Submitted by _आनंदी_ on 26 June, 2014 - 02:51
मुलीचा दुसरा वाढदिवस आहे.. अजुन १५-२० दिवस अहेत..
चंद्र फ्फार फार आवडतो ...
घरचेच लोक असणार आहोत..
इतर लहान मुल ई मोठा प्रोग्राम नाहिये...
तिच्या साठी चन्द्रा सारखी ऊशी (चंदेरी रंगाची , गोल), बेड्शीट तस ,मिळाल तर घ्यायचा प्लॅन आहे...
भिंतीवर चन्द्राबरोबर तिच नाव लिहुन लावु शकतो .. ठाण्यात असे भिंतीवर (लग्नात, बारश्याला बनवतात तसे) बॅनर कुठे बन्वुन मिळतिल .. फोटो वले बॅनर नाही.. थर्मॉकॉल टाईप पण जाड कार्डशीट वर चन्देरी चकमकी रंगाने लिहिलेले असे कुठे बनवुन मिळतिल? दुकानांचे रेफ. द्या ना प्लिज..
अजुन काही आयडिया असतिल तर प्लिज मदत...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेटवर मून थीम असं सर्च केलं
नेटवर मून थीम असं सर्च केलं तर खूप आयडियाज मिळतील.
मून शेपचा केक त्यावर गोल्डन स्टार्स.
मून शेपचा थर्माकोल कापून त्यावर मुलीचे फोटोज लावा. मधे मधे चांदण्या. किंवा चांदणी कापून मध्यभागी मुलीचे फोटो.
चंद्र आवडतो मग तीच थीम ठेवा
चंद्र आवडतो मग तीच थीम ठेवा नं वाढदिवसाची.
बॅनर तर तुम्ही आणणारच आहात, केक पण चांदोबाच्या आकाराचा आणा. भिंतींवर लावायचे फ्लुरोसंट रंगाचे स्टिकर्स मिळतात, चंद्र. चांदण्यांच्या आकाराचे जे अंधारात चमकतात, ते ही वापरु शकता.
चंद्र, चांदण्यांच्या आकारातील चॉकलेटस आणा.
अजुन काही आठवले तर सांगते
येस्स्स .. धन्यवाद ... सगळ्या
येस्स्स .. धन्यवाद ... सगळ्या आयडियाज नोट करत आहे...
चन्द्र आवडतो म्हणजे नक्कि काय
चन्द्र आवडतो म्हणजे नक्कि काय आवडत ?
म्ह्णजे एखाद्या गाण्यामुळे , गोश्टीमुळे कि नुसताच खिडकीत बघून बघून
त्या अनुशंगाने काहीतरी करता येइइल
खिडकितुन बघायला आवडतो.. गोल
खिडकितुन बघायला आवडतो.. गोल आकाराच काहिहि दिसल तरी चांदोमामाच म्हणते.......
रात्री आकाशात चंद्र दिसला की भला मोठा आनंद होतो ..... पोळी ला पण चांदोमामाच म्हणते.....
आकाशातला चंद्र फार प्रिय आहे..
रिटर्न गिफ्ट असेल तर त्यावर
रिटर्न गिफ्ट असेल तर त्यावर टॅग लावालं तो चंद्रकोरीच्या आकाराचा करता येईल. उत्साह आणि आवड असेल तर मुलीसाठी चांदणीच्या आकाराचा वँड / छडी बनवता येईल. अर्थात विकत मिळतेचं.
फोटो वले बॅनर नाही.. थर्मॉकॉल
फोटो वले बॅनर नाही.. थर्मॉकॉल टाईप पण जाड कार्डशीट वर चन्देरी चकमकी रंगाने लिहिलेले असे कुठे बनवुन मिळतिल >>> ST John च्या मागच्या गेट जवळ जी दुकाने आहेत तिथे विचारुन पहा.
आनंदी.. कोपीनेश्वर मंदिराच्या
आनंदी.. कोपीनेश्वर मंदिराच्या समोर मार्केट्ची गल्ली आहे तिथे आत सजावटीचे सामान मिळणारी भरपूर दुकाने आहेत. त्या गल्लीत पूजेचे सामान ही मिळते तीच गल्ली. एकदम टोकाला एक दुकान आहे तिथे पाहिले होते.. असे थर्माकोलचे बॅनर पाहिजे तसे बनवून देतात. त्यांच्याकडे तयार कार्टून कॅरेक्टर्स असतात ते आणि नाव जोडून बॅनर बनवतात. चंद्र असेल की नाही ते मात्र जाऊन पहावं लागेल.
प्राजक्ता अन्जली नीलु .. खुप
प्राजक्ता अन्जली नीलु .. खुप खुप धन्यवाद..
प्राजक्ता वँड/छडी नक्की कळाल नाही मला ..
हे बघ -
हे बघ - http://www.rosiesteaparty.com/_blog/Crafts_for_Kids/post/Magic_Wans/
प्राजक्ता यांना असं अभिप्रेत
प्राजक्ता यांना असं अभिप्रेत असावं.
![Wands 18[11].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u94/Wands%2018%5B11%5D.jpg)

ही पण कल्पना मस्त आहे. तिला परीराणी करता येऊ शकते. चंद्र आणि परीराणी
ओह्ह सही .. आत्ता लक्षात
ओह्ह सही .. आत्ता लक्षात आलं...
धन्यवाद .. मस्स्स्त आयडिया
यॅस, मला फोटो देता येत नव्हता
यॅस, मला फोटो देता येत नव्हता
स्टार / चंद्रकोरीच्या आकाराच्या कुकीज ठेवता येतील. वेळ आहे त्यामुळे बर्याचं कल्पना सुचतायतं
तिला चंद्रकोर बनवा ना..
तिला चंद्रकोर बनवा ना.. सिल्वेर ड्रेस आणुन...
थर्माकोल चा गोल किंवा चंद्रकोर बनवुन पाठी आणि पुठे लावा.. किंवा त्या मिस ईंडिया सारख्या पट्या बनवुन खाद्यांवर सोडा..
ho silver dress chi idea
ho silver dress chi idea masst..
जर तिला गोल चन्द्र आवडत असेल
जर तिला गोल चन्द्र आवडत असेल तर चंद्रकोर बनवू नका .
असा काहि तरी बघा भिन्तीवर
घरच्या सगळ्यानी निळे , आकाशी नाहितर पांढरे कपडे घाला .
निळे सॅटिनचे पडदे किन्वा ओधणी , साडी अस काहितरी डेकोरेशन्ला वापरा.
हो स्वस्ति,,, हा फोटो तर
हो स्वस्ति,,, हा फोटो तर मस्तच..