आमच्या आजीची शब्दसंपदा, बोलण्याची पध्दत आणि सतत बोलू शकण्याची ताकद आजकालच्या मराठीत सांगायचं तर 'अनमॅच्ड' होती. बरं शब्दांचा, म्हणींचा समृध्द खजिना असूनही किंवा असल्यामुळे, सरळ बोलणं कमीच! घरात कुणी धाकट्या काकाबद्दल 'कुठे गेलाय' विचारलं की "गेलाय उकिरडे फुंकायला" हे तिचं उत्तर. माझ्या वडलांबद्दल विचारलं तर "तो 'बडवतोय' लष्कराच्या भाकरी!" म्हणीतला 'भाजतोय' हा सर्वमान्य शब्द तिला अमान्य होता. स्वरचित म्हणीतर जागोजागी वापरल्या जायच्या. माहेरी आलेल्या आत्यांनी जराजरी कुरकूर केली तर आजी म्हणायची. "हाता-तोंडाशी गिळायला देतात वहिन्या तर खावं-प्यावं, चार दिवस आराम करावा! पण नाही! यांचं आपलं 'का रे पाव्हण्या कुथतोस, तर म्हणे बसल्या जागी करमेना..!" ही म्हण आम्ही इतरत्र कुठेही ऐकलेली नाही.
बरं आपण दुसर्याला ज्याबद्दल बोल लावतो, तेच स्वतःदेखिल करतो याचं कायमच भान असेल असं नाही. शेजार्यांच्या कुत्र्याच्या पायाला पोटीस बांधण्यासारखी लोकसेवा करण्यापासून घरात कामाला असलेल्या प्रत्येकाची जातीनं विचारपूस करून, त्यांना ओ येइस्तोवर खायला घातलं की तिचा दिवस सार्थकी लागायचा.
एकदा घरी काम करणार्या बाईंच्या नवर्यानं त्यांना दारूच्या नशेत मारलं. दुसर्या दिवशी आजीनं तिच्या अंगावरच्या जखमा बघितल्या. 'तुला झाशिची राणी व्हायला सांगते. पण तू ऐकत नाहीस. त्याच्या हातातली काठी घेऊन त्याला बडवत जा. तुला सांगून समजत नाही' वगैरे ऐकवून झालं. बाई बिचार्या खाली मान घालून ऐकत होत्या. मग तिच्या मुक्या मारावर लेप लावून झाले. तिला खायला घालून वेदना शामक औषध दिलं. काकाला सांगून बाईंच्या नवर्याला पाचारण करण्यात आलं. तोवर त्यांची रात्री चढलेली उतरली होती.
तो आल्याआल्या आजीकडून पहिला प्रश्न झाला,
"काय रे, गिळलं होतंस काही की उपाशीपोटी प्यालास?"
मुंडी खाली घालून बाईंचा नवरा म्हणाला, "जी, खाऊनशान प्यायलो."
"मग, घरी येऊन मुकाट पडायला काय होतं? मारापिटी कशाला करतोस?"
"चुकी झाली."
"मग बायकोची माफी माग. पुन्हा हात उगारलास तर तोडायला मीच तिला दांडकं आणून देईन. समजलं? अन् काय रे, रोज ढोसावी कशाला?"
"कष्टाचं अंग दुखते, आजीबाई".
"रद्दीच्या दुकानात नुस्ताच बसतोस नं? तिथे कसले कष्ट पडतात तुला? तुझी बायको बघ, चार घरी कामं करते. घरचं बघते! तिला नाही पडत कष्टं? ती नाही तुझ्यासारखे पिऊन तमाशे करत!"
संवाद पुढे बराच वेळ चालला. हा सगळा धिंगाणा घरापुढल्या अंगणात सुरू असल्यामुळे फाटकातून आत येणार्या प्रत्येकाला पुढल्या रांगेचं तिकिट काढल्यागत वाटत होतं. पुढला अर्धा-पाऊण तास बाईंच्या नवर्याला फैलावर घेऊन झालं. त्यानं आजीच्या पाया पडपडून 'आता पिणार नाही. हात उगारणार नाही'च्या शपथा घेतल्या. आमच्या आजीनी त्याला बायकोच्या पाया पडून माफी मागायला लावली. त्यानं तिचं जास्तं डोकं फिरवलं असतं तर, मला खात्री आहे, तिनं त्याला सगळ्या बघ्यांच्याही पाया पडायला लावलं असतं. बहुतेक पुढला बराच काळ माणूस सुतासारखा सरळ होता.
.... पाया पडून झाल्यावर तिसरा अंक संपला. तेव्हा आमच्या घरचा गोडलिंबाचा पाला आपल्याच दारातल्या झाडाचा आहे या समजुतीनं रोज न्यायला येणार्या एक आजी म्हणाल्या, "म्हातारीनं शिद्दा केला मसन्याले! पन आजीबाईचं तरी बघा, कोनाची म्हस आन् कोनाले ऊठबस!"
सगळ्या म्हशी आजीला आपल्याच वाटतात हे त्यांना कोण सांगणार?
>>धू म्हटलं की
>>धू म्हटलं की धुवावं...
'कपडे' येत नाही डोक्यात!
>>> याला कारण आहे या म्हणीचा उत्तरार्ध ('... काय लोंबतंय विचारू नये' :खोखो:)
आमच्या सासूबाईंकडून मी ऐकलेली
आमच्या सासूबाईंकडून मी ऐकलेली एक फर्मास गावरान म्हण -
त्यांची नातवंडं लहानपणी सगळे लाड-कोड पुरवून घ्यायची त्यांच्याकडून.. तेव्हा त्या नेहमी म्हणायच्या
"लाडाचं लळू देवळी हागे, ढु धुवायला महादेव मागे"
मृ, मस्त! सगळ्या आजांच्या
मृ, मस्त!
सगळ्या आजांच्या म्हणी भन्नाट आहेत!
भारी आहेत म्हणींचे किस्से आणि
भारी आहेत म्हणींचे किस्से आणि म्हणी
आमच्या ज्ये.नां. कडून कायम
आमच्या ज्ये.नां. कडून कायम ऐकत आलेली एक अशीच आचरट म्हण म्हणजे "कौतुकाची वरात आणि हxxx ही परात"
भारी म्हणी असायच्या
भारी म्हणी असायच्या आज्ज्यांच्या.
कुणी काही जास्त 'शास्त्रा'तले नियम वै. दाखवायला लागलं की आमची आज्जी म्हणायची:
शास्तर बराम्हन
नि 'गां... गु तेरा मण'
(No subject)
संपादित
संपादित
(No subject)
मालवणी हव्या असत्या तर
मालवणी हव्या असत्या तर माझ्याकडे पूर्ण संकलन आहे..
सगळ्यांना धन्यवाद! >>याला
सगळ्यांना धन्यवाद!
>>याला कारण आहे या म्हणीचा उत्तरार्ध
ही म्हण कधी ऐकली नव्हती. भन्नाट आहे!
आर्या
एकूण काय तर excretory system, (मराठीत?) आणि संबंधित अवयव यांच्यावर बेतलेल्या तुफान म्हणी / वाक्प्रचार आपल्याकडे भरपूर आहेत.
इथे एक म्हणींचा धागा होता ना?
इथे एक म्हणींचा धागा होता ना? कृपया तिथे लिहा या म्हणी.
भारी म्हणी आहेत एकेक.. आता
मृण्मयी....भारी लिहिलंयस! अगो
मृण्मयी....भारी लिहिलंयस!
अगो ची पोष्ट ही
लै भारी मृण्वाक्का.. आमच्या
लै भारी मृण्वाक्का..
आमच्या बायकोच्या आजी अगदी पक्क्या कोकणी होत्या म्हणे. मी त्यांना कधी भेटलेलो नाही पण काहीकाही म्हणी ऐकल्या आहेत. त्या बहुतकरून सर्वच इथे न लिहिण्यासारख्या आहेत तरी राहावत नाही म्हणुन एक लिहितोच.
सहसा आपण दुसर्याच्या घरी फार सावधपणे वावरतो, कुठे घाण होत नाहिये ना, तोडफोडतर होत नाहिये ना वगैरे. त्यावरः
स्वतःचं घर गुवानं भर, दुसर्याची मोरी मुतायची चोरी
आवडले
आवडले
मृण्मयी, मस्त लिहिलयं!
मृण्मयी, मस्त लिहिलयं!
मस्त आक्का. नातीला आजीचा वाण
मस्त आक्का. नातीला आजीचा वाण नाहि पण गुण लागलाय असे म्हणायचे का ?
मृ, खूप मस्त
मृ, खूप मस्त
मृण्मयी, छान लिहीलंयस. तुझ्या
मृण्मयी, छान लिहीलंयस. तुझ्या आ़जी आणि शेजारच्या आजी लई भारी.
बापरे! सगळ्या आज्ज्यांना
बापरे!
सगळ्या आज्ज्यांना _/\_
ही ही ही! मस्त! हा पहा खजिना
ही ही ही! मस्त!
हा पहा खजिना - http://www.maayboli.com/node/5290
दक्षी च्या स्पे. आहेत त्यात... :p
Pages