कालच मुंबईच्या महानगरपालिका आयुक्तांनी मुंबईला पाणी पुरवठा करणार्या तलावांमध्ये फक्त ४० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे यामुळे मुंबईत आता पाणी कपात करण्याची वेळ आली आहे असे सांगीतले.
मुंबईच्या नगरसेवकांना आणि लोकसेवकांना आता मिटींग घेऊन पाणी कपातीसाठीचा प्रस्ताव स्विकारावा असे समजवावे लागेल अशी ही घोषणा होती.
मुंबईच काय पण पुण्यात आणि सर्वच शहरात आणि खेड्यात आता जर पाऊस पडला नाही तर काय कल्पनेने सर्वांच्याच तोडचे पाणी पळते.
ही बातमी येऊन २४ तास झालेत आणि मुंबईत पाऊस सुरु झाल्याच्या बातम्या दुरदर्शवरुन दाखवल्या जात आहेत. आता नालेसफाई न झाल्यामुळे शहरात कसे पाणी तुंबले आहे यावर ब्रेकिंग न्युज येतील.
मुंबई पाठोपाठ पुणे आणि अन्य शहरात पाउस पोहोचेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
मायबोलीवरच मुंबईतले तलाव कसे पाण्यासाठी पर्यायी स्त्रोत आहेत यावरचे लेख वाचल्याचे स्मरते. मुंबईचे नगरसेवक, आमदार खासदार आणि पाणी पुरवठ्याला जबाबदार असलेले अधिकारी कधी काळी मुंबईत ५० टक्के सुध्दा पाऊस पडणार नाही असे गृहीत धरुन काही दिर्घकालीन उपायोजना करण्याचा विचार का नाही करत ?
मुंबईतले मायबोली वाचक कल्पना करुन पहा की जर मुंबईत दुर्दैवाने पावसाने एखादा पावसाळा जर हुलकावणी दिली तर काय होईल ?
माकड म्हणे पाउस पडत असताना पुढच्या पावसाळ्याच्या आधी घर बांधायचे ठरवते आणि पाउस संपल्यावर विसरुन जाते तसे माणसाचे झाले आहे.
एखाद्यावर्षी सुध्दा अस घडणारच नाही हे एकदा शास्त्रज्ञांनी सांगाव म्हणजे असल्या ब्रेकींग न्युज लागल्या ( फक्त ४० दिवस पुरेल इतका पाण्याचा साठा मुंबईत शिल्लक आहे ) म्हणजे वेडे आहेत झाल म्हणुन चॅनल बदलण सहज जमेल.
अस घडणार असेल तर मग मात्र एखादी एन जी ओ स्थापन करुन याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.
मुंबईतले तलावच काय नद्याही
मुंबईतले तलावच काय नद्याही पाण्याचा उत्तम स्त्रोत आहेत. त्यांची साफसफाई झाली तर वाहतूक आणि पाणी
दोन्ही प्रश्न सुटतील.
माझ्या लहानपणी मालाडला आम्ही विहिरीचेच पाणी वापरत होतो. ती विहीर कधीही आटत नसे. त्या भागात
प्रत्येक १ - २ बिल्डींगमागे एक विहीर होती. ठिकठिकाणी तलावही होते. त्यांचेही पाणी वापरात होते. मालाडला
आमची लेन टँक लेन या नावाने ओळखली जात असे. आता ते नाव आहे पण तलाव बुजवलाय. तिथे उद्यान आहे.
अर्थात पाण्याचे नियोजन तर हवेच पण वाढती मागणी लक्षात घेता पर्यायही शोधायला हवेत. ज्यांना परवडेल त्यांच्यासाठी दुबईप्रमाणे समुद्राचे पाणी गोडे करून वापरता येईल. सायकलसारखे सामान्य तंत्रज्ञान वापरूनही
दूषित पाणी स्वच्छ करता येते ( असे प्रयोग मी बघितलेत. )
प्रत्येक सोसायटीने रेन हार्वेस्ट करावे असा नियम येणार होता, त्याचे काय झाले कळले नाही.
<माकड म्हणे पाउस पडत असताना
<माकड म्हणे पाउस पडत असताना पुढच्या पावसाळ्याच्या आधी घर बांधायचे ठरवते आणि पाउस संपल्यावर विसरुन जाते तसे माणसाचे झाले आहे.> + १००
पुण्यात सुध्दा पाउस पोहोचला.
पुण्यात सुध्दा पाउस पोहोचला. आत्ता चांगला तासभर पाऊस होतोय.
पुण्यात सुध्दा पाउस पोहोचला.
पुण्यात सुध्दा पाउस पोहोचला. आत्ता चांगला तासभर पाऊस होतोय.
>>>
कुठे कुठे????
माझ्याकडेच का नाही आलाय तो अजुन?
आज पिंचिंला छान भुरभूर आहे
आज पिंचिंला छान भुरभूर आहे
थोडा पुण्याला पाठवा. अजुन
थोडा पुण्याला पाठवा. अजुन लाजत लाजत पडतोय. आमच्या इथल्या अमुककर, तमुककर यांच्या विहिरी भरायला हव्यात.
ओ मग आम्ही पिंचिंकरानी पवना
ओ मग आम्ही पिंचिंकरानी पवना डॅम कसा भरायचा? आता तर आम्ही रावेतचा गाळपण काढला, तर पाणी नको भरायला? अन आमचे पण अमुककर तमुककर आहेतच की!
पिंपरी चिंचवड मधे कुठले हौद
पिंपरी चिंचवड मधे कुठले हौद आनि विहरी ?
ती लग्झरी फक्त पुण्यात.
पिंपरी चिंचवड वाल्यांचे पवना धरण भरणार आणि दुसरा पर्याय डोळ्यातुन पाणी काढायचा त्यावर फुल्ली मारली.
कुणाला रेन वॉटर हार्वेस्टींग ची सोप्पी पध्दत जाणुन घ्यायची असेल.
१) तुमच्या सोसायटीच्या मालकीचे एखादे सुकलेले बोअरवेल असेल.
२) रेन वॉटर हार्वेस्टीग साठी सोसायटी तयार असेल.
फक्त पिंपरी चिंचवड विभागात मी मार्गदर्शनाला तयार आहे.