शालेय पिकनिकनंतर इतक्या वर्षांनी परवा "मुंबई स्कूल"च्या चित्रांचं प्रदर्शन पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात गेले होते. प्रदर्शन पाहून झाल्यावर जहांगीर निकोल्सन कलेक्शन पाहण्यासाठी गेले होते. तिथे सुधीर पटवर्धन यांनी १९९९ मध्ये काढलेलं "मृत शहर" हे चित्र आवडलं. माझ्या आवडत्या मुंबईला खरतर अश्या स्वरुपात बघून थोडं दु:ख पण झालं. पण शहराचं असं वास्तव नाकारू तर नाही शकत. (http://csmvs.in/collection/gallery/jehangir-nicholson-collection/124-dyi...)
दुसरी मनोरंजक गोष्ट दृष्टीस पडली ती प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन ह्यांनी १९८७ ते १९९३ ह्या काळात राज्यसभेचे सदस्य असताना संसदेच्या सभागृहात बसून काढलेल्या रेखाचीत्रांचे संपादित पुस्तक "संसद उपनिषद"! मला खरतर ते राज्य सभेचे सदस्य होते हेच माहित नव्हते. आता त्या काळातल्या त्यांच्या चित्राचं असं पुस्तक बघून माझी उत्सुकता वाढली होती. त्यातच त्यांनी स्वतःच प्रस्तावनेत ते मौनी खासदार असल्याचं मान्य केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय सभागृहात चाललेल्या गोष्टींचं त्यांच्या मनावर उमटलेलं प्रतिबिंब त्या स्केचेस मध्ये आहे. त्याचं समकालीन घटनांबद्दल मत त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये मांडलय. मी काही चित्रकलेतील जाणकार नाही. आणि रेखाचित्रकलेच्या दृष्टीने समीक्षा करायची झाल्यास सगळी चित्रे उत्तमच होती. पण केवळ एक दोन सुंदर व्यक्तिचित्रे आणि अर्कचित्रे सोडता त्यातून विचार असा काही म्या पामरा आढळला नाही.
प्रस्तावनेच्या शेवटी त्यांनी लिहिलंय कि सत्तेच्या ह्या मंदिरात राजकारणाची, देश व्यवस्थापनाची चर्चा होतेच पण त्या चर्चेचं रूप कलाहीन आहे. अकबर च्या दरबारासारखा इथेही कलेला योग्य वाव असावा. खरच त्यांना संसदेचे सभासदत्व देऊन काही साधले का?
संसद उपनिषद
Submitted by vt220 on 26 June, 2014 - 07:20
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा