तसं म्हणायला गेलं तर काळजी प्रत्येकच पालकांना असते. परंतू जेव्हा तुमचे मूल स्वमग्न असते तेव्हा ती काळजी फारच आक्राळविक्राळ रूप धारण करते. पूर्ण आयुष्य हे एक मोठी काळजी अथवा चिंता होऊन बसते.
सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे फिअर ऑफ अननोन. न्युरोटीपिकल मुलांच्या आई वडीलांनाही मुलांच्या भविष्याची काळजी असतेच. पण ती फारफार तर आपला मुलगा इंजिनिअर होईल की डॉक्टर. किंवा साईंटीस्टही चालेल. डॉक्टर आईबाप असतील तर आपला मुलगा डॉक्टर झाला तर बरे असे वाटेल. परंतू या सर्वामध्ये एक बेसिक गृहितक असते की तो काहीतरी होणार आहे. इंजिनिअर नाही झाला तर बीसीए, एम्सीए करेल. एम्बीबीएस नाही झाला तर बीएएमएस करेल. बाकी त्या मुलाच्या आयुष्यात शिक्षण, प्रेम, लग्न, मुलं बाळं सगळं यथास्थित येतेच.
ऑटीझम घरात येतो तेव्हा पालकांच्या काळज्या बदलतात. आपला मुलगा कधी बोलेल का? तो कधी आपल्यातून पलिकडे आपले शरीर पारदर्शक असल्यासारखे न बघता, आपल्याकडे 'बघेल' का? तो कधी पॉटी ट्रेन्ड होईल का? आपल्या मुलाला दात घासल्यावर चूळ भरायची ती कशी शिकवायची? हा कधी बार्बरच्या दुकानात बसून नीट केस कापून घेईल का? की नेहेमीच टॅंट्रम्स? पोळीचा तुकडा तोडून भाजीशी लावून खायचा हे त्याला फिजिकली कधी करायला जमेल का? मुळात तो कधी आपल्यासारखे जेवेल का? की आयुष्यभर ४-५च पदार्थ खाणार ब्रेकफास्ट्/लंच्/डिनर म्हणून? हा मेनस्ट्रीम शाळेत कधी जाईल का? ऑटीझमचे लेबल आयुष्यभर मागे लागेल का याच्या? बरं, ते लेबल गेलं निघून - याच्यात जरा सुधारणा झाली तरी आजूबाजूच्या लोकांची नजर बदलेल का? त्याला जिवाभावाचे मित्र कधी मिळतील का? त्यांना जीवाला जीव देणं, दुसर्यासाठी काहीतरी करणं या भावना त्याला कळतील का? त्याला विविध भावभावना कळतील का? त्याला स्वतःलाच मार लागलेला, बाऊ झालेला कळत नाही .. शाळेतून एक बोट काळंनीळं घेऊन आला त्या दिवशी.. शाळेत कोणाला माहीत नाही, हा कधी सांगू शकणार नाही. कसं कळायचे मला, त्याला काय झाले? स्वतःलाच होत असलेला त्रास त्याला कळत नाही, त्याला कधी समोरच्या व्यक्तीची pain समजेल का? त्याच्या बायकोला तो समजून घेईल का कधी? मूळात त्याचे लग्न कधी होऊ शकेल का? लग्न होण्यासाठी प्रेम ही भावना कशी कळेल त्याला? आणि आईपणाचा इगो काठोकाठ भरलेला प्रश्न : माझ्यानंतर काय? नंतर याच्यकडे कोण बघेल? याला इतकं कोण समजून घेईल? नुस्तं त्याच्याकडे बघूनच मला कळतं त्याला काय हवंय, नकोय, काय होतंय का.. अर्थात नेहेमी नाही कळत..
चिंता.. चिंता.. चिंता...
