युवराजसिंग – एका अष्टपैलू युगाचा अस्त

Submitted by pltambe@yahoo.co.in on 8 April, 2014 - 08:29

युवराजसिंग – एका अष्टपैलू युगाचा अस्त

yuvee.jpg

भारताने यंदाचा T20 विश्व-चषक गमावला याला कारणीभूत असलेला एक महत्वाचा वाटेकरी आहे “युवराज सिंग” आणि याबद्दल देशभरातून त्याच्यावर नाराजी व प्रच्छन्न टीका होतांना दिसते आहे. तरीही त्त्याची काही चाहते मंडळी त्याच्या जुन्या पराक्रमांची आठवण करून देत त्याची भलावण करतांना म्हणतात की ‘ केवळ एका खराब खेळीने तुम्ही युवराजला विसरलात कसे ?
मला त्यांना विचारावेसे वाटते की “ मग तुम्हाला आणखी किती दिवस पुरावी असे वाटते युवराजला ही अशी इतिहासातील त्याच्या जुन्या गत-पराक्रमांची शिदोरी ? भारतीय क्रिकेट जगतासाठी एकेकाळी युवराजने घडवलेला इतिहास आम्ही कोणीच नाकारत नाही.कारण ते एक अबाधित सत्य आहे. मात्र वर्तमानातील कटू वास्तवाला सामोरे जाताना इतिहासात रमून जाऊन व इतिहासालाच कवटाळून बसून कसे चालेल ? भूतकाळात युवीने काय काय पराक्रम गाजवले याचे पोवाडे गाण्याइतकेच वर्तमानातील प्रखर कटू वास्तव काय सांगते तेही पहाणे माझ्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे , नाही का ? असामान्य धिराने व जिद्दीने कँसरवर मात करुन भारताला २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकून दिला याबद्दलचे युवराजचे श्रेय आम्ही कधीच नाकारत नाही.सर्व क्रिकेटविश्व त्यासाठी त्याचे कायमच ऋणी राहील , मात्र या पुण्याईच्या जोरावर व कँसरवर मात करुन पुन्हा एकदा जिद्दीने क्रिकेटच्या मैदानावर उतरल्याने मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन युवराज आता आणखी किती दिवस संधीची भीक मागत रहाणार ?
विश्व-चषक स्पर्धेतील केवळ एका सामन्यात नव्हे तर या वेळच्या संपूर्ण दौर्याेतच (एक सामना वगळता) युवीने ना कधी फलंदाजीत आक्रमकता,आत्मविश्वास,संयम दाखवला ना त्याच्या क्षेत्र रक्षणात चपळता दिसली.अगदी साधा झेलही तो नाही घेऊ शकला.फलंदाजीत तर सदैव तो बिचकत खेळत असल्याचेच जाणवले. ज्या एकमेव सामन्यात त्याने अर्ध शतक केले त्यातही त्याची सुरवात अत्यंत संथ व बिचकतच झाली हेच सत्य आहे. त्याने खेळलेल्या अखेरच्या सर्वच मालिकातून एकाच जाणीव दृढ होत गेली की आता युवराज मधील क्रिकेट संपले आहे. तरीही मला राहून राहू एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटत रहाते की तुम्ही त्याची अंध चाहते मंडळी डोळ्यावर कातडे पांघरून न बसता का नाही हे मान्य करून सत्याचा स्विकार करत ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्विंग बॉल होत होते हे विसरले बहुतेक बेफी.. उगाच कैच्याकै लॉजिक लावायचे<<<

झापडं काढून माझे प्रतिसाद वरपासून नीट वाचा. मीच लिहिले आहे की ओल होती, पायही सटकत होते वगैरे! ते न वाचता मधलाच एखादा प्रतिसाद घेऊन हुल्लडबाजी करणे हे गुणवंताचे लक्षण नव्हे. विनोदी प्रतिसाद द्यायला मला लेखक महाशयांनी प्रवृत्त केले आहे, मी व्यवस्थित मुद्दे मांडत होतो तर माझा आवेश वगैरे काढला.

ते न वाचता मधलाच एखादा प्रतिसाद घेऊन हुल्लडबाजी करणे हे गुणवंताचे लक्षण नव्हे.>>>>>>>>>>..... मी नाही हुल्लडबाजी केली...आहे की नाही मी गुणवंत ???

ओल होती, पायही सटकत होते >>>>> बेफी...... मी काय लिहिले ते निट वाचा... ओल होती वगैरे हे पहिले १० ओवर नंतर नाही जर तुम्ही शेवटचे ५ ओव्हर सुध्दा ओल होती पाय सटकत होते असे म्हणत असाल फक्त युवी च्या बाबतीत तर ............. देवच भल करो.. कारण समोर कोहली होता त्याला नंतर नाही जाणवली... फक्त युवीलाच ओल वगैरे जाणवली ???

बेफिकीरजी, कालच्या एका डावातील खेळामुळे युवीचा 'अस्त' झाला असं म्हणणं योग्य नाही, याच्याशीं मी सहमत आहे; पण त्या खेळाचा आपण अंतिम सामना हरण्यात सिंहाचा वांटा होता, हेंही तितकंच खरं व त्यासाठी त्याच्यावर टीका होणंही स्वाभाविक व समर्थनीय !

Yuvraj can be criticized. but can't crucified

~ sachin tendulkar

बेफिकीर यांचे मुद्दे पटत आहेत
आपल्याकड़े जिंकले की डोक्यावर घेऊन नाचवायची आणि हरले की उद्धार करायची सवय आहे
तेच युवीच्या बाबतीत घडल आहे

उदयन, देव भले करो वगैरे आक्रोश नका करू इतक्यात. कारण तुम्ही नीट वाचलेले नाही आहेत.

शेवटच्या चार षटकात श्रीलंकेने जे वाईड यॉर्कर्स टाकले तो त्यांचा गेमप्लॅन होता. वाईडच्या लिमिटच्या जस्ट आत फुल लेंथ चेंडू टाकायचा व तोही पुन्हा स्विंग होणार! धड तो बॉल वाईडही देता येत नाही आणि धड टोलवताही येत नाही. असे बॉल खेळायला गांगुलीसारखा किंवा डेव्हिड गोव्हरसारखा फलंदाज लागतो. त्यात पुन्हा त्याच साईडला चार चार क्षेत्ररक्षक! नीट पाहिले असलेत तर हेही लक्षात येईल की अश्या एन्क चेंडूंपैकी एक की दोन खरच वाईडही गेले होते, पण ते चुकून!

सातत्याने असे वाईड यॉर्कर्स टाकणे ह्यामुळे आपले कोणतेच फलंदाज खेळू शकले नाहीत. युवराज व धोनी दोघेही! कोहलीला स्ट्राईक मिळाला असता तरी फार फरक पडला नसता कारण अश्या चेंडूंवर चौकार ठोकण्यासाठी जबरदस्त फूटवर्क आणि लांबलचक हात असणे आवश्यक आहे. किंवा चक्क अँटिसिपेट करून स्टंपच्या बाहेर जाऊन खेळणे आवश्यक आहे जी एक रिस्क आहे.

श्रीलंकेचा गेमप्लॅन सरस होता. आपण आपल्या गोलंदाजीची शेवटची षटके अशी खास बनवू शकलो नाहीत. आपण तोच तोच गेमप्लॅन घेऊन उतरलो.

बेफिकीरजी, कालच्या एका डावातील खेळामुळे युवीचा 'अस्त' झाला असं म्हणणं योग्य नाही, याच्याशीं मी सहमत आहे; पण त्या खेळाचा आपण अंतिम सामना हरण्यात सिंहाचा वांटा होता, हेंही तितकंच खरं व त्यासाठी त्याच्यावर टीका होणंही स्वाभाविक व समर्थनीय !<<<

धन्यवाद भाऊसाहेब! Happy

चक्क अँटिसिपेट करून स्टंपच्या बाहेर जाऊन खेळणे आवश्यक आहे जी एक रिस्क आहे. >>> अब जाके सही फुटी ..

आता कळले तुम्हाला... कोहली ने नंतर का रिक्स घेतली नाही... कारण एकाबाजुने युवी ने रन्स ब्लॉक केलेले १-२ सुध्दा घेत नव्हता अश्या वेळेला जर कोहली मोठा शॉट मारण्याच्या नादात आउट झाला असता तर पुढच्या ३-४ ओव्हर्स मधे हवे तेव्हढे रन्स नविन बॅट्समन उतरल्याने झाले नसते...

आता कळले तुम्हाला... कोहली ने नंतर का रिक्स घेतली नाही... <<< Biggrin

कोहलीला रिस्क घ्यायला संधीच मिळाली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मिळाली असती तरीही त्याने पुढच्या फलंदाजांनी रन्स कमी केल्या तर वगैरेचा विचार करून एकेरी धावा घेतल्याच नसत्या, त्याने मोठेच फटके मारण्याचा प्रयत्न केला असता.

