Submitted by बोबो निलेश on 6 March, 2014 - 23:57
काहींना हा प्रश्न बाळबोध वाटेल. पण गेली काही वर्षे वाचनाशी संबंध काहीं तुटला होता. पुन्हा वाचायला सुरुवात करतो आहे. मला जाणून घ्यायला आवडेल -
पुल, वपु , मतकरी , कणेकर ,सुशि यांच्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये सध्या वाचकप्रिय (Mass Appeal) असलेले लेखक/लेखिका सध्या कोण आहेत?
माझ्या अगोदर आधी कुणी अशी पोस्ट केली असल्यास मला त्याची लिंक द्यावी.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बोबडे बोल यांचा प्रश्न थोडा
बोबडे बोल यांचा प्रश्न थोडा ट्विस्ट करून माझा वेगळा प्रश्न :
मराठीमधल्या वाचकांना नव्या दमाच्यालेखक/लेखिकांंकडून नक्की काय अपेक्षित आहे? तुम्हाल अकाय वाचायला आवडेल?
वरील प्रतिसादांत आले नसल्यास
वरील प्रतिसादांत आले नसल्यास नंदा खरे हेही अलीकडचे 'वाचनीय' नाव.
अगदी अलीकडचे पटकन आठवणारे काही लेखक -
आनंद विंगकर (अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट)
अवधूत डोंगरे (स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट)
नागराज बाबुराव मंजुळे (काव्यसंग्रह - उन्हाच्या कटाविरुद्ध)
कृष्णात खोत (रौंदाळा, गोकुळवाटा)
आसाराम लोमटे (इडा पीडा टळो)
प्रशांत बागड (विवादे विषादे प्रमादे प्रवासे)
प्रवीण बांदेकर (चाळेगत)
राम जगताप
बोबडे बोलना सध्याचे वाचकप्रिय
बोबडे बोलना सध्याचे वाचकप्रिय लेखक हवे आहेत. म्हणजे जास्त वाचकसंख्या असलेले लेखक हवे आहेत असा अर्थ लावतोय.
मुंमग्रंसं-त वाचकांनी (वाचून) परत केलेल्या पुस्तकांत वरच्या याद्यांपैकी राजन खान नेहमी दिसतात.
गौरी देशपांडे, नारायण धारप दिसतात. नव्या पुस्तकांपैकी अमल्ताश आणि चांदण्यांचा रस्ता नेहमीच वाचायला गेलेली असतात. पण जास्त अनुवादित साहित्यच असते. मूळ मराठी लेखनात चरित्रे, आत्मचरित्रे असतात.ग्रंथालयाने नव्याने विकत घेतलेल्या पुस्तकांत कथा-कादंबर्यांपेक्षा चरित्रे-आत्मचरित्रे, प्रवासवर्णने, D-I-Y-Self-help books दिसतात. गेल्या तीन वर्षांत एकच कवितासंग्रह आताच विकत घेतलेला दिसला. संदीप खरेंचा आहे.
यावरून कथा-कादंबर्यांकडून वाचकांचा कल ललित-लेखन, चरित्रे -आत्मचरित्रांकडे वळलाय असे मानावे का?
पु.ल. लायब्ररीतून आणून वाचायचे नव्हे तर विकत घेऊन वाचायचे लेखक आहेत. डिट्टो कवितासंग्रह.
पुस्तकांच्या दुकानांत दवणे गुरुजींना टाळणे अशक्य असते. त्यांच्याच रांगेत आता अच्युत गोडबोले बसू लागले आहेत. बहुतेक व.पु.ही असावेत.
अहो लिंबूटिंबूजी मला उदयनच्या
अहो लिंबूटिंबूजी मला उदयनच्या पोस्टवर लिहायचं होतं की त्यांना फक्त माबोवरचे लेखक्/लेखिका अपेक्षित नाहीयेत... अन्यथा मी स्वतः माबोकरांच्या लिस्टमध्ये भर घ्गालणारी २ नावे कशाला बरं लिहीली असती... नेहमीप्रमाणे घेतलात ना गैस करून?
