का सुरू केली मनाची फट्फटी

Submitted by वैवकु on 15 May, 2014 - 09:25

का सुरू केली मनाची फट्फटी
केवढा आवाज करते कारटी

मी तिला मोठेपणा का द्यायचा
वेदना आहेच ..माझी धाकटी

रे गझलगंधर्व खाकरले कुठे
घेतली ही तान त्यांनी खाजटी

ह्या पटावरती खरी सत्ता तुझी
मी वजीराच्या बळाची सोंगटी

गांजलेला एक कुलकर्णीच मी
मी न टाटा हिंदुजा नानावटी

आजही पाण्यात चुरल्या भाकर्‍या
आजही नशिबात नव्हती आमटी

आसवांनी ते किनारे गाठले
आपले नाते बुडाले शेवटी

काठ काळा डोहही काळा तुझा
मी बरा हा गोरटा माझ्या तटी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'आमटी' हा शेर सोडला तर बाकी गझल रुचली नाही.
(तुम्ही ही गझल सिरिअसली लिहिली नसावीत असे वाटले)
असो.... स्पष्ट मताचा राग नसावा.

ह्या पटावरती खरी सत्ता तुझी
मी वजीराच्या बळाची सोंगटी>>
आवडला हा शेर.
आपण स्वतःला वजीर समजत असलो तरी शेवटी आपण सोंगटीच... खरी सत्ता त्याची...वाह !!

का सुरू केली मनाची फट्फटी
केवढा आवाज करते कारटी

आसवांनी ते किनारे गाठले
आपले नाते बुडाले शेवटी

क्या बात!

नमस्कार.
गांजलेला एक कुलकर्णीच मी
मी न टाटा हिंदुजा नानावटी

काठ काळा डोहही काळा तुझा
मी बरा हा गोरटा माझ्या तटी

>>>असे कां?

मी तिला मोठेपणा का द्यायचा
वेदना आहेच ..माझी धाकटी
>>> शेंडेफळ समजून लाड तरी करता ना तिचे ? :प्रश्नचिन्हः