मेतकूट (मी करतो तसे)

Submitted by pltambe@yahoo.co.in on 20 April, 2014 - 23:13

मेतकूट (मी करतो तसे)
 1.jpg
साहित्य : पाव किलो (हरभरा) चणाडाळ , अर्धी वाटी तांदूळ , पाव वाटी उडीद डाळ , पाव वाटी गहू , पाव वाटी मूग डाळ , एक चमचा मोहरी , एक चमचा जिरे , एक चमचा धणे , ८-१० लाल सुक्या मिरच्या (ब्याडगी) , एक मोठा सुंठेचा तुकडा , एक चमचा हळद , एक चमचा हिंग, एक चमचा मीठ.
कृती : गॅसवर एका कढईत हरभरा (चणा) डाळ, उडीद डाळ, तांदूळ, गहू , मूग डाळ , मोहरी, धणे , जिरे हे घटक पदार्थ वेगवेगळे भाजावेत.मिरच्या गरम असलेल्या कढईत ठेवाव्यात.सुंठेचा तुकडा कुटून बारीक तुकडे करून हळद , हिंग व मीठ हे सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक दळावेत.दळल्यावर पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे व कोरड्या घट्ट झाकणाच्या बरणीत किंवा बाटलीत भरुन ठेवावे.
आजारपणात आजारी माणसाच्या तोंडाची जेंव्हा चव जाते तेंव्हा किंवा डॉक्टर जेंव्हा रोग्याला पचायला हलके असे पथ्याचे खायला द्या असे सांगतात तेंव्हा मेतकुटाचा फार उपयोग होतो.आशावेळी मेतकूट भात खावासा वाटतो. तसेच लहान मुलांना पौष्टिक म्हणून जास्त पाणी घालून शिजवलेला गरम गुरगुटया भात व त्यावर साजूक तूप व मेतकूट घालून खाऊ घालतात आणि त्यांनाही तो चविष्ट मऊ भात फारच आवडतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर,

मस्त पाककृती! आज सकाळपासून सुटलाच आहात सर! एकसे एक पाककृती नुसत्या!

मस्त पाककृती! आज सकाळपासून सुटलाच आहात सर! एकसे एक पाककृती नुसत्या!

सहमत! आजकाल मायबोली उघडताच तांबेसरांची नवीन पा.कृ.कोणती इथे ,करण्याची आवड नसतानाही ,आपोआप नजर वळते.