Submitted by अभय आर्वीकर on 12 April, 2014 - 19:38
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये
वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये
एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये
कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?
तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये
बाकी सर्व विसर ’अभय’ पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये
- गंगाधर मुटे ’अभय’
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खयाल पोचले काही शेरात
खयाल पोचले
काही शेरात गझलियतीचा आभाव जाणवला (वै.म)
लय एकतर गडबडलीये किंवा नाहीच्च्चय !!!!
पण खयाल पोचले काही पटलेही
धन्यवाद
पण खयाल पोचले काही पटलेही>>+१
पण खयाल पोचले काही पटलेही>>+१
वैवकु, यती १८ मात्रानंतर
वैवकु,
यती १८ मात्रानंतर घ्यावा. (१८+१०)
ओके ,आत्ता जरा जरा लयीत वाचता
ओके ,आत्ता जरा जरा लयीत वाचता आले मला
धन्यवाद सर
छान
छान
ही कविता
ही कविता http://bajao.biscoot.com/onlinemusic/chitraher-5-ha-sansar-pakhrancha/ma... ह्या गाण्याच्या चालीवर म्हणायला फार छान वाटते.