तर मंडळी..........
सालाप्रमाणे पावसाळा आला.. आणि पावसाबरोबर विंबल्डनही आलं..
यंदाची विंबल्डन स्पर्धा सोमवार २३ जून २०१४ पासून सुरु होते आहे..
नेहेमीचे यशस्वी जिंकणार की नवे विजेते येणार, फायनल रविवारीच होणार की सोमवारवर ढकलली जाणार अश्या विषयांबरोबर 'नेहमीच्या यशस्वी विषयांवर' चर्चा करण्यासाठी हा धागा..
यंदा पुरूष एकेरीत ज्योको, नदाल, मरे आणि फेडरर ह्यांना पहिली चार मानांकने तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स, ना ली, सिमोना हॅलेप, राडाव्हान्स्का ह्यांना पहिली चार मानांकने मिळाली आहेत.
उंपात्यपूर्व फेरीच्या संभाव्य लढती अश्या:
ज्योको वि बर्डीच, मरे वि फेरर, वावरिंका वि फेडरर आणि राओनिक वि नदाल.
सेरेना वि शारापोव्हा, हॅलेप वि ज्यांकोविक, अझारेंका वि राडाव्हान्स्का आणि क्विटोव्हा वि ली.
फिफा बरोबर मध्ये मध्ये विंबल्डनही बघुया..
स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
तेंडुलकर विम्बल्डन बघायला
तेंडुलकर विम्बल्डन बघायला बरेच वेळा जातो की...>>>हो. गेल्यावर्षी तो आणि फेडी यांची खास भेट पण झाली होती...
फेडरर कॅम्पचा घोडा एकदम फॉर्मात दिसतो आहे....>>> येस्स...
मस्त खेळतोय तो.. एकदम खुलेपणे. तो जेव्हा असा खेळतो तेव्हा त्याचा खेळ बघत रहावासा वाटतो.. एकदम ग्रेसफुल.. 
डॊग आणि बेबी फ़ेडरर ची मॆच
डॊग आणि बेबी फ़ेडरर ची मॆच बघितली का कोणी? ५ सेट जोरदार झाले म्हणे. दिमिट्रोव काही चम्त्कार करेल का या वेळी? हळु हळु तो आपली कामगिरी सुधारतो आहे. रॊजर रशीद त्याचा कोच आहे.
कुकुश्किन सगळ्या अंगभर पट्ट्या लावुन मैदानावर उतरला होता. एकुण नडाल च्या स्टॆमिना पुढे त्याचे जास्त काही चालले नाही. मधे मधे दमलेल्या कुकुश्किन मुळे खेळाचा वेग मंदावला तेव्हा नडाल चे फ़टके चुकत होते. टॊप टेन मधल्या खेळाडुंन विरुद्ध नडालची खरी कसोटी आहे.
आमच्या घोड्याला २-० लीड ..
आमच्या घोड्याला २-० लीड .. जीतेगा भाई जीतेगा!

बाय बाय जो-विल्फ्रेड त्सोंगा
बाय बाय जो-विल्फ्रेड त्सोंगा ..
तुमच्या घोड्याचा खांदा
तुमच्या घोड्याचा खांदा दुखावलेला आहे. बच के रैना....
तुम्ही व्यक्त केलेल्या
तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीची नोंद घेतली आहे .. सर्व घोड्यांनां शुभेच्छा, आमच्या घोड्याला प्रेमपुर्वक ..
आमच्या घोड्यानं सहज खिशात
आमच्या घोड्यानं सहज खिशात घातली मॅच.
पोव्हा-कर्बर मॅच अत्यंत भारी चालली आहे.
शिरापोहा गेली की..
शिरापोहा गेली की..
आता आमचे पैशे आम्हाला हॅलेप
आता आमचे पैशे आम्हाला हॅलेप वर लावावे लागणार.
फेडररला कुणी दृष्ट लावू नका नैतर आम्हाला योकोला चांगलं खेळायची लाचलुचपत दाखवावी लागेल
ब्रिटवर लावा की पैसा. मरे
ब्रिटवर लावा की पैसा.
