तर मंडळी..........
सालाप्रमाणे पावसाळा आला.. आणि पावसाबरोबर विंबल्डनही आलं..
यंदाची विंबल्डन स्पर्धा सोमवार २३ जून २०१४ पासून सुरु होते आहे..
नेहेमीचे यशस्वी जिंकणार की नवे विजेते येणार, फायनल रविवारीच होणार की सोमवारवर ढकलली जाणार अश्या विषयांबरोबर 'नेहमीच्या यशस्वी विषयांवर' चर्चा करण्यासाठी हा धागा..
यंदा पुरूष एकेरीत ज्योको, नदाल, मरे आणि फेडरर ह्यांना पहिली चार मानांकने तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स, ना ली, सिमोना हॅलेप, राडाव्हान्स्का ह्यांना पहिली चार मानांकने मिळाली आहेत.
उंपात्यपूर्व फेरीच्या संभाव्य लढती अश्या:
ज्योको वि बर्डीच, मरे वि फेरर, वावरिंका वि फेडरर आणि राओनिक वि नदाल.
सेरेना वि शारापोव्हा, हॅलेप वि ज्यांकोविक, अझारेंका वि राडाव्हान्स्का आणि क्विटोव्हा वि ली.
फिफा बरोबर मध्ये मध्ये विंबल्डनही बघुया..
स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
स्टेपनेक चांगलाच खेळत होता.
स्टेपनेक चांगलाच खेळत होता. पहिल्या सेट्मध्ये काही फटके फार भारी मारले त्याने. तुमचा घोडा थोडक्यात जिंकला बर्का.
अझारेंकाने बाहेर उडी मारली
अझारेंकाने बाहेर उडी मारली आहे. अॅडम तुमचे संभाव्य उंपात्यपूर्व बदला..
फेररनी पण बाहेर उडी मारली..
फेररनी पण बाहेर उडी मारली.. त्यामुळे तेही संभाव्य उपांत्यपूर्व बदला...
खिलाडू वृत्ती अशी असावी
खिलाडू वृत्ती अशी असावी
https://in.finance.yahoo.com/news/amazing-display-sportsmanship-novak-dj...
नदाल भाऊ परत एकदा २०१२ सारखे
नदाल भाऊ परत एकदा २०१२ सारखे दुसर्या फेरीतच त्याच खेळाडू कडून हारून बाहेर जातात की काय??? पहिला सेट हारलाच आहे आणि दुसर्यात पण २-४ पिछाडीवर.
जिंकला
जिंकला
नदाल काल सुरूवातीला ढेपाळला
नदाल काल सुरूवातीला ढेपाळला होता रोसोलविरूध्द.. वेळेत सावरला.. बट ही इज व्हेरी फार फ्रॉम हिज बेस्ट अॅट विंबल्डन. २००८-०९ मधल्या नदालशी त्याची तुलना केली तर.
फेडरर मुलर ची मॅच बघितली.
फेडरर मुलर ची मॅच बघितली. मुलरची सर्विस कसली खतरनाक आहे. पहिल्या सेट चे दोन गेम फेडरर फक्त जाणारे बॉल बघत होता. बघताना अस वाटत होत आज काही खर दिसत नाही पण फेडररने सर्विस रीटर्न दिल्यावर मुलरचा काहीच गेम नव्हता. पहिल्या सेट मधे मुलरचे फर्स्ट सर्व % घसरल्यावर फेडरर ने आरामात ब्रेक मिळवला. २,३ सेट बघता आला नाही. ज्योक्याने दोनही राउंड मधे १ सेट घालवलेला बघुन आश्चर्य वाटले.
नदालनी पण जोको सारखेच केले
नदालनी पण जोको सारखेच केले आहे.. एक एक सेट घालवला आहे..
>>खिलाडू वृत्ती अशी असावी
>>खिलाडू वृत्ती अशी असावी स्मित +१०००
जोकर खरच महान आहे.
नदाल काल परत वाचला, खुप चुका करत होता. रोसोल ने दुसरा सेट कसातरी घ्यायला हवा होता, नदाल ला २ सेट्स डाउन वरुन मॅच काढता आली नसती. बॅड लक रोसोल.
फेडरर ची मॅच नाही पाहता आली, सर्वीस चान्गल्या पडल्या तर काही खर आहे.