कोहलीला रिस्क घ्यायला संधीच मिळाली नाही >>युवी ने दिली नाही बोला.. Wink

मोठे फटके मारलेले त्याने कुलसेकरा च्या ओव्हर मधे १६ रन्स काढले परंतु पुढच्याच संघनायकेच्या ओव्हर मधे युवी ने अवघे ३ -४ रन्स काढले आणि काढले तर काढले पठ्याने शेवटच्या बॉल वर रन घेउन पुढच्या ओव्हर ला स्ट्राईक स्वतः कडे ठेवली आणि ती होती मलिंगाची ओव्हर.. तिथे पण तसेच झाले सलग २ ओव्हर्स कोहली ला निट खेळायला दिल्या नाहीत.. ही चुक युवीचीच होती ...

बेफिकीरजी , श्रीलंकेच्या 'गेम प्लान'बद्दल आपलं निरीक्षण अचूक आहे. पण युवराजच्या संदर्भात तें युवीच्या विरोधातच जातं; डावर्‍या व उजव्या फलंदाजांची जोडी खेळत असताना गोलंदाजाला दोन्ही बाजूला असे अचूक यॉर्कर टाकणं खूपच कठीण/ अशक्यप्राय झालं असतं, जर स्ट्राईक रोटेट झाला असता तर ! युवराजने तसं न केल्याने त्या गोलंदाजीला खरी धार चढली, असं नाही वाटत ?

ही चुक युवीचीच होती ...<<<

एक्झॅक्टली उदयन!

मीही आधीपासून इतकेच म्हणत आहे की पराभवाच्या कारणमीमांसेत युवराजच्या खेळीचा उल्लेख अपरिहार्य आहे, फक्त त्या एका खेळीमुळे त्याला राईट ऑफ वगैरे करणे काहीच्या काही आहे.

थोडे सिमिलर (एक्झॅगरेटेड वाटू शकेल) उदाहरण देतो.

आय पी एल मध्ये पुणे संघाविरुद्ध ख्रिस गेलने १६५ रन्स एकट्यानेच केल्या होत्या. एवढ्या रन्स कुटल्यावर ९९% वेळा प्रतिस्पर्धी कोणीही असला तरीही तो हारेलच, फक्त त्या दिवशी पुण्याचा संघा होता इतकेच. तसेच, श्रीलंकेची ती चार षटके खेळणे कोणालाही तितकेच अवघड गेले असते, फक्त त्या दिवशी युवराज होता.

पण युवराजच्या संदर्भात तें युवीच्या विरोधातच जातं; डावर्‍या व उजव्या फलंदाजांची जोडी खेळत असताना गोलंदाजाला दोन्ही बाजूला असे अचूक यॉर्कर टाकणं खूपच कठीण/ अशक्यप्राय झालं असतं, जर स्ट्राईक रोटेट झाला असता तर ! युवराजने तसं न केल्याने त्या गोलंदाजीला खरी धार चढली, असं नाही वाटत ?<<<

भाऊसाहेब, माझे मुद्दे फक्त दोन आहेत जे मी पुन्हा एकदा नोंदवतो.

१. युवराज ते चेंडू खेळूच शकला नाही (जसे धोनीही खेळू शकला नाही)

आणि

२. म्हणून युवराजच्या युगाचा अस्त वगैरे म्हणावे हे चूक आहे.

आता तो ते चेंडू खेळूच शकला नाही, म्हणजे बॉल बॅटवर येतच नव्हते किंवा आले तरी मिस प्लेड होत होते त्यात त्याची चूक इतकीच की त्याच्या किंवा धोनीच्या कल्पनेपेक्षा अद्भुत गोलंदाजी चाललेली होती.

हे मान्य करायला आपल्याला नेमकी काय अडचण येते की अनेकदा आपल्यापेक्षा प्रतिस्पर्धी संघ सरस खेळतो म्हणूनही आपण हारतो / हारू शकतो? आपल्या पराजयामागे फक्त आपल्याच खेळाडूंच्या कमजोर परफॉर्मन्सचे कारण असते असे नाही हे का पटत नाही? Happy

पराभवाचे खापर आपल्या संघातील कोणावरतरी फोडायला मिळणे ही एवढी मोठी भावनिक गरज का असावी? अशी दिलदारी मनात का नसावी की 'द बेटर टीम वन द गेम'! श्रीलंका सरस खेळले म्हणून आपण हारलो हे मान्य करण्यात कोणता इगो दुखावतो? कागदोपत्री आपले खेळाडू लंकन्सपेक्षा महान आहेत हा इगो?

