Submitted by सुसुकु on 2 April, 2014 - 13:30
सडसडीत सूड
वाचले आहे सारे मी सूड कसा वाईट आहे ते
पण आहे का इथे कोणी सूडालाच तारू शकेल?
शांतीचाच अवतार आहे सूड मी तर म्हणते
शंका आहे का की मला तर सूडच शांतवेल?
ऐकला आहे लोकांचा उपदेश मला जाळणारा
असेल का तो त्यांचाच अहं जरी सुखावणारा?
का म्हणून ऐकावे जनांचे मी तर बोलते मनीचे
हिम्मत आहे तर का नाही महाभारत घडवायचे?
पण मी नाही खेळणार सूडाने रक्ताची होळी
मी काय असभ्य आहे की असंस्कृत अनाचारी?
सुसंस्कृत सारीपाटावरील दावा आहे बुद्धीबळी
काळ्या सोंगट्या का कधी जिंकणारच नाही?
सडसडीत सूड उगवीत उडवीत फटफट फटाके
दणदणीत जय मिरवत नाचवीत उंचउंच ताबुके
लखलखीत पाते पारजत दाखवीत कुमारी धार
लोहासही सूडाग्नीत वाकवीत मी आहे मिरवणार!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा