्या..
कॉंग्रेस् आणि राहुलबाबा हाच एकमेव उतारा असेल बहुतेक...>
<असेल बहुतेक नाही.तोच उतारा आहे त्यांच्यामते. >
तुम्ही निवडलेला पर्याय अजूनतरी काही वेगळे करताना दिसत नाही. नावडतीचे मीठ अळणी म्हणतात ते असे.
नवी दिल्ली : वाढत्या
नवी दिल्ली : वाढत्या मध्यमवर्गासह त्यांच्या वाढत्या विवेकाधीन खर्चामुळे भारत २०५० पर्यंत जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार देश बनेल. जागतिक आयातीत ५.९ टक्के वाटा असलेला भारत चीन आणि अमेरिकेच्या मागे असेल. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सध्याच्या अनुमानित रँकिंगनुसार, भारत २.८ टक्के आयात वाट्यासह सर्वात मोठ्या आयातदार देशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे आणि २०३० पर्यंत चौथा सर्वात मोठा आयातदार बनणार आहे, असे एका नवीन अहवालात म्हटले आहे.
===========
https://maharashtratimes.com/business/business-news/india-will-be-third-...
===========
काही समजले नाही.
आयात जास्त म्हणजे चलन जास्त बाहेर जाणार आणि जास्त कचरा आय येणार ना ? मग त्या कर्मफलवादाचे काय होणार ?
गल्फ असेल , मालदीव असेल , हे लोक अन्नधान्यही आयात करतात , कारण त्यांची मजबुरी आहे, तिथे काही पिकतच नाही.
पण भारताला दिवसेंदिवस आयात वाढवायची काय आवश्यकता आहे ?
रिअल नीड्स, ज्याला एकेकाळी
रिअल नीड्स, ज्याला एकेकाळी मराठीत खर्या गरजा म्हणत, त्या कश्या पुर्या करायच्या हा फार गहन प्रश्न आहे. त्याला बुद्धिमत्ता तर लागतेच पण सर्व लोकांना आपले म्हणणे पटवून देण्याची कला लागते. मग सगळे लोक पाठीशी उभे रहातात.
महात्मा गांधीचे उदाहरण पहा, त्यांनी काय जादू केली नि सगळी जनता त्यांच्यामागे उभी राहिली.
आजकाल मुळी, पक्ष, राजकारण, निवडून येणे याच राजकारणी लोकांच्या खर्या गरजा झाल्या आहेत, जनतेच्या गरजांची त्यांना पर्वा नाही. त्यामुळे भांडणापलीकडे सार्वजनिक पातळीवर काहीहि हालचाल होऊ शकत नाही.
खरे तर जगच या दिशेने चालले आहे - राजकारणा खेरीज लोकांना काही सुचतच नाही, नि राजकारण म्हणजे भांडणे असेच समीकरण झाले आहे.
हे सर्व जगात जरी होत असले तरी भारताबद्दल मला आशा आहे, कारण भारतात माझ्या मते जास्तीत जास्त बुद्धिमान लोक रहातात (दुर्दैवाने मूर्खपण खूप आहेत) शिवाय भारतीय संस्कृति "सर्वेSपि सुखिनः संतु" "जे खळांची व्यंकटी सांडो" अशी आहे. फक्त माझे भले किंवा खळ लोकांनाच मारून टाका अशी नाहीये. दुर्गुण नाहीसे करा नि सर्व लोकांना सुखी करा.