सोनचाफा.... नावातच सुवर्ण अनुभुती... माझ सगळ्यात आवडत फुलं.. माझ या झाडावर मना पासुन प्रेम.
जागेच्या आभावी खुप मोठ नाही पण, छोटस रोप घरी आणायचे ठरवले....
गुगलवर माहिती काढली, नि.ग. वर विचारपुस केली, बर्याच नर्सर्या पालथ्या घातल्या, तेव्हा एकुण असे समजले
की हे झाड कुंडीत सुद्धा लागु शकते. झालं! त्या रात्री आनंदाच्या भरात मला झोपच लागली नाही.
दुसर्या दिवशी रविवार होता, सकाळी चहा, नाष्ता आटपुन नवर्याला सांगीतले की गाडी काढा, आज आपल्याला
सोनचाफा घरी आणायचा आहे.. त्याला निर्सगाचे खुप कुतुहल नाही पण मी केलेले सगळे हट्ट मात्र तो आनंदाने पुरवतो...
तर खुप आनंदाने या नविन सदस्याचे आगमन झाले, वाजत- गाजतच म्हणा न! अगदी ग्राउंड फ्लोअर पासुन
ते आमच्या प्लोअर पर्यंत (आम्ही राहातो अडीच व्या मजल्यावर )सगळ्यांना दाखवत/ मीरवत आणले..
जेव्हा आणले तेव्हा त्याला एक खुप गोंडस फुल पण होते.. माझ्या सगळ्या मैत्रिणीना देखील याने वेड लावले..
आता दर आठ, दहा दिवसांनी त्या याला भेट देऊ लागल्यात... बच्चा कंपनी पण जाम खुष झाली.. माझी लेक, सजाण आहे, तीला देखील निसर्गाचे विल़क्षण वेड आहे... छुटका मात्र चारच वर्षाचा आहे... तो फक्त आईला आनंद
झाला म्हणुन उड्या मारत होता, टाळ्या वाजवत होता..
झालं, आता रोज सकाळचा चहा ह्याच्य सोबतच... तास न तास ह्याला न्याहाळत बसायचा छंदच जडला जणु...
छोटस टुमदार, पण अतिशय देखण रोपटं... कोव़़ळी लांब पसरट पानं, पाचु सारखी आणि देठावर असंख्य पाढर्या हिर्यांची नक्षी, जणु काही ठासुन पुरावाच देत होती.. " होय मी तुझा सोनचाफाच!"
आता वाट होती ती कळ्यांची. दरवेळेला ह्याची लबाडी...ह्याच्या नविन पालवीची ठेवणच अशी काही असते की जणु काही कळीच .. मग एक दोन दिवसातच उलगडा व्हायचा ती कळी नाही, पालवी आहे आणि मग मात्र माझा भ्रमनिरास व्हायचा...
नंतर नि. ग. वरच कळले की पावसाळ्यात याला जास्त बहर असतो... मग नाना शंका मनात घर करु लागल्यात... नागपूर चे उन याला सोसवेल का? खरच हे झाड जगेल का? लोकं सांगतायत तस हे झाड कुंडीत पण बहरेल का? माझ कधी आंगण असलेलं घर होईल का?
रोज संध्या़काळी तुळशी जवळ दिवा लावायचे तेव्हा तिला हेच सांगायचे की जस माझ्या घराकडे लक्ष ठेवतेस
तसे याच्या कडे पण ठेव. हा आपल्याकडे छान बहरला पाहिजे.
आणि एक दिवस तीने माझं मागण ऐकलं, जवळ जव़ळ एक वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षे नंतर या झाडावर एक कळी दिसु लागली.. ती कळी आहे की नाही याची खात्री न करताच मला हुंदका फुटला.. नंतर ३, ४ दिवसात गुढ उलगडलेच.. कारण आता त्या कळी खाली एक छोटेसे देठ पण दिसु लागले आणि त्याच दिवशी मी झाडाला काळा दोरा बाधला... कोणाची द्रुष्ट नको लागालया.. त्या कळीला सारखा स्पर्ष करावासा वाटे पण वाटले की या नादात ती जळुन तर नाही ना जाणार? दोन तीन झाडांच्या मधे तिला लपवुन ठेवले.. पक्षांपासुन सौऱक्षण म्हणुन..
रोज त्या कळीची वाढ बघण म्हणजे जणु काही एखादया तान्ह्या बाळाची होत असणारी प्रगती बघण्यासारखेच...
जवळ जवळ २५ दिवसांनी तीचे सुंदर फुलात रुपांतर झाले.... तो दिवस माझ्या साठी अविस्मरणीय होता...
