Submitted by विदेश on 5 March, 2014 - 05:30
कालपर्यंत कितीतरी
खुषीत तू ठेवलेस -
बघता बघता देवा,
आज मात्र भुईत लोळवलेस . .
हिरवेगार शेत सारे
सोन्यासारखे पिकवलेस -
बघता बघता देवा,
सगळे का रे धुळीत मिळवलेस . .
का रे देवा आम्हाला
इतके तू छळलेस -
बघता बघता देवा,
पाणी आमच्या तोंडचे पळवलेस . .
घ्यायचे होते सगळे परत
आधी इतके का दिलेस -
बघता बघता देवा,
आम्हाला कफल्लक का केलेस . .
इतके दिवस तुझे
कौतुक करायला लावलेस -
बघता बघता देवा,
आता बोट मोडायला लावलेस . .
खेळ कसला जीवघेणा
पावसाला रे धाडलेस -
बघता बघता देवा,
आम्हाला मातीमधे गाडलेस . . !
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान! 'बारोमास' हि कादंबरी
छान!
'बारोमास' हि कादंबरी वाचलित काय? नसल्यास आवर्जून सुचवेन!
-यक्ष
अवकाळी पावसाने शेतकर्याचे
अवकाळी पावसाने शेतकर्याचे खरोखर फार नुकसान झालंय ....
यक्ष, पुरंदरे शशांक
यक्ष, पुरंदरे शशांक महोदय-
प्रतिसादाबद्दल आभार .