स्टॅट्स, इतिहास, रेकॉर्ड्स, प्रॉबॅबलिटीज, पॉल्स ह्या सगळ्यांचे महत्व फक्त प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यापुरतेच! प्रत्यक्ष सिच्युएशनमध्ये जो फिटेस्ट असतो तो आपोआपच जिंकतो.

लेखकाच्या भावना या लेखातून त्याने नोंदवल्या. खरं तर अनेक भारतीय क्रिकेट रसिकांच्या याच भावना त्या दिवशी होत्या... परत लिहितो... त्या 'दिवशी' होत्या...युवराज मुळे "च" फायनल हरलो असं त्यावेळी जरी वाटत असलं तरी नंतर शांत पणे विचार केल्यावर अनेक गोष्टी जाणवल्या..की फक्त युवराज मुळेच हरलो असं नाहीये.. वर बेफींनी आपल्या हरण्यामागचे मांडलेले मुद्दे पटले..
त्यामुळे युवराज ला पूर्ण पणे राईट ऑफ करणे चुकीचे वाटते.

अजून एक म्हणजे, युवराजला झालेला कॅन्सर ही आपण वर्ल्ड कप जिंकल्या नंतरची घटना आहे (चु.भू.दे.घे.)

त्या दिवशी युवराजच्या ठिकाणी दुसरा कोणीही फलंदाज असता तरीही परिस्थितीत काहीही बदल घडला नसता. कारण तो दिवस फक्त श्रीलंकन खेळाडूंच्या डावपेचांचा होता. Hats off S. Lanka.
बाकी एक final हरलो म्हणून कोणत्याही (फक्त युवराज नव्हे) खेळाडूला राईट ऑफ करणे चुकीचे वाटते.

बेफिंशी सहमत.

<< आपल्या पराजयामागे फक्त आपल्याच खेळाडूंच्या कमजोर परफॉर्मन्सचे कारण असते असे नाही हे का पटत नाही? >> हरणं/ जिंकणं यापेक्षाही आपल्या कुवतीनुसार खेळ केला कीं नाही , याला अधिक महत्व असावं. इतकी जबरदस्त फलंदाजीची फळी, हातात भरपूर विकेटस - व त्याही धडाकेबाज फलंदाजांच्या - तरीही इतक्या कमी धांवसंख्येवर हतबल झाल्यासारखं अडकून पडणं, हें खटकतं; मग त्याचं कारण शोधताना युवीचा खेळ प्रामुख्याने समोर येणं अपरिहार्य आहे. १५०च्या वर धांवा होवून हरलों असतों, तर मला नाही वाटत इतका वादविवाद झाला असता निर्णयाबाबत.

<अजून एक म्हणजे, युवराजला झालेला कॅन्सर ही आपण वर्ल्ड कप जिंकल्या नंतरची घटना आहे (चु.भू.दे.घे.>

वर्ल्ड कपनंतर कॅन्सर डिटेक्ट झाला आणि उपचार सुरू झाले पण वर्ल्ड कप स्पर्धेच्या काळातच युवराजला सततचा खोकला, त्यातून रक्त पडणे, श्वास घायला त्रास होणे अशी लक्षणे दिसत होती.

हरणं/ जिंकणं यापेक्षाही आपल्या कुवतीनुसार खेळ केला कीं नाही , याला अधिक महत्व असावं<<<

पण कुवत ठरते कशावरून भाऊसाहेब? रेकॉर्ड्स आणि स्टॅट्सवरूनच ना? नेमक्या त्याच दोन गोष्टी तर सामना जिंकून देण्यात अजिबात सक्रीय नसतात ना पण? कागद राहतात तंबूमध्ये किंवा संगणकावर! त्या त्या वेळचा फिटनेस, टेंपरामेंट, बुद्धीकौशल्य घेऊन खेळाडू प्रत्यक्ष सामन्यासाठी मैदानावर उतरतो. तुम्ही आम्ही रसिक मायबाप 'आता तर कोहलीच आला आहे, अश्या कित्येक मॅचेस त्याने जिंकून दिल्या आहेत' असे मनाशी म्हणून आपल्या अपेक्षा वाढवतो आणि मग विश्लेषण करू लागतो. पण त्या त्या दिवशी आलेल्या कोहलीचा फिटनेस, टेंपरामेंट, प्रतिस्पर्धी संघाचा प्लॅन ही सर्व पर्म्युटेशन्स आणि काँबिनेशन्स भिन्न भिन्न असतात.