कोणाला दाखवु आणि कोणाला नाही असे झाले... पहिले नवर्यालाच उठवले... डोळे चोळत चोळत तो
कसा बसा बालकनीत आला, एक नजर त्याने फुलाकडे बघीतले... माझ्या डोक्यावर हात ठेवुन म्हणाला
छान! झाले तुझ्या मना सारखे... आणि परत झोपी गेला.. मग लेकीला उठवले.. तीचा मात्र आनंद गगनात मावत
नव्हता.. मला कवटाळुन म्हणाली आई! कसं ग, आपल्या कडे सोनचाफ्याला फुल आलय.. विश्वासच बसत नाहीये...
सगळ्या घरात याचा घमघमाट.. काय त्याचं रुपडं! फिकट केशरी (श्रीखंडी) रंग, तलम टोकदार पाकळ्या, स्पर्ष म्हणजे रेशीम जणु, आणि गर्भामधे असंख्य सुंगधाची उधळण घेउन पोपटी पसरट पानांमधुन डोकावत होते...
माझ्या मैत्रिणी पण याला भेट देऊन गेल्या, त्या दिवशी त्या सगळ्यांना चहा, पोह्याची ट्रीट माझ्याकडुन..
खुप खुप मज्जा आली...
ठरल्या प्रमाणे पहिले फुल गणपतीलाच वाहिले.. अन अचानक डोऴ्यातुन ओघळ आलेत... का कोणस ठाउक..
आई म्हणाली कीती समाधान तुझ्या चेहर्यावर, जणु काही दोन तो़ळ्याचे फुलंच वाहिलेस !!!!......:)
सुंदर!! लिखाण आणि तुमचा
सुंदर!!
लिखाण आणि तुमचा सोनचाफा!! दोन्हीही
धन्यवाद अंजली... पहिल्यांदाच
धन्यवाद अंजली... पहिल्यांदाच लिहीते आहे... इथे खुप दिग्गज मंडळी आहेत... तरी पण धाडस केले..
सोनचाफ्याच्या कळीला फुलायला
सोनचाफ्याच्या कळीला फुलायला तब्बल २५ दिवस लागतात, हे माहीत नव्हत.
काय सुंदर लिहिले आहे... त्या
काय सुंदर लिहिले आहे... त्या कळीला सुद्धा भरून आले असेल !
मस्त लिहिलंत. सोनचाफ्याच्या
मस्त लिहिलंत.
सोनचाफ्याच्या कळीला फुलायला तब्बल २५ दिवस लागतात, हे माहीत नव्हत.>>>खरंच.
सायली, खुप सुंदर लिहिलं आहेस.
सायली, खुप सुंदर लिहिलं आहेस. भावना पोहचल्या.
सुंदर लिहिलंय. आमच्याकडे पण
सुंदर लिहिलंय. आमच्याकडे पण अंगणात सोनचाफा आहे, असं सांगावंच लागत नाही, गंधाळलेलं अंगण बघताच लक्षात येतं.
ठरल्या प्रमाणे पहिले फुल
ठरल्या प्रमाणे पहिले फुल गणपतीलाच वाहिले.. अन अचानक डोऴ्यातुन ओघळ आलेत... का कोणस ठाउक..
आई म्हणाली कीती समाधान तुझ्या चेहर्यावर जणु काही दोन तो़ळ्याचे फुलंच वाहिलेस !!!!.. >>>> अग्दी खरंय - सगळ्या भावना पोहोचल्याच अग्दी .......
खूपच सुरेख लिहिलंत ....
फुलझाडांना चांगली फुले येण्यासाठी उत्तम शेणखत आणि अधून मधून पाणी तोडणे हा प्रकार करावा लागतो - एखाद्या जाणकाराकडून नीट समजावून घेऊन मगच अमलात आणा ..
सायली, नावापासून सगळच
सायली, नावापासून सगळच इंटरेस्टिन्ग. मनापासून लिहील्यामुळे मस्त उतरलय. फोटोही छान.
मनीमोहोर + १
मनीमोहोर + १
उत्कृष्ट लिखाण सायली
उत्कृष्ट लिखाण सायली ताई........
मनीमोहोर +१
मनीमोहोर +१
सगळ्यांचे मनापासुन आभार...
सगळ्यांचे मनापासुन आभार... पहिलाच लेख होता, सांभाळुन घेतलत..धन्यवाद..
मस्त लिहीलय ग.
मस्त लिहीलय ग.
अप्रतीम! नाव वाचताच आणी फूल
अप्रतीम! नाव वाचताच आणी फूल बघताच सुगन्ध दरवळला.:स्मित: धन्यवाद सायली ( नाव पण फुलाचे गोड). छान वाटले वाचुन.
सुंदर!! लिखाण आणि तुमचा
सुंदर!!
लिखाण आणि तुमचा सोनचाफा!! दोन्हीही >>++११११
आई म्हणाली कीती समाधान तुझ्या
आई म्हणाली कीती समाधान तुझ्या चेहर्यावर जणु काही दोन तो़ळ्याचे फुलंच वाहिलेस !!!!>>>>>>>>.मस्त लिहले आहेस..आवडला लेख आनि सोनचाफा पण.
आवडला सुंदर लेख
आवडला सुंदर लेख
फूल, शब्दांकन आणि तुमच्या
फूल, शब्दांकन आणि तुमच्या भावना सगळंच मस्त
अंजली, गजानन, दिनेश द, देवकी,
अंजली, गजानन, दिनेश द, देवकी, जिप्सी,नंदिनी,शशांक जी, हेमा ताई, हर्पेन, रेणुका, चनस, अनघा, रश्मी, सुर्ष्टी, अंकु, नितिन, आशिका... सगळ्यांचे मना पासुन आभार
फुलझाडांना चांगली फुले येण्यासाठी उत्तम शेणखत आणि अधून मधून पाणी तोडणे हा प्रकार करावा लागतो - एखाद्या जाणकाराकडून नीट समजावून घेऊन मगच अमलात आणा .. स्मित +++ नक्की नक्की...
खूपच सुंदर लिहिलेय.. अगदी मला
खूपच सुंदर लिहिलेय.. अगदी मला स्वताला फुलांची आवड नाही हे अपराधीपणाचे किंवा कमनशिबी असल्यासारखे वाटले हे वाचून इतका आनंद उतरलाय या लेखात ..
आवडला.. माझ्या हिला पण खुप
आवडला..
माझ्या हिला पण खुप आवड आहे झाडांची बघु इथे कुठे भेटत का ते
खुप मनापासून लिहले आहेस. अगदी
खुप मनापासून लिहले आहेस. अगदी मनातलं कागदावर उमटाव तस
सोनचाफा खूप आवडीचा.
एकदा लावून झाला. आणल्या आणल्या १ कळी होती तीचच फक्त फुल मिळाले. नंतर काही नाही
आत्ता परत तोच उद्योग केलाय. बघू काय होतंय
उमलत्या फुलाच्या उत्साहाने
उमलत्या फुलाच्या उत्साहाने लिहीलेत. सुरेख सोनचाफा. छान लेखन.
आमच्या बाल्कनीत गुलाब फुलले की आमचे चिरंजीव पहाटे पहाटे फोटॉसेशन करायला लावतात. गॉगल घालून फुलाला हात लावलेली पोझ. गॉगल काढून फुलाल हात लावलेली पोझ. इ. गॉगलसोबत दहाबारा विविध पोझ असतात. पण मुलांना होणारे आश्चर्य आणि आनंद दोन्ही पहीलं की रोपं जगवायची इच्छा प्रबळ होते. खूप लांब पसरणारी निळ्या फुलांची वेल खूप दिवसापासून शोधतो आहे. मधे एक आणली तर ती तीन फुटाच्या आतच खुंटली. ?
सयाली किती मनापासून लिहिलंयस
सयाली किती मनापासून लिहिलंयस ना..अगदी इथपर्यन्त पोचला बघ तुझ्या सोनचाफ्याचा सुगंध..
तुझ्या आनंदाला तुझ्या कच्च्याबच्च्यांनी आणी तुझ्या जोडीदाराने दिलेली साथ चाफ्यासारखीच सोनेरी आणी सुगंधी आहे..
मस्त आनंदी वाटलं वाचून
एखादी गोष्ट हवीशी वाटणे , ती
एखादी गोष्ट हवीशी वाटणे , ती मिळणे आणि त्याचा आनंद वाटणे ह्या सगळ्याचेच वर्णन अतिशय सुंदर !
इतका सुंदर लेख झालाय कि अगदी सोनचाफा न आवडणारा माणूस सुद्धा प्रेमात पडेल त्याच्या . ( अर्थात त्यासाठी आधी असा माणूस सापडला पाहिजे ... )
खूप सुंदर!
सुंदर लिहिलत ! आवडल
सुंदर लिहिलत !
आवडल
अभिषेक,
अभिषेक, किश्या,मृणाल्,ह.बा.वर्षु ताई, अनविता, जाई... खुप खुप आभार... माझ्या लेखा पेक्षा तुमचे प्रतिसाद
इतके छान आहेत... परत परत वाचावेसे वाटतायत... खरच
काय सुंदर लिहीलं आहेस गं!
काय सुंदर लिहीलं आहेस गं! अगदी थेट पोचलं. एकदा तुझी बाग पाहायची आहे अन मार्गदर्शनही हवंय.
धन्यवाद मंजु ताई... एकदा तुझी
धन्यवाद मंजु ताई...
एकदा तुझी बाग पाहायची आहे अन मार्गदर्शनही हवंय.+++ आनंद झाला, नक्की या...
Pages