तर मी चक्क उकडलेली अंडी का इथे मांडलीत ? मी अंडी खात नाही.. ( त्याच्यामागे मोठा इतिहास आहे.
मी ५ वर्षांचा असताना माझे एका कोंबडीवर प्रेम बसले होते. पण तिची योजना ज्या कारणासाठी झाली
होती, त्याच कारणासाठी घरातच तिची कत्तल झाली.. मेल्यावरही तिच्या पोटात अंडे सापडले. त्या तिच्या
त्यागाने मी फारच इमोशनल झालो आणि त्यानंतर अंडेच काय, नॉन व्हेज खाणेही सोडले... मला माहीत
आहे माझ्या या प्रेमकहाणीला सर्व हसणार आहात.... दुनिया ऐसीही होती है... आवरा ! )
या पुस्तकाच्या काळात, जेवणामधे काहीतरी वेगळे करावे असे खानसाम्यांना वाटत असे. एका राज्याच्या
दरबारी खानसाम्याने ताटातील सर्व पदार्थ साखरेपासून केले होते. तर एकाने पिस्त्यांना डाळीसारखे कापून
त्याची डाळ व बदामांना तांदळासारखे कापून त्याचा पुलाव केला होता.
आणखी एकाने शिजवलेल्या भाताचा प्रत्येक दाणा अर्धा केशराच्या पाण्याने रंगवून मोत्या पोवळ्याचा पुलाव
केला होता.
ही परंपरा ओगलेआज्जींनी देखील पाळली. त्यांनी फसवे डिंकाचे लाडू ( कणीक व पोहे वापरून ) फसवे अळीवाचे
लाडू ( गाजराचा किस वापरून ) लिहिले आहेत.
या पुस्तकातही असे काही पदार्थ होते. कृत्रिम ऑमलेट आहे, ते उडदापासून बनवलेले होते. कृत्रिम कणंग
नावाचा एक पदार्थ होता. शिजलेल्या भातात साखर घालून ती जिरवायची. मग लाल चवळी, शिजवून
वाटायची. त्याची पारी करून आत साखरभात भरायचा. त्याला लांबट आकार द्यायचा. आणि ते वाफवायचे.
तशी हि अंडी देखील फसवी आहेत. ( माझे तिच्यावरचे प्रेम फारच सच्चे होते बरं ! )
याची कृती त्या पुस्तकातच आहे. कृत्रिम कवठें या नावाने.
अंडी फोडून त्यातला बलक काढून ती रिकामी करायची. मग पिठाच्या आधाराने उभी ठेवायची.
चायना ग्रास कापून दूधात शिजवायचे. त्यात साखर घालायची. मग ती अंडी त्या मिश्रणाने अर्धी भरायची.
मग माव्यात केशर घालून त्याचा गोळा करायचा. तो गोळाही त्या अंड्यात टाकायचा. मग परत चायना ग्रास
शिजवून त्यात टाकायचे. ते सेट झाले कि कवच फोडून आतले अंडे मोकळे करायचे, आणि उभे कापायचे.
हा पदार्थ करून बघायची मला फार ईच्छा होती पण माझे काही प्रॅक्टीकल प्रॉब्लेम्स होते. अंडी फोडल्यावर
माव्याचा गोळा घालण्यासाठी मोठे छिद्र करावे लागणार मग तेवढ्या भागाचा गोलाकार परत कसा आणायचा.
आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्या बलकाचे मी काय करू ?
परवा बाजारात किंडर जॉय चॉकलेट्स बघितली आणि माझे काम फारच सोपे झाले. फक्त द्रव ओतताना
तो थोडा थंड करून ओतावा लागला. ( एका चॉकलेट शेलची वाट लावली. )
तर अशा तर्हेने मी माझ्या पहिल्या प्रेमाशी एकनिष्ठ राहिलो.
जेवणावर राहून गेलेली स्वीट डीश... स्वीकार करावी.
माझ्या पाककलेतील दुसर्या गुरू लक्ष्मीबाई धुरंधरांना साष्टांग नमस्कार !
अरे देवा! माझा साष्टांग
अरे देवा! माझा साष्टांग नमस्कार तुम्हाला.
अप्रतिम .........
अप्रतिम .........
वॉव मस्तच
वॉव मस्तच
वा.. कमाल आहे..
वा.. कमाल आहे..
अरे देवा!! ग्रेट आहात. अनोखी
अरे देवा!! ग्रेट आहात.
अनोखी पाकृ.
जबरी! ( ते काय ते भहारी की
जबरी! ( ते काय ते भहारी की जबराहट असे लिहीतात ना तसे) कहाणी रन्जक आहे.:स्मित:
मोहसीना मुकादम यानी साप्ताहीक सकाळ, लोकप्रभेत तसेच लोकसत्तेत मुघलाई व व्हेज खाण्याबद्दल छान व सुरस माहिती दिली होती त्याची आठवण आली. पण तुमची माहिती ही तेवढीच चविष्ट असल्याने वाचण्यासाठी धीर धरवत नाही.
वा दिनेशदा.. मानले तुम्हाला.
वा दिनेशदा.. मानले तुम्हाला. ह्याची चव कशी लागते?
तसेच तुम्ही ह्याचे प्रत्येक स्टेपचे फोटो टाकाल का? कारण नीट समजले नाही, नक्की कसे केले ते.
खर्वस सारखी लागते चव,
खर्वस सारखी लागते चव, मृणाल.
करताना फोटो नाही काढले पण ते किंडर जॉय चॉकलेट मिळाले तर पुढचे फारच सोपे आहे.
वाह!
वाह!
