नमस्कार!
ही एक फक्त 'चालू घडामोड' नाही तर बर्यापैकी व्यापक विषय आहे, पण येथील विषयांच्या सदरांपैकी तो 'चालू घडामोड' ह्या सदरात सर्वाधिक चपखलपणे बसतो असे वाटले म्हणून ह्या सदरात लिहीत आहे.
तृतीयपंथियांना सर्वोच्च न्यायलयाने एक 'कायदेशीर अस्तित्व' बहाल केलेले आहे. सर्वोच्च न्यायालय असेही म्हणते की हा वैद्यकीय किंवा सामाजिक विषय नसून 'मानवी अधिकारां'चा विषय आहे.
लहानपणापासून आजवर समाजात कोठेही दिसणारे तृतीयपंथीय (किन्नर / हिजडे) हा बर्याच अंशी एक कुतुहल, थट्टा, किळस अश्या भावनांचे मिश्रण असलेला विषय असल्याचा प्रभाव सर्वत्र पसरल्याचे चित्र दिसत असे. हे तृतीयपंथीय लोकल ट्रेन्समध्ये पैसे मागणे, देहविक्रय करणे असे व्यवसाय (!) करताना आढळत. नुकताच मी ज्या स्नेहालयात जाऊन आलो त्यांच्या संस्थेशी निगडीत असे अनेक तृतीयपंथीय आहेत जे देहविक्रय करतात. त्यांच्याकडे प्रामुख्याने लष्करातील कर्मचारी शरीरसुखासाठी येतात व अनैसर्गीक संभोगाची इच्छा पुरवून घेतात.
स्त्रीही नाही व पुरुषही नाही ही अवस्था त्या व्यक्तीसाठी लज्जास्पद तर इतरांसाठी हास्योत्पादक आहे हे समीकरण रूढ झाल्यासारखे चित्र असताना अनेक संस्था, व्यक्ती व चळवळींच्या माध्यमातून आता सर्वोच्च न्यायालयाने ही एक समाधानकारक व पुरोगामी भूमिका घेतलेली आहे.
आता कोणत्याही शासकीय अर्जात कदाचित लवकरच 'सेक्स - मेल / फिमेल / ट्रान्सजेंडर' असे काहीसे दिसायची शक्यता आहे, ह्या तृतीयपंथीयांना लवकरच आरक्षण मिळू शकेल. त्यांना समाजाने स्वीकारायला किती काळ जावा लागेल हे मानसिकतेमधील लवचिकतेवर, औदार्यावर अवलंबून असले तरी तसे आगामी काळात होईल इतके नक्की! शाळेमधील वर्गांमध्ये कदाचित आता अशी मुले शिकायला बसू शकतील आणि इतर विद्यार्थ्यांना त्यांचे पालक व शिक्षक 'अश्या मुलांना हसायचे नाही' असे शिकवू लागतील.
कदाचित आपल्याला ट्रीट करणारा मेडिकल ऑफिसर एखादा तृतीयपंथीय असेल आणि गाजलेलाही असेल. कदाचित एखादा संशोधक तृतीयपंथीय असेल.
हे सगळे होईल तेव्हा होईल, पण तूर्त एक मोठीच लढाई ह्या तृतीयपंथीयांनी जिंकलेली आहे.
मात्र मला एकदा हैदराबाद पुणे प्रवासात एक एम डी मेडिसीन डॉक्टर भेटला होता. प्रवासात वेळ घालवायला म्हणून त्याच्याशी ज्या अनेक चर्चा केल्या त्यापैकी चर्चेचा काही भाग तृतीयपंथीयांबाबत होता. त्यातून त्याने मला जी माहिती सांगितली ती काहीशी गोंधळात पाडणारी वाटली व येथे असलेल्या तज्ञांनी त्याबाबत आपली मते देऊन कृपया उपकृत करावे.
१. शरीररचनेनुसार जे जन्मतः तृतीयपंथीय असतात त्यांच्यात दोन प्रकार असू शकतातः
अ - त्यांना जन्मतः लिंग असते पण टेस्टिकल्स नसतात (त्यामुळे ते पुरुष ठरू शकत नाहीत)
ब - त्यांना जन्मतः योनी असते पण योनीखाली टेस्टिकल्सही असतात व स्त्रीप्रमाणे अंतर्गत रचना नसते.
२. जे तृतीयपंथीय चुकून तृतीय पंथात मोडतात ते ह्या दुसर्या 'मुख्य प्रकारात' येतात. ते म्हणजे त्यांचे एक कोणतेतरी लिंग नक्की असते, पण जन्माच्यावेळी ते न आढळल्याने त्यांचे संगोपन विरुद्ध लिंगीयाप्रमाणे करणे सुरू होते. पुढे पुढे त्यांची मानसिकता (उदाहरणार्थ) स्त्रीप्रमाणे तर शारीरिक वाढ पुरुषाप्रमाणे होते.
३. तिसर्या प्रकारात बालकाचे / किशोरवयीन अवस्थेतील मुलामुलीचे लिंग समजूनही केवळ देहविक्रयामार्फत उत्पन्नाचे साधन प्राप्त व्हावे / स्वतःला एक वेगळ्या प्रकारचे शारीरिक सुख घेण्याची सोय करता यावी / किंवा चक्क वयाने वाढलेल्या व्यक्तीला स्वतःच दुसर्या लिंगीयाप्रमाणे वागण्याची इच्छा व्हावी म्हणून बाहेरील जामानिमा पूर्णपणे बदलला जातो व कपड्यांच्या आत व्यक्ती तशीच राहते.
आता ही माहिती जर योग्य आहे असे मानले, तर सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या आदेशानंतर व ह्या माहितीच्या प्रकाशात (तसेच इतर काही तत्सम विषयांच्या प्रकाशात) मला काही प्रश्न पडले आहेत, ज्यावर कृपया चर्चा व्हावी अशी विनंती:
१. सर्वात प्रथम म्हणजे तृतीयपंथीय हा मानवाधिकाराच्या व्याप्तीतील विषय जर मानला जात असेल तर समलैंगीकता का मानली गेली नाही? (कृपया पुन्हा एकदा नोंद घ्यावीत, समलैंगीकता अनैसर्गीक आहे असे माझे मत त्या चर्चेच्यावेळी नव्हते तर ती नैसर्गीक असणे ठसवले जाण्याचा अतिरेक आणि समुपदेशनाने ओरिएन्टेशन बदलते किंवा नाही ह्यावर माझी मते मांडलेली होती. हे नोंदवण्याचे कारण म्हणजे तेच वाद येथे होऊ नयेत ही अपेक्षा असल्याचे सांगणे!)
२. नैसर्गीकरीत्या तृतीयपंथीय असलेल्यांनाच कायदेशीररीत्या तृतीयपंथीय म्हणून आरक्षण मिळावे की जे जबरदस्तीने वा स्वेच्छेने तसे झाले आहेत त्यांनाही? मग ह्याचा गैरवापर वगैरे टाळण्याच्या यंत्रणाही अर्थातच अस्तित्वात आणाव्या लागतील हे आलेच.
३. काही जण मुद्दाम तृतीयपंथीय होऊन आरक्षण मिळवू शकतील का?
४. आज जे तृतीयपंथीय शरीर विक्रय करतात व मानहानीकारक जिणे जगतात त्यांचे पुनर्वसन कसे होऊ शकेल?
५. सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊन मोकळे झाल्यानंतर माणसाची मानसिकता बदलण्याची जबाबदारी कोणत्या सरकारी संस्थेने घ्यावी?
हे प्रश्न माझ्या मनात आले, इतर कोणाला काही इतर प्रश्न असल्यास कृपया तेही नोंदवावेत.
पण एकुणात, पूर्वी हे तृतीयपंथीय शुभशकुनी समजले जात. ते श्रीमंतही असत. राजेरजवाड्यांकडे ते मोठे पद मिळवून असत. काही मुस्लिम राजवटींमध्ये लहानपणीच काही मुलांना मुद्दाम पौरुषत्वापासून दूर करून पुढे मोठे झाल्यावर स्त्रियांच्या महाली संरक्षक म्हणून नेमण्याची विचित्र प्रथाही होती. असेही समजले जाते की तृतीयपंथीयांच्या शरीरात अधिक ताकद असते, हा फक्त समज असावा. त्यांचा आशीर्वाद शुभ मानणारे अजूनही खूपजण आहेत. लोकल ट्रेन्समध्ये ते आले की स्त्रिया / मुली मान खाली घालून झोपल्याचे नाटक करतात व त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद (शाब्दिक / शब्दहीन) साधणे टाळतात. लहान मुले व अनेक पुरुष त्यांना हासतात. 'छक्का' हे संबोधन एखाद्या शिवीप्रमाणे आजही वापरले जाते. मात्र आता हे लोक 'आम्हाला किन्नर' म्हणा असे म्हणत आहेत. हिजडे, छक्के ही विशेषणे वापरू नका असे म्हणत आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे, तृतीयपंथीय म्हणजे एखादा वेल ड्रेस्ड, वेल मॅनर्ड माणूस नजरेसमोर येतच नाही. आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते पुरुषी थाटाच्या व्यक्तीने साडी वगैरे नेसून अत्यंत भडक मेक अप केलेला असणे, टाळ्या वाजवणे व उगाचच अती भडकपणामुळे तिरस्करणीय दिसत असणे!
