वाढदिवसाच्या सजावटी विषयी मदत हवी आहे..

Submitted by _आनंदी_ on 26 June, 2014 - 02:51

मुलीचा दुसरा वाढदिवस आहे.. अजुन १५-२० दिवस अहेत..
चंद्र फ्फार फार आवडतो ...
घरचेच लोक असणार आहोत..
इतर लहान मुल ई मोठा प्रोग्राम नाहिये...
तिच्या साठी चन्द्रा सारखी ऊशी (चंदेरी रंगाची , गोल), बेड्शीट तस ,मिळाल तर घ्यायचा प्लॅन आहे...
भिंतीवर चन्द्राबरोबर तिच नाव लिहुन लावु शकतो .. ठाण्यात असे भिंतीवर (लग्नात, बारश्याला बनवतात तसे) बॅनर कुठे बन्वुन मिळतिल .. फोटो वले बॅनर नाही.. थर्मॉकॉल टाईप पण जाड कार्डशीट वर चन्देरी चकमकी रंगाने लिहिलेले असे कुठे बनवुन मिळतिल? दुकानांचे रेफ. द्या ना प्लिज..
अजुन काही आयडिया असतिल तर प्लिज मदत...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटवर मून थीम असं सर्च केलं तर खूप आयडियाज मिळतील.

मून शेपचा केक त्यावर गोल्डन स्टार्स.

मून शेपचा थर्माकोल कापून त्यावर मुलीचे फोटोज लावा. मधे मधे चांदण्या. किंवा चांदणी कापून मध्यभागी मुलीचे फोटो.

चंद्र आवडतो मग तीच थीम ठेवा नं वाढदिवसाची.
बॅनर तर तुम्ही आणणारच आहात, केक पण चांदोबाच्या आकाराचा आणा. भिंतींवर लावायचे फ्लुरोसंट रंगाचे स्टिकर्स मिळतात, चंद्र. चांदण्यांच्या आकाराचे जे अंधारात चमकतात, ते ही वापरु शकता.
चंद्र, चांदण्यांच्या आकारातील चॉकलेटस आणा.
अजुन काही आठवले तर सांगते

चन्द्र आवडतो म्हणजे नक्कि काय आवडत ?
म्ह्णजे एखाद्या गाण्यामुळे , गोश्टीमुळे कि नुसताच खिडकीत बघून बघून

त्या अनुशंगाने काहीतरी करता येइइल

खिडकितुन बघायला आवडतो.. गोल आकाराच काहिहि दिसल तरी चांदोमामाच म्हणते.......
रात्री आकाशात चंद्र दिसला की भला मोठा आनंद होतो ..... पोळी ला पण चांदोमामाच म्हणते.....
आकाशातला चंद्र फार प्रिय आहे..

रिटर्न गिफ्ट असेल तर त्यावर टॅग लावालं तो चंद्रकोरीच्या आकाराचा करता येईल. उत्साह आणि आवड असेल तर मुलीसाठी चांदणीच्या आकाराचा वँड / छडी बनवता येईल. अर्थात विकत मिळतेचं.

फोटो वले बॅनर नाही.. थर्मॉकॉल टाईप पण जाड कार्डशीट वर चन्देरी चकमकी रंगाने लिहिलेले असे कुठे बनवुन मिळतिल >>> ST John च्या मागच्या गेट जवळ जी दुकाने आहेत तिथे विचारुन पहा.

आनंदी.. कोपीनेश्वर मंदिराच्या समोर मार्केट्ची गल्ली आहे तिथे आत सजावटीचे सामान मिळणारी भरपूर दुकाने आहेत. त्या गल्लीत पूजेचे सामान ही मिळते तीच गल्ली. एकदम टोकाला एक दुकान आहे तिथे पाहिले होते.. असे थर्माकोलचे बॅनर पाहिजे तसे बनवून देतात. त्यांच्याकडे तयार कार्टून कॅरेक्टर्स असतात ते आणि नाव जोडून बॅनर बनवतात. चंद्र असेल की नाही ते मात्र जाऊन पहावं लागेल.

यॅस, मला फोटो देता येत नव्हता Sad

स्टार / चंद्रकोरीच्या आकाराच्या कुकीज ठेवता येतील. वेळ आहे त्यामुळे बर्‍याचं कल्पना सुचतायतं Wink

तिला चंद्रकोर बनवा ना.. सिल्वेर ड्रेस आणुन...
थर्माकोल चा गोल किंवा चंद्रकोर बनवुन पाठी आणि पुठे लावा.. किंवा त्या मिस ईंडिया सारख्या पट्या बनवुन खाद्यांवर सोडा..

जर तिला गोल चन्द्र आवडत असेल तर चंद्रकोर बनवू नका .
असा काहि तरी बघा भिन्तीवर Happy

hqdefault.jpg

घरच्या सगळ्यानी निळे , आकाशी नाहितर पांढरे कपडे घाला .

निळे सॅटिनचे पडदे किन्वा ओधणी , साडी अस काहितरी डेकोरेशन्ला वापरा.