शाळेत सुभाषित शिकलो होतो, चिता मेलेल्या माणसाला जाळते तर चिंता जिवंत. इतकं या मुलाच्या काळजीने घेरून टाकले आहे आयुष्य, की आजकाल रडू देखील येत नाही. एव्हढं आभाळाइतकं काम समोर पडलेले दिसत असताना रडण्यात वेळ नाही घालवता येत. मग खर्या अर्थाने स्लीपलेस नाईट्स सुरू होतात. आख्खा दिवस मुलाला समजून घेण्यात खर्ची घालवला की तो झोपल्यानंतरचा वेळ या डिसॉर्डरला समजून घेण्यात जाऊ लागतो. जितकं वाचू तितकं कमी. जितकं अॅनालाईझ करू लेकराचे बिहेविअर, तितकं कमी. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. त्याचे स्पेशल डाएट मेंटेन करा, त्यासाठी आठवणीने स्पेशल दुकाना ग्रोसरीला जा, स्पेशल दुकानातून स्पेशल पझल्स, खेळणी आणा, मागे टोचणारे टॅग नसलेले स्पेशल शर्ट्स आणा.. सगळं आयुष्य स्पेशल!
कधीकधी गंमत वाटते. देवावर फार विश्वास नसणारे आम्ही, देवानी मात्र भलताच विश्वास दाखवला आमच्यावर. आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी देऊन.
तुमचे सगळे लेख वाचले. छानच
तुमचे सगळे लेख वाचले. छानच लिहिलेत. माझी चुलत बहिण कांऊसेलिंग चे काम करते पुण्यात याच विषयाशी संबंधित. तिच्याकडून थोडेफार कळायचे पण तुम्ही अगदी सविस्तर सांगितलेत.
माझ्या मैत्रीणीचा मुलगा ऑटिस्टीक आहे तिचे आणि तिच्या नवर्याचे त्या मुलाला सांभाळणे मी पाहिलंय, खरंच तुम्हाला मानलं.
देवावर फार विश्वास नसणारे आम्ही, देवानी मात्र भलताच विश्वास दाखवला आमच्यावर. आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी देऊन.>>>> भिडलं हे वाक्य फार कुठेतरी.
भावना पोचल्या.
भावना पोचल्या.
<<देवावर फार विश्वास नसणारे
<<देवावर फार विश्वास नसणारे आम्ही, देवानी मात्र भलताच विश्वास दाखवला आमच्यावर. आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी देऊन.>>
फार फार टोचलं हे वाक्यं...
अगदी अगदी हेल्पलेस वाटलं हे वाह्चतानाच.
दाद +१
दाद +१
फार फार टोचलं हे
फार फार टोचलं हे वाक्यं...
अगदी अगदी हेल्पलेस वाटलं हे वाह्चतानाच.>>> खरय!
फार फार टोचलं हे वाक्यं...>>
फार फार टोचलं हे वाक्यं...>> खरंच!
अगदी अगदी हेल्पलेस वाटलं हे वाह्चतानाच.>>>
ही संपूर्ण लेखमाला आज वाचली! अगदी हेच आलं मनात.
स्वमग्नता, तुला आणि तुझ्या सारख्या प्रत्येक स्पेशल आई बाबाला आणि त्यांच्या स्पेशल बाळांना खूप खूप शुभेच्छा!!
________/\________ आणखी काय
________/\________
आणखी काय बोलू?
...!!
...!!
कधीकधी गंमत वाटते. देवावर फार
कधीकधी गंमत वाटते. देवावर फार विश्वास नसणारे आम्ही, देवानी मात्र भलताच विश्वास दाखवला आमच्यावर. आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी देऊन.
>>>
म हा न आहात तुम्ही ___/\___
खरच.. अस काही घडतं तेव्हा
खरच.. अस काही घडतं तेव्हा वाटतं सामान्य आयुष्य जगणारे खरे वेडे असतात.. भिंगरी लागल्यासारखे फक्त धावत असतात.. आयुष्य जगत नसतात...
ही संपूर्ण लेखमाला आज वाचली!
