गावच्या चित्रा नंतर खरे तर शहरातली चित्र म्हणजे सिटी स्केप्स करता आली असती मात्र त्यात थोडे अधिक रेखांकन आणि खुप सार्या फिगर्स /गर्दी यांचे चित्रण आले असते म्हणुन आपण काही पाणथळीच्या जागांचे चित्र कसे करायचे ते पाहुया. अगदि सुरुवातीला कुणीतरी पाण्यात प्रतिबिंब कशी रंगवायची हे विचारले होते त्याचा ही अभ्यास इथे होईल.
नद्या , समुद्र, ओहळ,धबधबे , डबकी यातले पाणी प्रत्येक ठिकाणी वेगळेपण दाखवते, तलावताले पाणी सहसा संथ असल्याने त्यात सुंदर प्रतिबिंब दिसतील तर , समुद्रात लाटा. हे वेगळेपण चित्रात पकडता आले तर सुंदर वॉटरस्केप्स तयार होतात.
आपण सुरुवात तलावा पासुन करुया. पवई चा तलाव अगदी रस्त्या लगत आहे , मागए उंच इमारती त्यामागे डोंगर हे दृष्य विलोभनिय दिसते. खुप सार्या बिल्डिग्ज असल्या तरी आपण आर्किटेक्चरल ड्रॉईंग करत नसल्याने येक साधारण हवे तसे रे़खाटन करुन घेतले.
त्यानंतर आपण सुरुवातीला शिकलेल्या वेरिगेटेड वॉश पधतीने पुर्ण कागद रंगवला.
त्यानंतर रंग सुकत आल्यावर मागची डोंगर रांग अगदी त्याच्या रिफ्लेक्शन पर्यंत रंगवली , त्यात रिफ्लेखन कड्च्या भागात वेट इन वेट काही वेरीएशन , तसेच पुढच्या कॅनोपिचा भाग सोडुन रंग्वले.
हा रंग सुकत आलयावर अजुन थोडा डार्क रंग घेउन मागच्या बिल्डींग्ज , झाडे रंगवली त्यात मधे मधे काही वेङळे रंग , पाण्याचे प्रमाण कमी जास्त करुन डेप्थ /वेरिएशन मिळवले. पाणी संथ अस्ल्याने अगदी खअलच्या टोकाकडचे रीफ्लेक्शन पाणि थोडे हलते आहे अशा पद्धतीने रंगवले.
पवई लेक मधे अँगलींग क्लब आहे , अँगलींग करण्यायासाठी पाण्यात जी स्ट्रकचर्स उभी केली आहेत ती रंगवली यात कॅनोपिच्या खालच्या भागत डार्क शेड्स वापरुन डेप्थ मिळवली तसेच इथले पाणि थोडे अजुन हलते दाखवायचे म्हणुन रिफ्लेक्शन मधे काही कॅलिग्राफि स्ट्रोक्स अधिक काढले आणि चित्र पुरे केले.
पुर्ण चित्र
दुसरे चित्र
वाई ला मी आत्तापर्यंत तीन वेळा गेलोय आणि प्र्तयेक वेळेला तिथे चित्र करताना मजा आली.
तीथला घाट म्हणजे चित्रकराना पर्वणी.
हे चित्र या वर्क शॉप साठी फोटो रेफरंस वरुन केलेय.
स्केच
आकाश आणि पाण्यासाठी ग्रेडेड वॉश
वेट ईन वेट बॅकग्राऊंड
फोरग्राऊंड आणि रिफ्लेक्शन साठी कलर ब्लॉकींग
सावलीचा भाग आणि पाण्याकडचा भाग थोडा ओला करुन रिफ्लेक्शन्स . घाटवार व्हे पाणि अगदिच संथ नसते , थोडी वर्दळ असते म्हणुन इथे थोडे जास्त स्ट्रोक्स , ड्राय ब्रशींग
सुकल्यावर थोडे डीटेल्स आणि चित्र पुर्ण
वा! सुरेख जमलेय हे चित्र
वा! सुरेख जमलेय हे चित्र जीङी!
