Submitted by बेफ़िकीर on 1 March, 2014 - 09:37
तरही गझल ह्या धाग्यासाठी डॉ. कैलास गायकवाड ह्यांचे व ह्यावेळच्या मिसर्यासाठी वैभव कुलकर्णी ह्यांचे मनापासून आभार! माझा नम्र सहभाग खालीलप्रमाणे:
गझल अजून अपूर्ण आहे व कदाचित एक दोन शेर (जे मनात घोळत आहेत) ते ह्यात वाढू शकतील.
-'बेफिकीर'!
=============================
उजाडू लागली आहे अमावास्या विचारांची
सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची
पुन्हा वस्तुस्थिती देईल सल्ला पोक्त होण्याचा
पुन्हा भासेल टंचाई मनी तान्ह्या विचारांची
मनाचे बेट निमिषार्धात ठिकर्या होउनी उडले
तुझ्या डोळ्यात आली लाट जी खार्या विचारांची
मनाचे सर्व बिंदू टाकले कैदेत शब्दांच्या
मला करताच येईना गझल ताज्या विचारांची
हवा आहे तुला जो तो जमाना संपला आहे
इथे नाहीत आता माणसे साध्या विचारांची
(अपूर्ण)
==============================
-'बेफिकीर'!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साध्या विचारांची ......
साध्या विचारांची ...... कुर्निसात !
बेफ़ी. गझल आवडली. तरही म्हणजे
बेफ़ी. गझल आवडली.
तरही म्हणजे काय? हा गझलेचा प्रकार आहे का?
माहीती कुठे मिळेल?
अप्रतिम....अजून खरेच हवेत शेर
अप्रतिम....अजून खरेच हवेत शेर
आवडली पण अजून शेर
आवडली पण अजून शेर हवेच
धन्यवाद बेफीजी माझ्या ओळीवरून तुम्हाला गझल लिहावी वाटली हा मी माझा सन्मान समजतो
वा वा,,.. सुन्दर गझल.
वा वा,,.. सुन्दर गझल.
तान्ह्या, ताज्या .... व्वा
तान्ह्या, ताज्या .... व्वा व्वा !
आवडले सर्व खयाल. सुंदर.
मनाचे बेट निमिषार्धात
मनाचे बेट निमिषार्धात ठिकर्या होउनी उडले
तुझ्या डोळ्यात आली लाट जी खार्या विचारांची
विरघळवून टाकणाऱ्या ओळी
मनाचे सर्व बिंदू टाकले कैदेत
मनाचे सर्व बिंदू टाकले कैदेत शब्दांच्या
मला करताच येईना गझल ताज्या विचारांची
हवा आहे तुला जो तो जमाना संपला आहे
इथे नाहीत आता माणसे साध्या विचारांची
व्वा !
तरहीची ओळही सुंदर !!
पुन्हा वस्तुस्थिती देईल सल्ला
पुन्हा वस्तुस्थिती देईल सल्ला पोक्त होण्याचा

पुन्हा भासेल टंचाई मनी तान्ह्या विचारांची
>>
आवडले शेर!
तिसरा आणि शेवटचा सर्वात छान.
तिसरा आणि शेवटचा सर्वात छान.