मरे आहे ना अजून.
अर्र तुम्ही पोव्हावर पैसे
अर्र तुम्ही पोव्हावर पैसे लावले होते की काय? यंदा आमचा नावडता घोडा दौड मारणार असा एक अंदाज.
पग्याच्या घोड्याला टफ फाईट
पग्याच्या घोड्याला टफ फाईट मिळत आहे ..
तिने फ्रेंच ओपनमुळे आमचे पैशे
तिने फ्रेंच ओपनमुळे आमचे पैशे लावायच्या आशा वाढवल्या होत्या...
मरे या नावात जिवंतपणा नसल्याने तो बाद
किर्गीयॉस २ - १ ने नादालच्या
किर्गीयॉस २ - १ ने नादालच्या पुढे!
जबरी सामना चाललाय.
-गा.पै.
नादाल ट्रबल मध्ये?
नादाल ट्रबल मध्ये?
त्या किर्गिऑस चा अपीअरन्स्
त्या किर्गिऑस चा अपीअरन्स् एकदम क्वर्की वाटतो ..
नादाल रिकव्हर होऊ शकला नाही आणि ह्या किर्गिऑस ने राओनिक ला हरवलं तर फेडरर ला चांगली टफ फाईट देईल असं वाटत आहे ..
गेला ना नदाल??
गेला ना नदाल??
हो गेला नदाल बाहेर.. आता
हो गेला नदाल बाहेर.. आता जोको, फेडी आणि मरे शिल्लक आहेत..
अरेरे!!
अरेरे!!
किर्गिऑसचा फोरहॅड जबरी
किर्गिऑसचा फोरहॅड जबरी आहे.... नादाला त्याच्या फोरहॅडला उत्तर देता नाही आल ... बघू किर्गिऑस पूढे कशी वाटचाल करतो ते.....
सर्व्हीस भन्नाट आहे
सर्व्हीस भन्नाट आहे किर्गिओसची... नदालला रिटर्न करताना कष्ट पडत होते.
Novak Djokovic (SRB) [1] VS Marin Cilic (CRO) [26]
Andy Murray (GBR) [3] VS Grigor Dimitrov (BUL) [11]
Stan Wawrinka (SUI) [5] VS Roger Federer (SUI) [4]
Milos Raonic (CAN) [8] VS Nick Kyrgios (AUS)
पग्याच्या संभाव्य मधले पाच खेळाडू आलेत इथ पर्यंत..
लेडीज मध्ये तर धुमाकूळच झालाय.. हॅलेप हीच सगळ्यात जास्त रँक असलेली खेळाडू आहे.. आणि त्या नंतर क्विटोवा. क्विटोवाला परत एकदा विजेतेपदाची संधी आहे.. किंवा मग नवीनच विजेती ठरणार.
किर्गिओसची सर्विस आणि फोरहॅड
किर्गिओसची सर्विस आणि फोरहॅड हातोडा आहे. पहिल्या सेट मधे नडालच्या एका गेम मधे दुसर्या सर्विस वर मारलेला इनसाइड आउट फोरहॅनड रीटर्न सर्विस पेक्षा जोरात परत आला. नडालला हलायची संधी पण मिळाली नाही. नुसती सर्विस नाही तर बॅकहँड पण खलास मारले काल. थोडी डेलपोट्रोची आठवण आली.
पुढची मॅच रावनिच बरोबर. रावनिच पण हातोडा सर्विस करतो. बघायला मजा येइल.
दुसर्या हाफ मधे माझा सपोर्ट डिमिट्रोवला.
महिलांमध्ये आपलं मत
महिलांमध्ये आपलं मत बुचार्डला..
पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये मिळुन फक्त फेडी असा आहे की त्याने एकदाही आपली सर्व्हीस गमावली नाहीये या स्पर्धेत.कम ऑन फेडी. तुही हमारा सच्चा घोडा है...
