सोनचाफा.... नावातच सुवर्ण अनुभुती... माझ सगळ्यात आवडत फुलं.. माझ या झाडावर मना पासुन प्रेम.
जागेच्या आभावी खुप मोठ नाही पण, छोटस रोप घरी आणायचे ठरवले....
गुगलवर माहिती काढली, नि.ग. वर विचारपुस केली, बर्याच नर्सर्या पालथ्या घातल्या, तेव्हा एकुण असे समजले
की हे झाड कुंडीत सुद्धा लागु शकते. झालं! त्या रात्री आनंदाच्या भरात मला झोपच लागली नाही.
दुसर्या दिवशी रविवार होता, सकाळी चहा, नाष्ता आटपुन नवर्याला सांगीतले की गाडी काढा, आज आपल्याला
सोनचाफा घरी आणायचा आहे.. त्याला निर्सगाचे खुप कुतुहल नाही पण मी केलेले सगळे हट्ट मात्र तो आनंदाने पुरवतो...
तर खुप आनंदाने या नविन सदस्याचे आगमन झाले, वाजत- गाजतच म्हणा न! अगदी ग्राउंड फ्लोअर पासुन
ते आमच्या प्लोअर पर्यंत (आम्ही राहातो अडीच व्या मजल्यावर )सगळ्यांना दाखवत/ मीरवत आणले..
जेव्हा आणले तेव्हा त्याला एक खुप गोंडस फुल पण होते.. माझ्या सगळ्या मैत्रिणीना देखील याने वेड लावले..
आता दर आठ, दहा दिवसांनी त्या याला भेट देऊ लागल्यात... बच्चा कंपनी पण जाम खुष झाली.. माझी लेक, सजाण आहे, तीला देखील निसर्गाचे विल़क्षण वेड आहे... छुटका मात्र चारच वर्षाचा आहे... तो फक्त आईला आनंद
झाला म्हणुन उड्या मारत होता, टाळ्या वाजवत होता..
झालं, आता रोज सकाळचा चहा ह्याच्य सोबतच... तास न तास ह्याला न्याहाळत बसायचा छंदच जडला जणु...
छोटस टुमदार, पण अतिशय देखण रोपटं... कोव़़ळी लांब पसरट पानं, पाचु सारखी आणि देठावर असंख्य पाढर्या हिर्यांची नक्षी, जणु काही ठासुन पुरावाच देत होती.. " होय मी तुझा सोनचाफाच!"
आता वाट होती ती कळ्यांची. दरवेळेला ह्याची लबाडी...ह्याच्या नविन पालवीची ठेवणच अशी काही असते की जणु काही कळीच .. मग एक दोन दिवसातच उलगडा व्हायचा ती कळी नाही, पालवी आहे आणि मग मात्र माझा भ्रमनिरास व्हायचा...
नंतर नि. ग. वरच कळले की पावसाळ्यात याला जास्त बहर असतो... मग नाना शंका मनात घर करु लागल्यात... नागपूर चे उन याला सोसवेल का? खरच हे झाड जगेल का? लोकं सांगतायत तस हे झाड कुंडीत पण बहरेल का? माझ कधी आंगण असलेलं घर होईल का?
रोज संध्या़काळी तुळशी जवळ दिवा लावायचे तेव्हा तिला हेच सांगायचे की जस माझ्या घराकडे लक्ष ठेवतेस
तसे याच्या कडे पण ठेव. हा आपल्याकडे छान बहरला पाहिजे.
आणि एक दिवस तीने माझं मागण ऐकलं, जवळ जव़ळ एक वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षे नंतर या झाडावर एक कळी दिसु लागली.. ती कळी आहे की नाही याची खात्री न करताच मला हुंदका फुटला.. नंतर ३, ४ दिवसात गुढ उलगडलेच.. कारण आता त्या कळी खाली एक छोटेसे देठ पण दिसु लागले आणि त्याच दिवशी मी झाडाला काळा दोरा बाधला... कोणाची द्रुष्ट नको लागालया.. त्या कळीला सारखा स्पर्ष करावासा वाटे पण वाटले की या नादात ती जळुन तर नाही ना जाणार? दोन तीन झाडांच्या मधे तिला लपवुन ठेवले.. पक्षांपासुन सौऱक्षण म्हणुन..
रोज त्या कळीची वाढ बघण म्हणजे जणु काही एखादया तान्ह्या बाळाची होत असणारी प्रगती बघण्यासारखेच...
जवळ जवळ २५ दिवसांनी तीचे सुंदर फुलात रुपांतर झाले.... तो दिवस माझ्या साठी अविस्मरणीय होता...