हे सगळे चित्र केव्हा बदलेल तेव्हा बदलेल, पण ह्या बातमीमुळे 'गे संघटनाही' 'अपबीट' झालेल्या आहेत.
बाकी काही असो, एक देश म्हणून आपण अधिक 'ह्यूमन' होत आहोत हे चांगलेच म्हणावे लागेल.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
या लेखाचा विषय झालेल्या
या लेखाचा विषय झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाच्या अनेक पैलूंना केंद्रातील नव्या सरकारने आक्षेप घेतला आहे.
भाजपला अपेक्षित असलेली प्रगती/विकास म्हणजे चकाचक रस्ते, विमानतळे, उद्योगधंदे, छान आकडेवारी, इ.इ. सामाजिक बाबतीत काळाची पावले ओळखणे दूरच, पण चाके उलट फिरवण्याचीच कामे या सरकारकडून होतील ( सत्ताधारी पक्षाच्या परिवारातील संघटनांकडून होतीलआणि त्याला आळा घालण्यासाठी सरका काहीही करणार नाही) ही भीती सार्थ असल्याचे आणखी एक चिन्ह.
आय अॅम फ्रॉम आय आय एन ह्या
आय अॅम फ्रॉम आय आय एन ह्या जाहिरातीत एका तृतीयपंथियाका समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे हे एक चांगले चिन्ह वाटते.
अरे वा!,. छानच. बदल होत आहे
अरे वा!,. छानच. बदल होत आहे म्हणायचा.
.
.
या विषयावर, लक्ष्मी त्रिपाठी
या विषयावर, लक्ष्मी त्रिपाठी यांचे "मी हिजडा. मी लक्ष्मी" नावाचे एक पुस्तक आहे. खूप माहितीपूर्ण पुस्तक आहे..
वरिष्ठ मित्रवर्य बेफीक़ीर
वरिष्ठ मित्रवर्य बेफीक़ीर जी,
उत्तम विषय!!
माझा अनुभव,
तृतीयपंथी हे भावा चे भुकेले असतात अन सतत हाडहुड झाल्यामुळे ते एग्रेसिव होतात, कायम जर कोणाला त्याच्या लिंग ह्या विषयामुळे हास्य झेलावे लागले तर असेच होणार त्यांस अगदी न्यूट्रल राहून समजवले तर ते ऐकतात (कमाई च्या प्रलोभनाने काही पुरुष स्त्री वेश धारण करुन रेलवे मधे टाळ्या वाजवत हिंडतात ते अपवाद होय) मी माझ्या नोकरीचा इंटरव्यू द्यायला जेव्हा दिल्ली ला जात होतो तेव्हा मला काही लोक (तृतीयपंथीय) भेटले रेलवे मधे लोकांस पैसे मागत होते तेव्हा काही देत काही मस्करी करत होते मस्करी करणार लोकांची ते लोक वाट लावत होते माझ्याजवळ आले तेव्हा पहिल्यांदा मला फार विचित्र अन खोटे कश्याला बोला किळसवाणे वाटले ते विचकट हावभाव पानाने रंगलेली तोंड हिडिस् नट्टापट्टा पण जेव्हा मला पैसे मागितले तेव्हा मी फ़क्त खिश्यात असलेली चिल्लर नाणी गोळा करून (रुपये १५) त्यांस दिले तेव्हा झालेला हा संवाद
"ए चिकने हमको चिल्लर मत दे रे हमारा इंसल्ट होता है!"
"प्रेम से दे रहा मौसी रख ले"
"भाड़ में जा रे प्रेम वाले हरामखोर चल १०० का पत्ती निकाल"
"देख मौसी मैं अपने नहीं दे रहा बाप के पेंशन में से दे रहा हूँ, रख ले मना मत कर और आशीर्वाद दे दे अगर नौकरी हुई तो वापस फिर कभी कोई भी ट्रेन में मिली तो जितने है निकाल के दे दूंगा"
ह्यावर मौसीजी "कितना भोला और ईमानदार लड़का है रे चिकने" म्हणुन आशीर्वाद देऊन गेली! प्रेमाने सांगितले तर समजतात हा अनुभव त्या दिवशी आला
इथे हा अनुभव किती रिलेवेंट आहे माहिती नाही आधी चर्चा ही भरपूर झाली आहे पण ह्या विषयावर आम्हाला आलेला हा चारआण्याचा अनुभव शेयर करावा वाटला म्हणुन लिहिता झालोय इतकेच
अहो सोन्याबापू, हे माझे काही
अहो सोन्याबापू,
हे माझे काही विशिष्ट धागे कोणत्या कारणासाठी खणून वर काढण्यात येत आहेत त्याचा विचार करून जरा टीकाबिका करा ना माझ्यावर! स्तुती कसली करताय? कातरवेळी भयाण आर्त किंकाळ्या ऐकत नाही का तुम्ही माबोवर?
Pages