मला वॉरविंका वि. फेडरर ही
मला वॉरविंका वि. फेडरर ही फायनल पाहीची होती. पण दुष्ट लॉटस मुळे ते शक्य नाही. आता या जोडीतील विजेताच फायनल जिंकणार असल्याने ही व्का.फा. फायनल म्हणून बघायला हरकत नाही. अर्थात काही लोकांना यात विनोद वाटेल पण ते काही हसण्याच्या मूड मध्ये नसणार हे नक्की.
किर्गिओसचा गेम पहायला पाहिजे. :). पण तो ऑसी असल्यामुळे तो फॅन क्लब मध्ये घालण शक्य नाही.
नदाल - किर्गिओसची मॅच मस्त
नदाल - किर्गिओसची मॅच मस्त झाली. किर्गिओसची सर्वीस जबरी आहे. ६०% सर्वीसेस T वर, काहीच करु नाही शकत. २-२.५ तास त्याच कन्सिस्टन्सी ने सर्वीस टाकणे सोपे नाही. १९ वर्ष, Junior No १. नवीन तारा. त्याचा जॉन इस्नर होवु नये म्हणजे झाल
शारापोव्हा वि कर्बर मॅच
शारापोव्हा वि कर्बर मॅच बघितली नाही का कुणी? तोडीस तोड खेळ केला दोघींनी. पोव्हानं नेमक्या पॉइंट्सना वाइड फटके मारून घालवली मॅच. कर्बरचा सगळ्यात भारी प्लस पॉइंट म्हणजे मेंटल स्ट्रेंथ. शारापोव्हाचा कोर्टवरचा एकंदर वावर समोरच्यावर प्रेशर आणतो बरेचदा. पण कर्बर शेवटपर्यंत एकदा सुद्धा स्ट्रेस्ड दिसली नाही. कोर्ट कव्हरेज आणि रिटर्न्स पण भारी होते तिचे.
नादालच्या मॅचमध्ये त्याच्या अपोनंटनं चांगली फाइट दिली म्हणण्यापेक्षा नादालच फाइट देण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या फर्स्ट सर्व्ह्स अजिबात आत पडत नव्हत्या. सगळी मॅच सेकंड सर्व्हवर पेलली. किर्गिओसची सर्विस, पावरफुल रिटर्न्स दोन्हीपुढे नादालचा खेळ अगदीच ढेपाळलेला होता. नादालची सर्व्हिस असलेल्या गेम्समध्ये रॅलीज होत होत्या पण किर्गिओसच्या गेम्समध्ये फटाफट गेम संपत होता. त्याने बर्याच एसेस मारल्या. एकुणातच त्याचा गेम फीस्ट होता. आणि नादाल त्याचा नेहमीचा गेम खेळलाच नाही या संपूर्ण स्पर्धेत. किर्गिओस मॅचच्या आधी म्हणाला होता की ही हॅज नथिंग टु लूज! त्याचा अॅटिट्युड तसाच वाटला कोर्टवर. तो काल खेळला तसाच खेळत राहील तर त्याला एकदम ब्राइट फ्युचर आहे.
रच्याकने, बुचार्ड नाही
रच्याकने, बुचार्ड नाही बुशार्ड. शा चा उच्चार पण शा आणि शॉ याच्या मध्ये आहे काही तरी.
डिफेंडिंग चॅम्पियन गेला.
डिफेंडिंग चॅम्पियन गेला.
क्वा.फा पर्यंत आल्या ना
क्वा.फा पर्यंत आल्या ना मॅचेस? तिकडे फूटबॉलच्या दंग्यामुळे आधीच्या मॅचेसवर पाणी सोडलंय. आता बघायला हव्यात. नादाल हरला हे मात्र धक्कादायक होतं. मला एकदम बेकर आठवला - केविन करन ला पाणी पाजणारा (करन जरी नादालएवढा मोठा नव्हता तरीही..).
पण मी फेडररची सपोर्टर
सशल आणि सुमंगल, देव पाण्यात
सशल आणि सुमंगल, देव पाण्यात ठेवा.
Pages