गावच्या चित्रा नंतर खरे तर शहरातली चित्र म्हणजे सिटी स्केप्स करता आली असती मात्र त्यात थोडे अधिक रेखांकन आणि खुप सार्या फिगर्स /गर्दी यांचे चित्रण आले असते म्हणुन आपण काही पाणथळीच्या जागांचे चित्र कसे करायचे ते पाहुया. अगदि सुरुवातीला कुणीतरी पाण्यात प्रतिबिंब कशी रंगवायची हे विचारले होते त्याचा ही अभ्यास इथे होईल.
नद्या , समुद्र, ओहळ,धबधबे , डबकी यातले पाणी प्रत्येक ठिकाणी वेगळेपण दाखवते, तलावताले पाणी सहसा संथ असल्याने त्यात सुंदर प्रतिबिंब दिसतील तर , समुद्रात लाटा. हे वेगळेपण चित्रात पकडता आले तर सुंदर वॉटरस्केप्स तयार होतात.
आपण सुरुवात तलावा पासुन करुया. पवई चा तलाव अगदी रस्त्या लगत आहे , मागए उंच इमारती त्यामागे डोंगर हे दृष्य विलोभनिय दिसते. खुप सार्या बिल्डिग्ज असल्या तरी आपण आर्किटेक्चरल ड्रॉईंग करत नसल्याने येक साधारण हवे तसे रे़खाटन करुन घेतले.
त्यानंतर आपण सुरुवातीला शिकलेल्या वेरिगेटेड वॉश पधतीने पुर्ण कागद रंगवला.
त्यानंतर रंग सुकत आल्यावर मागची डोंगर रांग अगदी त्याच्या रिफ्लेक्शन पर्यंत रंगवली , त्यात रिफ्लेखन कड्च्या भागात वेट इन वेट काही वेरीएशन , तसेच पुढच्या कॅनोपिचा भाग सोडुन रंग्वले.
हा रंग सुकत आलयावर अजुन थोडा डार्क रंग घेउन मागच्या बिल्डींग्ज , झाडे रंगवली त्यात मधे मधे काही वेङळे रंग , पाण्याचे प्रमाण कमी जास्त करुन डेप्थ /वेरिएशन मिळवले. पाणी संथ अस्ल्याने अगदी खअलच्या टोकाकडचे रीफ्लेक्शन पाणि थोडे हलते आहे अशा पद्धतीने रंगवले.
पवई लेक मधे अँगलींग क्लब आहे , अँगलींग करण्यायासाठी पाण्यात जी स्ट्रकचर्स उभी केली आहेत ती रंगवली यात कॅनोपिच्या खालच्या भागत डार्क शेड्स वापरुन डेप्थ मिळवली तसेच इथले पाणि थोडे अजुन हलते दाखवायचे म्हणुन रिफ्लेक्शन मधे काही कॅलिग्राफि स्ट्रोक्स अधिक काढले आणि चित्र पुरे केले.
पुर्ण चित्र
दुसरे चित्र
वाई ला मी आत्तापर्यंत तीन वेळा गेलोय आणि प्र्तयेक वेळेला तिथे चित्र करताना मजा आली.
तीथला घाट म्हणजे चित्रकराना पर्वणी.
हे चित्र या वर्क शॉप साठी फोटो रेफरंस वरुन केलेय.
स्केच
आकाश आणि पाण्यासाठी ग्रेडेड वॉश
वेट ईन वेट बॅकग्राऊंड
फोरग्राऊंड आणि रिफ्लेक्शन साठी कलर ब्लॉकींग
सावलीचा भाग आणि पाण्याकडचा भाग थोडा ओला करुन रिफ्लेक्शन्स . घाटवार व्हे पाणि अगदिच संथ नसते , थोडी वर्दळ असते म्हणुन इथे थोडे जास्त स्ट्रोक्स , ड्राय ब्रशींग
सुकल्यावर थोडे डीटेल्स आणि चित्र पुर्ण
या शिवाय येखाद्या रिलेटेड
या शिवाय येखाद्या रिलेटेड विषयाचे चित्र करायचे असेल तर मला रेफरंस मेल करा, प्रयत्न करेन
अप्रतिम !! वाईचे लँड्स्केप
अप्रतिम !! वाईचे लँड्स्केप तर फारच सुरेख !!
वॉव! दोन्ही चित्रं मस्त!
वॉव! दोन्ही चित्रं मस्त!
भारी आहे.
भारी आहे.
सुंदर! सीरीज मस्त झाली आहे
सुंदर!
सीरीज मस्त झाली आहे अजय. खूप सोपं करून सांगताय तुम्ही.
