Submitted by pltambe@yahoo.co.in on 7 April, 2014 - 20:20
झटपट रवा डोसा
साहित्य : एक वाटी बारीक रवा , एक वाटी तांदळाची पिठी , एक वाटी मैदा , एक वाटी आंबट दही,चवीपुरते मीठ व डोश्यासाठी तेल.
पूर्वतयारी : डोसे कराण्यासाठी ते करायला घेण्यापूर्वी काहीतकमी दोन तास आगोदर एका पातेल्यात वर दिलेले सर्व साहित्य म्हणजेच एक वाटी बारीक रवा , एक वाटी तांदळाची पिठी , एक वाटी मैदा , एक वाटी आंबट दही,चवीपुरते मीठ व पाणी घालून सरसरीत भिजवून ठेवावे लागते ,त्यात मोहन म्हणून दोन टेबलस्पून कडकडीत तेलसुद्धा घालावे व झाकून ठेवावे.
कृती : डोश्याकरता मिठाचे पाणी लावून तयार केलेल्या खास दोषयाच्या नॉन-स्टिक (निर्लेप) तव्यावर डावाने पातळ धिरड्याप्रमाणे डोसा घालावा व वरुन सर्व बाजूंनी पाव चमचा तेल सोडून हलकेच काढून कोथिंबीर व नारळाची हिरवी चटणी व सांबार बरोबर खायला द्यावा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी फोटो तांबे काकांनी
मी फोटो तांबे काकांनी केलेल्या डोश्याचा आहे असे समजून प्रतिसाद दिला होता .
तांबे काका , हा तुम्ही स्वत: केलेल्या डोशाचा फोटो नाहीये का ?
रवा दोसा थोडा जाडा असतो ना?
रवा दोसा थोडा जाडा असतो ना? फोटोतिल दोसा नोर्मल दोसा वाटतोय!
ताम्बे काकानी बहुतेक
ताम्बे काकानी बहुतेक खरवसावरची चर्चा वाचलेली दिसतीय, त्यामुळे ते फोटो बाबत स्पष्टीकरण द्यायला बिचकत असावेत.:अओ::फिदी:
(No subject)
मॅक्सुवा, है शाब्बास!!!
मॅक्सुवा, है शाब्बास!!! वर्जिनल फोटो शोधून काढल्याबद्दल तेरेको मेरी तरफ से एक रवा डोसा
प्रमोद् तांबे, कृपया तुम्ही
प्रमोद् तांबे, कृपया तुम्ही तयार केलेल्या पाककृतीचा फोटो किंवा तुम्ही स्वत: काढलेला फोटो इथे डकवा.
धन्य आहे !!!
धन्य आहे !!!
Pages