अजुनही २-३ दिवस ग्रास असेल, कोर्टस फास्ट असतील.
जस्ट फेडी आणि म्ल्युलर मॅचची
जस्ट फेडी आणि म्ल्युलर मॅचची क्षणचित्रे पाहिली. फेडीने २५ एसेस मारल्या. आत्ता तरी त्याची सर्व्हीस चांगली होतेय. होप हेच पुढेही चालू राहील..
जोको बरा खेळतोय.
जोको बरा खेळतोय.
कसा बसा पहिला सेट घेतला
कसा बसा पहिला सेट घेतला जोकोने.
आणि दुसरा पण.
आणि दुसरा पण.
B bros are down a game...
B bros are down a game...
सुमंगल, तुमचा घोडा पडला की
सुमंगल, तुमचा घोडा पडला की
जिंकला ग बाई, जिंकला.
जिंकला ग बाई, जिंकला.
हो ना तृप्ती. म्हण्ट्ले जातो
हो ना तृप्ती. म्हण्ट्ले जातो कि काय(?)
तो आधी हातावर पडला मग त्याचा
तो आधी हातावर पडला मग त्याचा कोपरा जमिनीवर टेकला आणि अचानक खांद्यात कसं काय दुखायला लागलं काही कळलं नाही. असो. जिंकला सरळ सेट मध्ये.
हेविट हारेल तर बरं. मला तो अजिबात आवडत नाही.
ना ली गेली. मॅच पॉइंटला काय झालं बघितलंत का? गमतीच एकेक.
रच्याकने, फेडररचा कालचा गेम ऑल्मोस्ट फ्लॉलेस होता.
तृप्ती, कोपरावर पडला आणि
तृप्ती, कोपरावर पडला आणि वळतांना खांद्याला धक्का लागला असावा किंवा खांदा सरकला असावा.
तृप्ती, हेविट गेला
तृप्ती, हेविट गेला
अरेरे .. ज्योको injure झाला
अरेरे .. ज्योको injure झाला का? पुढच्या मॅचेस् अफेक्ट होणार का मग?
हर्पेन, धन्यवाद ..
हर्पेन, धन्यवाद ..
अफेक्ट झाल्या तर इंज्युरीवर
अफेक्ट झाल्या तर इंज्युरीवर ढकलता याव्या...;)
व्हिनसने टफ देऊन बाहेर पडायचा कार्यक्रम केला. मला वाटलं होतं पहिल्याच फेरीत जाईल.. हॅप्पनिंग फ्रायडे
व्हीनस गेली का? तिचा तोच
व्हीनस गेली का? तिचा तोच एककलमी कार्यक्रम झाला आहे आजकाल.
व्हिनस बहुदा आजकाल सेरेनाला
व्हिनस बहुदा आजकाल सेरेनाला पुढच्या गेम्समध्ये चियर अप करता यावं याच उद्देशाने स्पर्धेत भाग घेत असावी...
सेरेना पण गेली. दर चार
सेरेना पण गेली. दर चार वर्षांनी नक्की कुठली मॅच बघायची हा फार कठीण निर्णय घ्यावा लागतो
>>चार वर्षांनी नक्की कुठली
>>चार वर्षांनी नक्की कुठली मॅच बघायची हा फार कठीण निर्णय घ्यावा लागतो

नै तर काय...आम्ही अशावेळी जीमचा आधार घेतो
गेली विल्यम्स..हालेप आणि पोव्हा होणार का?
तेंडुलकर विम्बल्डन पाहायला!
तेंडुलकर विम्बल्डन पाहायला!
मॅचपेक्षा तो पाहायला गेला ह्याचीच बातमी जास्त.
लिएंडर पेस ३ऱ्या फेरीत. वयाच्या ४२व्या वर्षीही हा माणूस इतका कसा काय खेळू शकतो! काय खाउन जन्माला आलाय काय माहित!
फेडरर कॅम्पचा घोडा एकदम
फेडरर कॅम्पचा घोडा एकदम फॉर्मात दिसतो आहे ..
(चर मुलांचा डॅडी त्यांनां घेऊन सगळ्या लवाजम्यासकट टुअरवर आहे आणि फारच कौतुकाने बोलत होता .. व्हेरीच स्वीट! :))
तेंडुलकर विम्बल्डन बघायला बरेच वेळा जातो की ..
Pages