मजेत छान खेळू या (साभिनय बाल गीत)
गरगर गिरकी घेऊया घेऊया
भिंगरी भिंगरी होऊया होऊया
हात पसरुन धावूया धावूया
विमान मस्त उडवूया उडवूया
टगडक टगडक दौडू या दौडू या
घोड्यावर स्वार होऊ या होऊ या
एकामागे एक एक, डबे डबे होऊ या होऊ या
झुक झुक झुक झुक आगगाडी शिट्टी मारत जाऊ या जाऊ या
एक हात कानाशी, एका हाताची सोंड अश्शी
हत्ती दादा होऊया मजेत मस्त झुलू या
हात वरती नाचवत, पाऊसधारा झेलू या झेलू या
गाणे गात पावसाचे, गोल गोल नाचू या नाचू या
पावसाबरोबर येतो कसा, डराव डराव करतो कसा
बेडुक उड्या मारु या मजेत छान खेळू या खेळू या
------------------------------------------------------------------------------------------
वेगवेगळे प्राणी, पक्षी, इ. घालून हे गाणे पुढे कितीही वाढवता येईल ....
खेळताना जेवढी जास्त मुले तेवढी जास्त मजा येईल ...
छोट्यांकडून हे करवून घ्या आणि पहा मग कशी रमतात ती ...
अर्थात पालकांना यात आधी सामील व्हावे लागेलच हां....
मस्त. वरचे अभिनय करतानाची
मस्त. वरचे अभिनय करतानाची मुलं डोळ्यासमोर आली.