रंग आणखी मळतो आहे

Submitted by अभय आर्वीकर on 21 March, 2014 - 21:19

रंग आणखी मळतो आहे

रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे

गारपिटीचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे

मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे

पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !

भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे

बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे

ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे

'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे

                              - गंगाधर मुटे
==‍^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍^=0=‍^=0==

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गारपिटीचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे

व्वा. शेर अगदी पोहोचला.

मुटेजी, काही शेर आवडलेत-पोचलेत? विशेषकरून भातुकली.
गझलेचं तंत्र आणि त्यात आशय बसवण्याची धडपड जाणवते आहे!