Submitted by वैवकु on 7 May, 2014 - 02:53
असावीत त्यांच्या नशीबात दु:खे
पडावीत माझ्याच प्रेमात दु:खे?
मला भेटणार्या भिकारी सुखांनो
लुटा आज माझी अतोनात दु:खे
कितीवार त्यांची करू चौकशी मी
कथेनात काही खरी बात दु:खे
दिवाळेच काढून रब्बी निघाला
पुन्हा पेरली मी खरीपात दु:खे
उदासीन हा जीवनाचा उकाळा
नि गवती चहाची सुकी पात दु:खे
तुझ्या आणि माझ्या बखेड्यात दु:खे
तुझ्या आणि माझ्या सलोख्यात दु:खे
असा घालती घट्ट् विळखा मनाला
जसे कंबरेवर तुझे हात.. दु:खे
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिवाळेच काढून रब्बी
दिवाळेच काढून रब्बी निघाला
पुन्हा पेरली मी खरीपात दु:खे.. क्या बात
लोक जगतील नुसत्या प्रती
लोक जगतील नुसत्या प्रती खपवुनी
ही मनाची वही मी उघडलीच तर हा खूप आवडला
मला भेटणार्या भिकारी
मला भेटणार्या भिकारी सुखांनो
लुटा आज माझी अतोनात दु:खे
दिवाळेच काढून रब्बी निघाला
पुन्हा पेरली मी खरीपात दु:खे
उदासीन हा जीवनाचा उकाळा
नि गवती चहाची सुकी पात दु:खे
तुझ्या आणि माझ्या बखेड्यात दु:खे
तुझ्या आणि माझ्या सलोख्यात दु:खे <<< वा वा
किरण ,बेफीजी धन्स अगाधा सूपर
किरण ,बेफीजी धन्स
अगाधा सूपर धन्स अगाध आहेस बाबा तू बेफीजींच्या गझलेवरचा प्रतिसाद इथे डकवलाय्स
आयला कमरे वाला शेर म्हणायचे
आयला कमरे वाला शेर म्हणायचे होते वैभ्या ,,मायला तो इथे पेस्ट झाला वाटते ...असू देत
आता नव्याने विठ्ठला
असा घालती घट्ट् विळखा मनाला
जसे कंबरेवर तुझे हात.. दु:खे ला बेक्कार आवडला
वा ! वा !! आवडलीच गझल.
वा ! वा !!
आवडलीच गझल.
व्वाह सर!!!! मतला भिकारी आणि
व्वाह सर!!!!
मतला भिकारी आणि सलोखा __/\__!
शेवटचा शेर कळायला वेळ लागला मला पण छानच आहे
सुंदर रचना. उकाळा हा शब्द
सुंदर रचना. उकाळा हा शब्द माहित नव्हता पण अर्थ छान समजला पुढच्या मिसर्यामुळे.
खूप सहज, आशयगर्भ.
गझल आवडली
गझल आवडली
तुझ्या आणि माझ्या बखेड्यात
तुझ्या आणि माझ्या बखेड्यात दु:खे
तुझ्या आणि माझ्या सलोख्यात दु:खे
अप्रतिम शेर आहे.
सर्वांचे खूप खूप आभार
सर्वांचे खूप खूप आभार
सुपर्ब ,तसेच सुंदर
सुपर्ब ,तसेच सुंदर