_/\_
_/\_
खूप सुंदर आहेत दोन्ही चित्रं!
खूप सुंदर आहेत दोन्ही चित्रं!
अजय, दोन्ही चित्र अप्रतीम
अजय, दोन्ही चित्र अप्रतीम आहेत.
किती मस्त...
किती मस्त...
इथे रिफ्लेक्शन बहुतेक वेट इन
इथे रिफ्लेक्शन बहुतेक वेट इन वेट केलेय. चित्रात वरच्या बाहुला असलेले रंग ओल्या काकदवर मिसळत गेलो आणि कागद थोडा तिरका /सरळ करत राहिलो. त्यामुळे रंग चाम्गले येकमेकात मीसळुन आले. त्यानंतर थोडे सुकल्यावर वेट इन वेट काही आडवे स्ट्रोक्स टाकले
क्लास!!
क्लास!!
सलाम !!!!!
सलाम !!!!!
सुपर्ब, सुबक, सुर्रेख, वगैरे
सुपर्ब, सुबक, सुर्रेख, वगैरे सर्व ....
अजय, खूपच सुंदर आहे.
अजय, खूपच सुंदर आहे.
(No subject)
किती सुंदर.. पाण्यावरून नजर
किती सुंदर.. पाण्यावरून नजर हटत बाही.
फराटे आलेच....
फराटे आलेच....
वेट इन वेट वेरीएशन वाटते
वेट इन वेट वेरीएशन वाटते तेव्हढे सोपे नाहि हे करताना जाणवते. वाई च्या चित्रातले पाणी सुंदरच,
हो ना असामी. अजयचं वेट इन
हो ना असामी. अजयचं वेट इन वेट बघ कसं मस्त आलंय. ते रंग किती छान ओघळलेत. मी करत असताना थोडे ओघळले आणि कागदातच जिरुन गेले. ते नीट ओघळण्यासाठी पाणीच कागदावर ओतावंसं वाटलं एक क्षण. अजून ट्रॅजेडी म्हणजे ते वेट इन वेट आडवे स्ट्रोक्स देताना फराटेच आले
कधी जमणार आहे कुणास ठाऊक

अजय, कधीतरी तुम्हाला सवड असेल
अजय, कधीतरी तुम्हाला सवड असेल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष चित्र काढताना बघायचंय. म्हणजे मी ब्रश तरी नीट धरतेय की नाही ते कळेल मला.
अश्विनी के- ब्रिज चांगला आलाय
अश्विनी के- ब्रिज चांगला आलाय , रिफ्लेक्शन्स सरावाने अजुन चांगले येतिल, चित्र काढुन दाख्वायचे /बघायचे जमउया कधितरी
अजय, धन्यवाद
अजय, धन्यवाद
पाटील,तुमचे सगळे भाग वाचले
पाटील,तुमचे सगळे भाग वाचले आहेत. खूप खूप धन्यवाद इतक्या चांगल्या धाग्याबद्दल.
अश्विनी तुझ चित्र छान आहे.
दोनेक वर्षा पुर्वी गावी
दोनेक वर्षा पुर्वी गावी केलेले पावसाळयातले चित्र, पागोळ्या आणि पावसाच्या धारांसाठी मास्कींग फ्लुइड वापरले होते.
गावी पुर्वी आम्चे एकत्र कुटूंब असताना खुप मोठे घर होते , आता सगळ्यांची स्वतंत्र घरं झाल्यानंतर हा येव्हढाच कोपरा अजुन शिल्लक आहे. येक दोन पावसाळ्यात तोही कोसळेल.
मस्त!
मस्त!
अश्विनी मस्त आले आहे
अश्विनी मस्त आले आहे चित्र.

मी खूप दिवसांनी प्रयत्न केला चित्र रंगवायचा पण खूप चुका झाल्या...
अंतरा, प्रॅक्टिसने सुधारेल गं
अंतरा, प्रॅक्टिसने सुधारेल गं आपलं चित्र. माझाही पाण्याचा लोचा होतोय. तसे प्रत्येक चित्रातच माझे कश्याचे ना कश्याचे लोचे होतायत म्हणा!
माझे असे झाले.
माझे असे झाले.
गजा, पाणी मस्तं आलंय
गजा, पाणी मस्तं आलंय
अश्विनी, धन्यवाद. वरच्या
अश्विनी, धन्यवाद. वरच्या माझ्या चित्रात पुलाचे(च) प्रतिबिंब बरे जमले आहे.
माझा हा दुसर प्रयत्न. अजय कुठे गायब झाले?
Pages