कैरी - १
गुळ - कैरी एवढा
मिरच्या - २/३
कडीपत्ता
पंचफोडण ( मोहोरी, जीरं, मेथी, कलौंजी, बडीशेप ) - १ छोटा चमचा
लसुण - २ पाकळ्या
आलं - साधारण लसुणाइतकेच
मीठ - चवीपुरते
तेल - फोडणीला
तिखट - ऑप्शनल
कैरीची सालं काढुन छोट्या फोडी करुन घ्या.
एका भांड्यात घालुन, फोडी बुडतील एवढे पाणी घालुन शिजवुन घ्या. शिजवताना कैरीची कोयही त्यात (अख्खीच) घातली तरी चालेल. कैरी पुर्ण शिजली पाहीजे. हवे असल्यास शिजताना आणखी थोडे पाणी घाला.
कैरी शिजल्यावर दुसर्या एका कढईत तेलाची फोडणी करा. त्यात पंचफोडण घाला, ते तडतडले की मिरच्या कडीपत्ता घाला. आलं आणि लसुण ठेचुन घाला. हवे असल्यास हळद घाला. हे किंचीत परतल्यावर शिजलेली कैरी त्यातल्या पाण्यासकट फोडणीत घाला आणि उकळी येऊ द्या. हवे असल्यास थोडे तिखट घाला.
आता मीठ आणि गुळ घालुन गुळ विरघळेपर्यंत शिजू द्या. चमच्याने ढवळुन कैरी थोडी मॅश करा.
चिंच खजुराच्या पातळ चटणी इतकी पळीवाढ असावी.
पोळीबरोबर , वरण भाताबरोबर किंवा डीप म्हणुनही छान लागते.
- डिप म्हणुन करणार असाल तर अजुन थोडी घट्ट करायला हरकत नाही.
मस्त.
मस्त.
याच्या बंगाली आवृत्तीत
याच्या बंगाली आवृत्तीत आलं-लसूण-मिरच्या-कढीपत्ता गायब असतं. गुळाच्या जागी साखर असते. पण एकुणात प्रकार मस्तच असतो. विशेषतः कडक उन्हाळ्याच्या दिवसात जेवणाच्या शेवटी ओरपायला
हे वाक्य राहीले होते
हे वाक्य राहीले होते "शिजवताना कैरीची कोयही त्यात (अख्खीच) घातली तरी चालेल." ते वर लिहीलेय.
वरदा, हे काल केले होते आणि उरलेले फ्रिजमधे ठेवले होते. आत्ता तु म्हणालीस म्हणुन मी जेवणानंतर नुसते पिऊन पाहीले. गारेगार मस्त लागले.
सावली बंगाल्यांमधे चटणी (आणि
सावली
बंगाल्यांमधे चटणी (आणि त्याबरोबर पापड) हे जेवणाच्या शेवटी खायचे पदार्थ. मुखशुद्धी उत्तम होते. यानंतर हातबित धुवून मिठाई...
तळीराम तृप्त!!
तेल मोहरीचे असते
तेल मोहरीचे असते
हा मेथांब्याचा ओडिशी भाऊ
हा मेथांब्याचा ओडिशी भाऊ दिसतो आहे.
भारी वाटतेय चटणी. करून बघेन
भारी वाटतेय चटणी. करून बघेन एकदा.
परवा महाराज भोज मध्ये अशीच
परवा महाराज भोज मध्ये अशीच कैरीकी सब्जी होती त्याची पाककृती अशीच असेल ? एक बार करको देखतुं.
तिथे तीन दा मागून घेउन खाल्ली.
कसली मस्त रेसीपी आहे. कधी
कसली मस्त रेसीपी आहे. कधी एकदा करून बघीन अस झालय.
सावली, अगं कित्ती मस्त फोटो काढत असतेस. रेसीपीचे फोटो तुझ्याकडून मस्ट आहे.
खूप चटपटीत आणि चवदार लागत
खूप चटपटीत आणि चवदार लागत असेल असं वाटतंय. लवकरच करुन बघणार.
भारी..
भारी..
मस्त आहे पाकृ!
मस्त आहे पाकृ!
चट्कदार!
चट्कदार!
छान रेसिपी! मराठवाड्यात
छान रेसिपी!
मराठवाड्यात ह्याला कायरस म्हणतात, पंचफोडण एवजी मेथी दाणे.