त्यामुळे कुवतीनुसार खेळ केला नाही ह्याचा सरळ अर्थ कागदांवरील पात्रतेनुसार केला नाही असा होतो जो मुळातच चुकीच्या दृष्टिकोनातून काढलेला अर्थ नाही का? Happy

छान आढावा घेतलात बेफिकीर.:स्मित:

हरलो ते ही एका चान्गल्या सन्घाकडून हे मान्य करताना इगो प्रॉब्लेम दिसतोय खरा.:फिदी:

मागे शास्त्रीबुवा रिटायर व्हावे म्हणून बर्‍याच क्रि. रसिकानी सत्यनारायण घातले होते म्हणे.

हॅडलीचा विक्रम मोडण्यासाठी कपिल ला जबरदस्तीने खेळवले गेले ते विसरले वाट्ट बहुतेक जण.

सचीन चे काय? की तो महान आहे म्हणून त्याच्याही चूका पदरात घ्यायच्या? मग तसे असेल तर सगळ्यानाच झोडपा. मायबोली वर ऑनलाईन ई-झाडु पुरवले पाहीजेत.:खोखो: ( सगळ्यान्चीच चन्गळ होईल, आणी बेफिकीर नवीन बुजकूज लिहीतील.:फिदी::दिवा:)

बेफिकीरजी, एका खेळाडूची कुवत व संघाची एकत्रित कुवत यांत एका विशिष्ठ दिवशी होणार्‍या चढ-उतारात खूपच फरक असावा; शिवाय, जी कागदावर/ संगणकावर येते ती कुवत आधीं मैदानावर सिद्ध झालेली असावी लागते, हेंही महत्वाचं.
आपण इथं जें म्हणताय तेंच " टी-२० - विश्व चषक" या धाग्यावरच्या माझ्या दि. ६एप्रिलच्या प्रतिसादांत मीं म्हटलंय असं नाही वाटत-
<< शेवटच्या कांहीं षटकांत श्रीलंकेने ऑफ स्टंपच्या बाहेर पण 'वाईड बॉल'च्या सीमेवर अचूक गोलंदाजी केली व त्याला आपल्याकडे - कोहलीकडेसुद्धां - उत्तर नव्हतं; कारण टी-२०साठी अप्रचलीत फटके मारण्यासाठी आपण खास सरावच केला नसावा. डि व्हिलीयर्स, डुमिनी सोडाच पण आयर्लंडसारख्या संघांचे फलंदाजही असे फटके मारण्यात वाकबगार वाटत होते. मला वाटतं युवराज इतकाच हा घटकही शेवटच्या ५ षटकांत धांवसंख्या अडकून पडण्यात महत्वाचा ठरला; >>
फक्त, युवराजही दोषी आहेच आहे, याबाबत आपला मतभेद असावा.

बफिकिरांच्या आणि भाऊंच्या पहिल्या पोस्टला १००% अनुमोदन!

युवराज खेळत असताना राग येत होताच पण नंतर त्याच्यावर ज्या पद्धतीने टिका आणि घरावर दगडफेक झाली ते
पाहून अतिशय संताप झाला! काल मटा कि लोकसत्तेत ह्या विषयावर संपादकीय लेख होता.. अतिशय वाचनीय होता.

पराभवाचे खापर आपल्या संघातील कोणावरतरी फोडायला मिळणे ही एवढी मोठी भावनिक गरज का असावी? अशी दिलदारी मनात का नसावी की 'द बेटर टीम वन द गेम'!<<< बेफिकीरजींच्या मताशी १००% सहमत.

आयुष्यात ज्या व्यक्तीने कधी हातात बेंटसुद्धा पकडली नसेल असे लोकच क्रिकेट वर तावातावाने बोलतात. आमचा चायवालासुद्धा आजकाल चेतन शर्मा / मोहिंदर अमरनाथ इत्यादी लोकांच समालोचन ऐकून क्रिकेट वर भाष्य करू लागला आहे. BALL कंबरेच्यासुद्धा वर येत नाही अशा सपाट पिचवर खेळलेले सामने बघणार्यांना युवराज सिंग काय आहे हे कस कळणार.

Pages