मस्त ! --------^----------
मस्त !
--------^---------- घ्या !
अमेझिंग......... कल्पनाही
अमेझिंग......... कल्पनाही केली नव्हती असे काही असेल म्हणुन.. मीही करुन पाहिनच आता.
धन्स दिनेशदा. हो इथे किंडर
धन्स दिनेशदा. हो इथे किंडर जॉय तर मिळते. पण मग तुम्ही त्यात ते मिश्रण कसे भरले आणि आतले बलक साठी मावा कसा भरला?
अमेझिंग
अमेझिंग
त्या चॉकलेट्स चे दोन आडवे भाग
त्या चॉकलेट्स चे दोन आडवे भाग होतात. मग त्यात थोडे कोमट मिश्रण भरायचे. आणि माव्याचा गोळाही अर्धा कापून ( मिश्रण कोमट असतानाच ) अलगद ठेवायचा. यात खरे तर खुप प्रयोग करण्यासारखे आहेत. रंग देखील
वापरता येतील.
----------/\----------- सां
----------/\-----------
सां न स्विकारा !!
सुंदर!! माव्याचा गोळा चायना
सुंदर!!
माव्याचा गोळा चायना ग्रासमधे टाकल्यावर तळाशी नाही का जात?
येवढी हायउपस करण्यापरिस
येवढी हायउपस करण्यापरिस डायरेट कोंब्डीचं अंडं उकडून ठेवावं म्हणतो मी
पण दिनेशदा,
भयंकरच सुंदर जमलियेत अंडी. लै भारी!
(अंड्यासाठीचा कवीट/कवठ हा शब्द फार दिवसांनी वाचला)
नाही, हे चायना ग्रासचे मिश्रण
नाही, हे चायना ग्रासचे मिश्रण थोडे घट्ट शिजेल एवढे चायना ग्रास त्यात घालायचे. मी घरगुती मावा वापरलाय ( मिल्क पावडरपासून केलेला ) पनीर पण वापरता येईल.
साष्टांग नमस्कार
साष्टांग नमस्कार
बाप रे !!! मला वाटले अंडी
बाप रे !!!
मला वाटले अंडी चकाचक कशी उकडवावीत यासाठी माहीती असेल पण भलतेच निघाले..
एखाद्या शुद्ध शाकाहारी कुटुंबातील मित्राच्या तोंडात त्याच्या घरच्यांसमोरच कोंबायला किती मजा येईल.. एकदा का पार झाले की बिचारा घरच्यांना ते नकली होते हे पटवून देत बसेल आयुष्यभर..
दिनेशदा, मला वाटलं तुम्ही आता
दिनेशदा, मला वाटलं तुम्ही आता शेवटी ती अंडी कशी कापलीयत यावर डिबेट ठेवताय कि काय?
म्हणुन बारकाइने बघत होतो. त्यातल्या डोळ्यात भरणार्या गोष्टी म्हणजे पिवळ्या भागात २ बुडबुडे आलेत आणि त्याचे टेक्शर टोतल वेगळे आहे. तसेच एक स्सईडला एक बारीक पापुद्रा आलाय.
पण बाकि सगळे वाचल्यावर :नमस्कारः .....
मला त्यातली इंप्रेसिव्ह वाटणारी गोष्ट म्हणजे त्याचा शेप. आणि पांधर्या भागाचे टेक्शर.
दि>>>>>>>ने श............
दि>>>>>>>ने श............ देवा देवा... ___/\___ किती कठीण असतील करायला
अंड्यासारखा दिसणारा गोड पदार्थ.......... मला उकडलेली साधी सुधी अंडीच बासेत रे बाबा..
साष्टांग नमस्कार. किंडर जॉयचा
साष्टांग नमस्कार.
किंडर जॉयचा वापर करण्यातली हुशारी मानली पाहिजे.
अगदी खरेखुरे शाकाहारी अंडे झाले.
इथे अजय यांचा मोलेक्युलर गॅस्ट्रॉनॉमीवरचा लेख होता, त्यातल्या पदार्थांचा पूर्वज असावा हा पदार्थं.
लै भारी! "अंडी फोडून त्यातला
लै भारी!
"अंडी फोडून त्यातला बलक काढून ती रिकामी करायची" >>
कट्टर शाकाहारी नाही खाणार हे असं बनवलेलं कृत्रिम अंड, शेवटी खरं अंड शहिद तर होतच आहे ना!!
तुमची किंडरवाली आयडिया भारी आहे मुळ पाकृ पेक्षा!!
_/\_
दन्डवत!!!!!!!!!!!!!!! कहाणी
दन्डवत!!!!!!!!!!!!!!!
कहाणी पण भारीच होती.
कल्पना उत्तम आहे. मोलेक्युलर
कल्पना उत्तम आहे. मोलेक्युलर गॅस्ट्रॉनॉमीचाच एक प्रकार म्हणायला हरकत नाही.
सॉलिड!!!
सॉलिड!!!
मला सुद्धा हवीत ही कृत्रिम
मला सुद्धा हवीत ही कृत्रिम अंडी खायला... काय खरी खरी दिसत आहेत. तुम्हाला साष्टांग नमस्कार दिनेशदा.
धन्य आहात तुम्ही दिनेश.
धन्य आहात तुम्ही दिनेश. तुम्हाला नमस्कारच
कल्पकतेला ___/\___.मला तरअंडी
कल्पकतेला ___/\___.मला तरअंडी सॉफ्ट उकडलेली आहेत असेच वाटले होते.
कवठ हा शब्द फार दिवसांनी वाचला>>>>> अगदी.
Pages