'कृपया सगळ्यांनी लवकरात लवकर बसून घ्या. खुर्च्या पुरणार नाहीयेत, त्यामुळे मिळेल तिथे बसून घ्या प्लीज. मराठी चित्रपटांच्या प्रीमिअरला इतकी गर्दी होत असेल तर मराठी सिनेमाला किती चांगले दिवस येतील हे आपण बघू शकतो'... दिग्दर्शक सुजय डहाकेच्या या वाक्यांवर जोरदार टाळ्या पडल्या आणि आम्ही (पुरूष मायबोलीकर) पायर्यांवर बसलो.
त्याआधी खूप लवकर सिटीप्राईडला पोचल्यामुळे डॉ. विद्या अत्रेय यांच्याशी गप्पा मारता आल्या. बँडबरोबर दोन 'आजोबा' दाखल झाले, एक एक कलाकारही आले. केतकी माटेगावकर आल्यावर अख्खी गर्दी तिच्याभोवती गोळा झाली. प्रीमिअरचं नक्की टाइमिंग काय होतं हे कुणालाच कळलं नाही, पण शो सुरू व्हायला सव्वा आठ वाजले.
चित्रपटाबद्दल बर्याच धाग्यांवर बोलून झालंच आहे. मला फक्त काही काही अॅनिमेशन्स आवडली नाहीत. 'उपलब्ध बजेट आणि एकूणच उपलब्ध साधनसामुग्रीत' केलेला (जमवलेला) सिनेमा असं माझं मत झालं. मग त्यात काही गोष्टी जमून गेल्या, काही जमल्या नाहीत. ट्रेकिंगमुळे (बिबट्या-वाघ प्रत्यक्ष पाहिला नसला तरी) डोंगरदर्यात फिरायला मिळत असल्यामुळे पडद्यावर दाखवली गेलेली जंगल-दर्या-डोंगरांची दृश्ये मला तरी अपुरी वाटली.
पण खरं सांगायचं तर (त्या सुरूवातीच्या सीननंतर) मी लहान मुलांच्या नजरेतून हा चित्रपट पाहायचा प्रयत्न केला आणि मला सगळं आवडलं.
शेवटच्या ज्ञानोबा-मॅडम च्या फोनवरील सीनमध्ये माझ्या गळ्यात काहीतरी दाटल्यासारखं वाटलं. (तो सीन पाहून डोळ्यात पाणी आलेलेही अनेक जण असणार याची खात्रीच आहे!)
'आजोबा' एकदा पहायला हरकत नाही!
फोटो -
डॉ. विद्या अत्रेय
सुजय डहाके
विभावरी देशपांडे
हृषिकेश जोशी
गजेंद्र अहिरे
'शाळा'फेम अंशुमन जोशी
गर्दी!!!
या चित्रपटाच्या कॉस्च्युम डिझायनर नीलिमा गोगटे
- नचिकेत जोशी (१२/५/२०१४)
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2014/05/blog-post_12.html)
गजेन्द्रं आहिरे नेहेमी मला
गजेन्द्रं आहिरे नेहेमी मला हरिहरन वाटतात :).
पिवळी कार कुणाची? DC ची
पिवळी कार कुणाची?
DC ची डिझाईन वाटत आहे
मस्त फोटो रे
मस्त फोटो रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
DCचीच आहे
DCचीच आहे
गजेन्द्रं आहिरे नेहेमी मला
गजेन्द्रं आहिरे नेहेमी मला हरिहरन वाटतात <<< मलापण तसेच वाटले क्षणभर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)