असो... बाकी मला माबोकरांच्या प्रतिभेबद्दल दुमत नाहीये अज्जिबात. म्हणून तर आवडत्या प्रत्येक लेखाला मी प्रतिसाद देतेच देते आवर्जून... एवढंच कशाला फेबू वर लिंकही शेअर करते... लेखकाच्या नावासहीत! 
बेस्ट्सेलर लिस्ट असे काही
बेस्ट्सेलर लिस्ट असे काही मराठी पुस्तकांबद्दल उपलब्ध आहे का?
अच्युत गोडबोले (वाचलेच पाहिजे
अच्युत गोडबोले (वाचलेच पाहिजे असे ) - बोर्डरूम , गणिती, मनात, नॅनोदय, अर्थात, गुलाम , किमयागार, मुसाफिर, स्टीव्ह जॉब्ज , नाद्वेध.
धन्यवाद मंडळी. बरीच मोठी यादी
धन्यवाद मंडळी.
बरीच मोठी यादी आहे.
या यादीतलं बोकिलांचे शाळा वाचलंय. आवडलं. पुस्तक आणि चित्रपटसुद्धा. नेमाडेंचे कोसला वाचलंय. चांगलं वाटलं.
मंगला गोडबोलेंचं सदर वाचलंय अधूनमधून बहुधा लोकसत्तामध्ये असावं. तेसुद्धा चांगलं वाटलं होतं.
बाकी यादीतली काही नावं ओळखीची आहेत, पण त्याचं लिखाण वाचलं नाही कधी. पण आता जरूर वाचेन.
फुरसतीत एकेक वाचून काढेन.
बी - जुन्या(की चिरतरुण म्हणू ?) आवडलेल्या पुस्तकांची यादी
http://www.maayboli.com/node/47818
रिया - मला आवडलेल्या पुस्तकांची वरील यादी वर दिली आहे. आपली आवड असते हे मान्य आहे, पण चांगलं पुस्तक मग ते कुठल्याही प्रकारातलं असलं, तरी ते वाचायला मला आवडतं.
उदयन - माबो लेखकांच्या यादीबद्दल आभार. ते तर वाचतच आहे. सहज एक शंका… तुम्ही मार्केटिंग विभागात काम करता काय? नसल्यास अजूनही विचार करा. तुमचं भवितव्य तिथे उज्ज्वल वाटतंय

लिंबूटिंबू कथा लिहितात की प्रतिसाद या चर्चेत मी पडणार नाही, पण एवढं नकी म्हणेन, त्यांच्या लेखनशैलीचा मी पंखा आहे. कधी कधी तर मूळ लेखापेक्षा लिम्बुंचा प्रतिसाद जास्त वाचनीय वाटतो
लिम्बुजी - कुणीकडचं मराठी बोल्ता भौ. वाचायला लय भारी वाटतं बर्का.
नंदिनी | 7 March, 2014 -
नंदिनी | 7 March, 2014 - 21:10
बोबडे बोल यांचा प्रश्न थोडा ट्विस्ट करून माझा वेगळा प्रश्न :
मराठीमधल्या वाचकांना नव्या दमाच्यालेखक/लेखिकांंकडून नक्की काय अपेक्षित आहे? तुम्हाल अकाय वाचायला आवडेल? >>>
नंदिनी, उत्तम कल्पना - मला वाटतं तुम्ही याचा एक नवा धागा काढाच..
नंदिनी, उत्तम कल्पना - मला
नंदिनी, उत्तम कल्पना - मला वाटतं तुम्ही याचा एक नवा धागा काढाच..<<<
अनुमोदन! हे समजून घ्यायला नक्कीच आवडेल.
टण्या, अगदी खरं सांगायचं तर
टण्या, अगदी खरं सांगायचं तर आताच लिहिते झालेले चांगले लेखक- याबद्दल मला फारसं काही सांगता येणार नाही. दिवाळी अंकांमधल्या लिखाणातून (मला तरी) फारसा अंदाज येत नाही. नाही म्हणायला भास्कर चंदनशिव, प्रविण बांदेकर, किरण गुरव अशी काही नावं आठवत होती. मात्र जुनं जोपर्यंत भरपूर वाचलं जात नाही, तोपर्यंत नव्यांना वाचक म्हणून नीट न्याय देऊ शकणार नाही, असं का कोण जाणे, मला सारखं वाटत राहतं. आजवर जुनं किती वाचलं आहे- हा विचार केला तर थोडी लाज वाटण्याइतपत परिस्थिती आहे. अजून कितीतरी वाचायचं बाकी राहिलं आहे- हा विचार मनात येऊन छाती दडपली जाते.