ही संपूर्ण लेखमाला आज वाचली! अगदी हेच आलं मनात.
स्वमग्नता, तुला आणि तुझ्या सारख्या प्रत्येक स्पेशल आई बाबाला आणि त्यांच्या स्पेशल बाळांना खूप खूप शुभेच्छा!!>+++१
देवावर फार विश्वास नसणारे आम्ही, देवानी मात्र भलताच विश्वास दाखवला आमच्यावर. आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी देऊन.>>>> शब्दच नाहित...
स्वमग्नता, तुला आणि तुझ्या
स्वमग्नता, तुला आणि तुझ्या सारख्या प्रत्येक स्पेशल आई बाबाला आणि त्यांच्या स्पेशल बाळांना खूप खूप शुभेच्छा!!>+++१
मानलं तुम्हाला !!
Hats off to you ..and best
Hats off to you ..and best wishes to you , your child and your family .
अवघड! लेखमाला वाचली; हा लेख
अवघड! लेखमाला वाचली; हा लेख एकदम भिडला. आपल्यानंतर काय ही काळजी कुठल्याही बाळाच्या आईला असणारच, बाळ मोठे होईपर्यंत. त्या मोठे होण्यात किती गृहिते आहेत ते जाणवले एकदम.
स्वमग्नता, हे वाचा. तुम्हाला
स्वमग्नता,
हे वाचा.
तुम्हाला कदाचित माहित असेल ह्या बद्द्ल.
Some people say that they have treated autism using this book.
What do you think. Could it be true ?
-------------------------------------------------------------------------------------------------------
The second edition of Healing the Symptoms Known as Autism is officially for sale!!!!
Here';s a brief description:
In the seven months since the release of the first edition of this book, 28 more children have lost their autism diagnosis and returned to a state of health, for a total of 121 recovered children and counting. Hundreds more have lost ATEC points, as well as shown many cognitive, behavioral, emotional and physical gains thanks to the protocol outlined in these pages.
This edition includes all protocol updates and a whole lot more including: (1) how to heal older, self-injurious and/or aggressive children; (2) GcMAF and its role in healing autism; (3) gluten';s role in molecular mimicry and autoimmunity; (4) a new method of CD preparation; (5) an improved and easier to follow parasite protocol; along with (6) a special calendar so you know what to do when; (7) many new testimonials from parents sharing their real-life experiences using this protocol; and much more...
You can get your hardcopy or ebook at CDAutism.org, or hardcopy at Amazon.com.
भारतात banglore and Hyderabad
भारतात banglore and Hyderabad मधे Autism च्या थेरपि बर्या पैकि उप्लब्ध आहेत.
सर्वांचे आभार. परिमळा, मी ते
सर्वांचे आभार.
परिमळा, मी ते पुस्तक वाचले आहे. त्याचे रिव्ह्युज वाचून फार आशेचा किरण सापडल्यासारखे वाटले होते. परंतू केरी रिव्हेरा म्हणतात ते 'मिरॅकल मिनरल सोल्युशन' हे बेसिकली ब्लिच आहे.सोडीयम क्लोराईट. आपल्या पोटच्या पोराला ब्लिच एनिमा देण्याची माझ्यात हिंमत नाही. त्यापेक्षा अजिबात धोकादायक नसलेला बायोमेडीकल+एबीए+इतर थेरपीज हा अॅप्रोच जास्त कन्विन्सिंग वाटतो.
कधीकधी गंमत वाटते. देवावर फार
कधीकधी गंमत वाटते. देवावर फार विश्वास नसणारे आम्ही, देवानी मात्र भलताच विश्वास दाखवला आमच्यावर. आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी देऊन.///
खूप कमी लोकांना जमते असे आपल्या समस्येकडे वेगळ्या दृष्टीने बघणे . खरेच तुमच्याकडून हे नक्कीच शिकण्यासारखे आहे. वेळ काढून तुम्ही बाकी पण माहिती देत आहात . खरेच मनापासून धन्यवाद !
स्वमग्नता, तुमच्या लेखांतून
स्वमग्नता, तुमच्या लेखांतून तर तुमचे डेडिकेशन जाणवतेच पण प्रतिक्रियांतून त्याहून जास्त ...!
परिमळा ह्यांना उत्तरादाखल लिहिलेली पोस्ट वाचून सलाम ! आपल्या बाळाने चारचौघांसारखं सामान्य आयुष्य जगावं ह्याचा तीव्र ध्यास असतानाही कुठल्याही शॉर्टकट थेरपीचा मोह न पडणे ह्यासाठी कमाल धैर्य आणि संयम पाहिजे.
मनःपूर्वक शुभेच्छा.
अन्विता, अगो धन्यवाद. अगो,
अन्विता, अगो धन्यवाद.
अगो, माझा मुलगा बोलत नसल्याने बहुधा, मी त्याच्या दृष्टीने जास्त विचार करायचा प्रयत्न करते. त्याला कसे वाटत असेल, तो काय विचार करतो आहे इत्यादी.
ब्लिच एनिमा देण्याचा नुसता विचार जरी शिवला मनाला , तरी मला नकोसे वाटते. त्याला काय वाटते ते त्याला सांगता येत नाही म्हणून मी त्याला गृहीत धरू शकत नाही. तो त्याच्या जागी व त्याच्या जगात पर्फेक्ट व हॅपीएस्ट किड आहेच. मग मी त्याला न विचारता या फिजिकल त्रासामध्ये कशी लोटू शकेन. . त्या पुस्तकाच्या रिव्ह्यूजमध्ये पालकांनी केले आहेत हे उपाय. माझे मन कमकुवत आहे बहुधा.
असो. धन्यवाद.
>आपल्या पोटच्या पोराला ब्लिच
>आपल्या पोटच्या पोराला ब्लिच एनिमा देण्याची माझ्यात हिंमत नाही. त्यापेक्षा अजिबात धोकादायक नसलेला बायोमेडीकल+एबीए+इतर थेरपीज हा अॅप्रोच जास्त कन्विन्सिंग वाटतो.
अगदी अगदी. आम्ही ऑटिझम बरा करतो असे बेफाम दावे करून काय वाटेल ते विकतात. ओळखीतल्या एका अतिउत्साही आईने मुलाबरोबर आपणही हे ब्लीच घ्यायला सुरुवात केली आहे. ऑटिझम बरा होत नाही पण केस गळतात. अशा मुलांचे पालक vulnerable असतात म्हणून अशा चोरांचे फावते.
>>कधीकधी गंमत वाटते. देवावर फार विश्वास नसणारे आम्ही, देवानी मात्र भलताच विश्वास दाखवला आमच्यावर. आमच्यावर इतकी मोठी जबाबदारी देऊन.
मान गए. 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' अशा वेळी सेन्स ऑफ ह्युमर आवश्यक.
ओळखीतल्या एका अतिउत्साही आईने
ओळखीतल्या एका अतिउत्साही आईने मुलाबरोबर आपणही हे ब्लीच घ्यायला सुरुवात केली आहे. ... हे भयंकर आहे.
खरंय. डेस्परेट व व्हल्नरेबल असतात हे पालक, त्यामुळेच अक्षरशः काहीही ट्राय करून पाहण्याची इच्छा होते. आपलं मूल काही कारण नसताना हसायला सुरवात करते तेव्हा त्या परिस्थितीत तारतम्य बाळगणे खरेच अवघड जाते. असे वाटते काहीही करू पण हे थांबले पाहीजे. आत्ता परवाच फ्रान्समधल्या एका डॉक्टरांनी क्लिनिकल ट्रायल केली,हाय ब्लड प्रेशरचे औषध देऊन ऑटीझमची लक्षणे कमी झाली. पण आपण कसं देऊ इतक्या लहान मुलांना हाय ब्लड प्रेशरची औषधे? ..alas....