गझलीगवार

Submitted by ब्रह्मांड आठवले on 8 June, 2014 - 00:54

मतला खराब आहे, शेरू उधार आहे
बोका सुद्धा जमेना, गझलीगवार आहे

माझी जमीन होती, मीठागरात थोडी
कच्छी रणात करतो, शेती सुमार आहे

गझलू धटिंगणांनो, लक्षात राहू द्यावे
अज्ञ सुखात राही, आनंद फार आहे

मोदी बहूमताने, सत्तेत आज आले
गझलघटना नव्याने, होते तयार आहे

शायर कुणी निनावी, रानात गात होता
गाणे जुने तयाचे, कळले न सार आहे

- आनंदब्रह्म

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदी बहूमताने, सत्तेत आज आले
गझलघटना नव्याने, होते तयार आहे>>>. कु. कमला सोनटक्केची आठवण झाली. ती पाटील बाईन्ची गझल कमलानेच लिहीली होती ना.:अओ:

बाय द वे, मी आठवले हे आडनाव समजून वाचले.:फिदी: मग परत एकदा नीट नाव वाचले.

पुण्यात येईन तेव्हां बंडगार्डन येथे सुप्रसिद्ध अण्णाची भेळ इथं पार्टी करूयात. बिल अर्थात माझ्याकडे लागलं. पार्टीला येताना माझ्या कविता व गझला यावर प्रतिसाद दिलेल्या आयड्यांची प्राथमिक ओळख पटवून घेण्यात येईल Proud

आतापर्यंत मला गझलीगवारचा अर्थच कळत नव्हता. माझ्यासाठी शब्द नवा असल्याने मी गझ-लीग-वार असा वाचत होतो. आणि अर्थच लागत नव्हता. Happy

आता कळले की तो शब्द गझली-गवार असा आहे. Happy