लाटणे सोबती सोडीना ती पाठ -

Submitted by विदेश on 10 May, 2014 - 11:38

( चाल: पाऊले चालती पंढरीची वाट -)

लाटणे सोबती सोडीना ती पाठ
मनी संसाराची सोडावी का वाट ... | धृ |

भांडूनिया सारी चाळ ओरड्याने
जमता रिकाम्या घरी शुकशुकाट ... लाटणे

खाष्ट दुष्ट सारे नातेवाईक ते
साधुनिया संधी, न बसती मुकाट ... लाटणे

चुकविता प्रहार मी लाटण्याचा
कसा त्या बयेचा वाढे थयथयाट ... लाटणे

मनी खंत धरता नसे तडजोड
झेला भांडीफेक एका पाठोपाठ ... लाटणे

.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users