नंदिनीच्या प्रश्नाचा नीट विचार केला तर किंचित गडबड जाणवते. तो प्रश्न वाचकांना आहे, की वाचक-समीक्षक यांना आहे- ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे- शक्याशक्यतेची, आशयाच्या खोलीची, शैलीच्या ताजेपणाची, विषयांच्या व्यापकतेची नवनवी दालनं वाचकांना उघडून देतो तो लेखक. त्याचं असलं काही खास लिखाण वाचेपर्यंत वाचकाला ती दुनिया अपरिचित असते. अपेक्षा काय- असं विचारल्यावर फारच कमी वाचकांकडून फारतर लेखकाला उपयोगी अशी इन्पुट्स मिळतील असं वाटतं. (आणि मिळाली तरी त्या इन्पुट्सचा वापर लेखक किती सफाईने-कौशल्याने करतो, किंवा त्याला करता येतो, हा आणखीच पुढचा भाग.)
अपेक्षा काय- असं विचारल्यावर
अपेक्षा काय- असं विचारल्यावर फारच कमी वाचकांकडून फारतर लेखकाला उपयोगी अशी इन्पुट्स मिळतील असं वाटतं.<<< साजिर्या, केवळ लेखकासाठीच नव्हे, तर विक्रेते, प्रकाशक लेखक वाचक या सर्वांसाठी हा प्रश्न विचारला आहे.
वाचकांना नक्की काय वाचायला आवडेल यामध्ये कुठले विषय आवडतील? कूठल्या घटनांवर लिहिलेल आवडेल? कुठला जॉनर आवडेल असं सगळं काही निव्वळ कुतूहल म्हणून विचारत आहे. यामध्ये एक वाचक म्हणून माझेही मत आहेच.
एक लेखिका म्हणून मला तरी वाचकांच्या असल्या इन्पुट्सचा आणी मतांचा आजवर उपयोगच झालेला आहे.
<<<<<<<साजिरा | 10 March,
<<<<<<<साजिरा | 10 March, 2014 - 02:55
शक्याशक्यतेची, आशयाच्या खोलीची, शैलीच्या ताजेपणाची, विषयांच्या व्यापकतेची नवनवी दालनं वाचकांना उघडून देतो तो लेखक. त्याचं असलं काही खास लिखाण वाचेपर्यंत वाचकाला ती दुनिया अपरिचित असते. अपेक्षा काय- असं विचारल्यावर फारच कमी वाचकांकडून फारतर लेखकाला उपयोगी अशी इन्पुट्स मिळतील असं वाटतं.>>>>
साजिरा यांच्या या मताशी पूर्णपणे सहमत.
मोटर कारचा जनक(?) हेन्ऱी फोर्डच्या नावावर खपवलं जाणारं वाक्य आठवलं - “If I had asked people what they wanted, they would have said faster horses.”
किंवा असलंच दुसरं उदाहरण म्हणजे स्टीव्ह जॉब्स लोकांना विचारत बसला असला तर आय फोन निर्माण झालाच नसता.
"मास" अपील असलेले भाऊ
"मास" अपील असलेले
भाऊ तोरसेकर
संजय सोनवणी
बालाजी तांबे
श्रीमंत कोकाटे
पुरुषोत्तम खेडेकर
ज्युनियर ब्रह्मे
सुनील तांबे
राजन खान
बालाजी शिंदे
इत्यादी
.....................
...................
.................
या सर्वांच्या पोस्टला ३०० पेक्षा कमी लाईक्स, तीस पेक्षा कमी प्रतिसाद आणि १५ पेक्षा शेअर्स कधीही नसतात.
साजिरा, तुमच्या लीस्ट मधले
साजिरा,
तुमच्या लीस्ट मधले फक्त राजन खान मला माहित आहेत. माझे वाचन खुपच मागे पडले आहे.
Pages