कोणाला दाखवु आणि कोणाला नाही असे झाले... पहिले नवर्यालाच उठवले... डोळे चोळत चोळत तो
कसा बसा बालकनीत आला, एक नजर त्याने फुलाकडे बघीतले... माझ्या डोक्यावर हात ठेवुन म्हणाला
छान! झाले तुझ्या मना सारखे... आणि परत झोपी गेला.. मग लेकीला उठवले.. तीचा मात्र आनंद गगनात मावत
नव्हता.. मला कवटाळुन म्हणाली आई! कसं ग, आपल्या कडे सोनचाफ्याला फुल आलय.. विश्वासच बसत नाहीये...
सगळ्या घरात याचा घमघमाट.. काय त्याचं रुपडं! फिकट केशरी (श्रीखंडी) रंग, तलम टोकदार पाकळ्या, स्पर्ष म्हणजे रेशीम जणु, आणि गर्भामधे असंख्य सुंगधाची उधळण घेउन पोपटी पसरट पानांमधुन डोकावत होते...
माझ्या मैत्रिणी पण याला भेट देऊन गेल्या, त्या दिवशी त्या सगळ्यांना चहा, पोह्याची ट्रीट माझ्याकडुन..
खुप खुप मज्जा आली...
ठरल्या प्रमाणे पहिले फुल गणपतीलाच वाहिले.. अन अचानक डोऴ्यातुन ओघळ आलेत... का कोणस ठाउक..
आई म्हणाली कीती समाधान तुझ्या चेहर्यावर, जणु काही दोन तो़ळ्याचे फुलंच वाहिलेस !!!!......:)
अतिशय सुंदर लिहिलेय...
अतिशय सुंदर लिहिलेय... आवडले.
धन्यवाद साधना..
धन्यवाद साधना..
जणु काही दोन तो़ळ्याचे फुलंच
जणु काही दोन तो़ळ्याचे फुलंच वाहिलेस !>>> किती गोड.
लेख मस्तच... लिहित रहा. चौथ्या फोटोतील सोनुला केवळ सुरेख !
अहाहा किती सुंदर. सुवास
अहाहा किती सुंदर. सुवास दरवळला इथे आत्ताही.
गणपतीबाप्पा मोरया.
कसलं सुंदर लिहिलं आहे..
कसलं सुंदर लिहिलं आहे..:)
मस्त!
मनापासून
मनापासून
समथिंग स्ट्रेन्ज..... मला
समथिंग स्ट्रेन्ज.....
मला आत्ता सोनचाफ्याचा वास आला................ देवाशप्पथ
सायली, किती हळूवार सुंदर
सायली, किती हळूवार सुंदर लिहीलंय.. माझ्या गॅलरी समोर सोनचाफ्याचं मोठ्ठ झाड होतं त्यामुळे गॅलरीत खुर्ची टाकून त्या गंधाळलेल्या हवेत फुलांकडे बघत चहा पिणे ही माझ्यासाठी सुखाची परमावधी होती..
Khup sundar, majhe raahile
Khup sundar, majhe raahile hote vachayache.
कुठं हरवला होता हा लेख.. खुपच
कुठं हरवला होता हा लेख..
खुपच मस्त लिहिलय्सं सायली..तुझ्या वाट पाहण्याची घाई माझ्यात सुद्धा येऊन बसली होती जरा वेळासाठी..
आणि शीर्षक बेहद्द आवडल
मस्तच लिहिलय
मस्तच लिहिलय
आहा आज मला सुखी माणसाचा सदरा
आहा
आज मला सुखी माणसाचा सदरा सापडला .
कसला भरभरून आनंद लुटलात तुम्ही ... मला सोनचाफ्या पेक्षा तुम्हाला झालेल्या आनंदाचा जास्त आनंद वाटला , तो सुगंध जास्त होता
सुख मानण्यात असते हेच खरे....म्हटले तर किती छोटी गोष्ट .
माझ्या घरात एवढी झाडे आहेत , आईला पण असाच आनंद होतो दरवेळी फुल आले कि कुठले .. आज त्या आनंदामाग्ची भावना समजली , जियो
खूपच सुरेख लिहिलंय... सगळ्या
खूपच सुरेख लिहिलंय... सगळ्या भावना अगदी छान मांडल्यात .. सोनचाफा मलाही फार आवडतो ...
फारच सुरेख लिहिलंय. तुमचा
फारच सुरेख लिहिलंय. तुमचा सोनचाफा असाच खूप खूप बहरु दे.
सुंदर! लिखाण आणि सो चाफा. मला
सुंदर! लिखाण आणि सो चाफा.
मला पण हे फूल खुप आवडतं. एकदा फक्त या दिवसात दिसणारे केवड़ा, सो चा, प्राजक्त या फुलांना भेटायला आणि मुख्य म्हणजे सुवास अनुभवायला देशात यायचआहे...
कसलं मस्त लिहिलंय आणि कित्ती
कसलं मस्त लिहिलंय
आणि कित्ती गोडुल फुल आलंय
तुमचा सोनचाफा असाच बहरत राहू दे आणि त्यासोबतच तुमचा आनंद सुद्धा .........
खूप छान लिहिलंय, मनापासून.
खूप छान लिहिलंय, मनापासून.
Pages