Submitted by बागेश्री on 5 March, 2014 - 09:39
समुद्राकाठी रेतीचं घर करण्याचा अट्टहास....
त्या घराचं आयुष्य- माहीती नाही
त्याच्या -तिच्या नात्याचंही!
घर खोटं,
नात्याचा अखंडपणा खोटा,
सागर खरा,
त्याची गाज खरी..
पाणी खरं,
त्याची लाट खरी...
त्याने किमया दाखवली
एक लाट, सारं भूईसपाट...
ढासळत्या घराला सावरायला
मग चार हातांची अशक्य लगबग
वर्ष सरलीत..
आता कधी कागदाला लेखणी टेकते तेव्हा
रेतीचे वाळलेले कण
कागदभर विखुरतात,
वेगवेगळे आकार साकारतात...
स्वप्न कागदभर उतरतात,
बघता बघता धूसर होतात..
डोळाभर धुकं साचतं,
ओघळतं..
दरवेळी वास्तवाचं भान यायला
खारं पाणीच उपयोगी पडतं!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आह्ह्ह ..... touching
आह्ह्ह ..... touching
मस्तच.. <दरवेळी वास्तवाचं भान
मस्तच..
<दरवेळी वास्तवाचं भान यायला, खारं पाणीच उपयोगी पडतं!> - खुपच सुन्दर
छान
छान
छान
छान
आवडली
आवडली
दरवेळी वास्तवाचं भान यायला,
दरवेळी वास्तवाचं भान यायला, खारं पाणीच उपयोगी पडतं!

>>
छान!
अगदी खरं. आवडला आशय
अगदी खरं.
आवडला आशय
chcha
chcha
छान कविता ..... सहज ओघात
छान कविता ..... सहज ओघात उतरलेली.... आशयही मस्तच.
सुंदर
सुंदर
छान
छान आहे
छान आहे
वा! मस्त.
वा! मस्त.
अप्रतीम... खुपच छान!!
अप्रतीम... खुपच छान!!
आवडली.
आवडली.
आता कधी कागदाला लेखणी टेकते
आता कधी कागदाला लेखणी टेकते तेव्हा
रेतीचे वाळलेले कण
कागदभर विखुरतात,
<< क्या बात !
वाह बागेश्री छान
वाह बागेश्री छान
आता कधी कागदाला लेखणी टेकते
आता कधी कागदाला लेखणी टेकते तेव्हा
रेतीचे वाळलेले कण..........
सूंदरच..
बागेश्री _/\_
बागेश्री _/\_