<<वा! सुरेख जमलेय हे चित्र
<<वा! सुरेख जमलेय हे चित्र जीङी! >> +१
<< अजय कुठे गायब झाले? >> व.वि.मधे ' वॉटर स्केप्स /वेट्लँट्ड्स'चा लाईव्ह डेमो व कार्यशाळा तर नाही ना !
गजा, सुंदर आणि फ्रेश आलंय
गजा, सुंदर आणि फ्रेश आलंय
गजानन खूप मस्त जमले आहे हे
गजानन खूप मस्त जमले आहे हे चित्र...
चांगली आहेत चित्र. बरिच कामं
चांगली आहेत चित्र. बरिच कामं येकाचवेळी आल्याने थोडा गडबडीत आहे. पुढील आठव्ड्यात येखादा नविन भाग (बहुदा शेवटचा) लिहीन.
दोन्ही चित्रे खुप सुंदर ! खरं
दोन्ही चित्रे खुप सुंदर ! खरं सांगायचे तर सर्व टप्पे बघत स्क्रोल करायचा पेशंस अजिबात नव्हता. आधी पूर्ण झालेले चित्र बघितले आणि मग टप्पे बघितले
Superb !!
Superb !!
शनिवार्/रविवार चिपळुण मधे
शनिवार्/रविवार चिपळुण मधे होतो, मस्त पाऊस आणि रीसॉर्ट च्या रुम मधुन वशिष्ठी नदिचा मस्त व्ह्यु. तिथे केलेले हे पेंटींग
सही.. मस्तच घाट चढताना
सही.. मस्तच
घाट चढताना वशिष्टी नदीचा अप्रतिम नजारा दिसतो...
वाह! सुंदर. वाशिष्ठीवरची
वाह! सुंदर. वाशिष्ठीवरची फरशी नाही काढलीत? कदाचित तुमच्या रुम मधून दिसत नसेल
रिव्हर व्ह्यु रिसॉर्ट,
रिव्हर व्ह्यु रिसॉर्ट, परशुराम मंदिराजवळ तेथुन हे पेंटींग केलेय , फरशी दिसत नव्हती, कदाचित पावसाळ्यात पाण्याखाली जात असेल
रिव्हर व्ह्यु रिसॉर्ट,
रिव्हर व्ह्यु रिसॉर्ट, परशुराम मंदिराजवळ तेथुन हे पेंटींग केलेय , फरशी दिसत नव्हती, कदाचित पावसाळ्यात पाण्याखाली जात असेल
अश्विनी यांनी लाटा कश्या
अश्विनी यांनी लाटा कश्या काढायच्या हे विचारले होते, ते थॉडक्यात सांगायचा प्रयत्न.
जिथे किनारा असतो किंवा येखादा खडक असतो तेथे लाटांचा फेस दिअसतो तेव्हढा भाग पांढरा सोडुन बाकी भाग रंगवायचा , थोडे वेट इन वेट आनी नंतर ड्राय स्त्रोक्स टाकुन लाटा दाखवायच्या

ह्म्म्म. प्रयास करेन. जास्त
ह्म्म्म. प्रयास करेन. जास्त उसळलेल्या लाटा दाखवायच्या असतील तर मध्ये मध्ये उंचवटा आलेला फेस (मोकळा सोडलेला कागद) दाखवावा लागेल ना?
थँक्स
हो, मोकळा भागाच्या कडा काही
हो, मोकळा भागाच्या कडा काही ठिकाणी ओल्या पाण्यात ब्रश बुडउन त्याने सॉफ्ट कराव्या लागतील
मी केलेला प्रयत्न ..बरोबर आहे
मी केलेला प्रयत्न ..बरोबर आहे का नाही ते कळत नाही..
(No subject)
जबरदस्त!
जबरदस्त!
क्लास!!!
क्लास!!!
Pages